अढुळा नदी
Appearance
अढुळा नदी | |
---|---|
इतर नावे | अडुळा नदी |
उगम | अकोले, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | प्रवरा |
अढुळा नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अकोले गावाच्या उत्तरेस उगम पावते. ती पट्टा व महाकाली च्या उतारावरून धावते.सुमारे १५ मैल (२४ किमी) पूर्वेकडे वाहते. यादरम्यान ती समशेरपूर दरीतून वाहते. ती नंतर सुमारे १५० फूट (४६ मी) खाली कोसळते व खडकाळ जमिनीतून वाहते. त्यानंतर ती संगमनेरजवळ समतल भागात पोचते व मग दक्षिणेकडे वळून मग प्रवरा नदीला मिळते.[१]
या नदीची एकूण लांबी सुमारे ४० किमी इतकी आहे. पावसाळ्यात या नदीला फारच त्वरेने पूर येतो.याचे कारण ती डोंगराळ प्रदेशातून वाहते व तिचा प्रवाह वेगवान आहे. समशेरपूर या गावानंतर या नदीवर अनेक बंधारे व सांडवे बांधण्यात आले आहेत ज्यायोगे या नदीचे पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो. अढळा नदीवर देवठाण, ता. अकोले, अहमदनगर येथे १TMC क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. [२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे शासकीय संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) GEOGRAPHY OF AHMEDNAGAR DISTRICT#RIVERS Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. २६/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ अहमदनगर जिल्ह्याचे गॅझेटियर (इंग्रजी मजकूर) Ahmednagar District Gazetteer Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. २६/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)