ओस्मानी साम्राज्य
Appearance
(ऑटोमन साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
ओस्मानी साम्राज्य دولتْ علیّه عثمانیّه Devlet-i ʿAliyye-i ʿOs̠māniyye Sublime Ottoman State | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: دولت ابد مدت (अविनाशी राष्ट्र) | ||||
राजधानी | इस्तंबूल | |||
क्षेत्रफळ | ५५,००,००० चौरस किमी | |||
लोकसंख्या | ३,५३,५०,००० (१८५६) |
ओस्मानी साम्राज्य (ओस्मानी तुर्की: دَوْلَتِ عَلِيّهٔ عُثمَانِیّه (देव्लेत-ई-ऍलीये-ई-ओस्मानिये); आधुनिक तुर्की: Osmanlı İmparatorluğu किंवा Osmanlı Devleti ; मराठीतील चुकीचे प्रचलित नाव : ऑटोमन साम्राज्य) हे इ.स. १२९९ ते इ.स. १९२३ सालापर्यंत अस्तित्वात असलेले जगातील एक शक्तिशाली साम्राज्य होते. इ.स. १९२३ साली ओस्मानी साम्राज्याचा शेवट झाला व तुर्कस्तान ह्या देशाची स्थापना झाली.
१६ व्या व १७ व्या शतकादरम्यान उत्कर्षाच्या शिखरावर असताना ओस्मानी साम्राज्य आग्नेय युरोप, पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका ह्या ३ खंडांमध्ये पसरले होते.
उस्मान पहिला हा ओस्मानी साम्राज्याचा पहिला (१२९९ - १३२६) तर मेहमेद सहावा हा शेवटचा (१९१८ - १९२२) सुलतान होता.