रावेर तालुका
Appearance
रावेरखेडी याच्याशी गल्लत करू नका.
?रावेर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
रावेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
रावेर तालुका हा देशभरात केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात पाल हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणं आहे.
रावेर येथे भगवान दत्तात्रेय पुरातन मंदिर आहे, संत एकनाथ महाराज यांचा परंपरेतील सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराजांनी सुमारे दोनशे वर्षापूर्वी हे सागवानी लाकडापासून हे मंदिर बांधले. भगवान दत्तात्रेयांनी प्रसाद स्वरूप दिलेल्या पादुका आणि छडी येथे आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्त ७ दिवसीय उत्सव साजरा होतो, येथील रथ आणि पालखी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातून भक्त येतात.