Jump to content

पिंपळगाव (राजदेहरे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपळगाव (राजदेहरे)

  ?पिंपळगाव (राजदेहरे)

महाराष्ट्र् • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर चाळीसगाव
जिल्हा जळगाव
तालुका/के चाळीसगाव
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१,४५२ (२०११)
१.११ /
७१.८१ %
• ८३.४१ %
• ५८.५९ %
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड

• ४२४१०८

स्थान

[संपादन]

पिंपळगाव (राजदेहरे) हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावर असलेल्या रोहीणी या गावापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या जवळ बंजारा / वंजारी समुदायाच्या वस्त्या आहेत. त्यास तांडा असे म्हणतात. या तांड्यासहीत गावाचा कारभार येथील ग्राम पंचायती मार्फत चालतो.

लोकजीवन

[संपादन]

गावात प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत. गावातील ५० टक्के लोकसंख्या ही मराठा जातीची आहे. त्यात प्रामुख्याने मोकाटे, देशमुख, देवकर, काकडे हे होत.

प्रशासन

[संपादन]

इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. हे गाव चाळीसगाव पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते.

शिक्षण

[संपादन]

गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आरोग्य

[संपादन]

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

व्यवसाय

[संपादन]

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. बंजारा समाज आता सुधारत चालला आहे. त्यांचाही प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे.

धार्मिक वातावरण

[संपादन]

गावाचे वातावरण हे श्रद्धाळू आहे. काळु आई ग्रामदैवत आहे. तसेच गावात हनुमान व नारळी मातेचही मंदिर आहे. गावात देवी जत्रा असते. यावेळी गावात विविध स्पर्धांचे (कुस्त्या, शर्यती) आयोजन केले जाते.