२०१९ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग २
२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट-अ | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी | ||
यजमान | नामिबिया | ||
सहभाग | ६ | ||
|
२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल २०१९ मध्ये नामिबियामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१७-१९ फेरीतील स्पर्धा आहे जी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल.[१][२] हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही देश क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८च्या खालच्या दोन स्थानांवर राहिल्याने त्यांची विभाग दोनमध्ये घसरण झाली व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा गमवावा लागला.[३][४]
या स्पर्धेच्या निकालानंतर विश्वचषक लीग व विश्वचषक चॅलेंज लीग ह्या स्पर्धा चालु होतील.[५][६] या स्पर्धेतील अव्वल ४ देश विश्वचषक लीगमध्ये स्कॉटलंड, नेपाळ व संयुक्त अरब अमिराती यांना जाऊन मिळतील व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त होईल तर खालील २ देश ईतर देशांसमवेत विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये पात्र होतील.[५]
पात्र देश
[संपादन]खालील ६ देश पात्र ठरले:[७][८][९][१०]
संघ | पात्रता |
---|---|
पापुआ न्यू गिनी | क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ मध्ये ९व्या स्थानावर |
हाँग काँग | क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ मध्ये १०व्या स्थानावर |
कॅनडा | आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ३ऱ्या स्थानावर |
नामिबिया | आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ४थ्या स्थानावर |
ओमान | २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये १ल्या स्थानावर |
अमेरिका | २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये २ऱ्या स्थानावर |
संघ
[संपादन]पापुआ न्यू गिनी | हाँग काँग | कॅनडा | नामिबिया | ओमान | अमेरिका |
---|
गुणफलक
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ओमान | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | -०.०४८ | २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनसाठी पात्र आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त |
नामिबिया | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | +१.३९७ | |
अमेरिका | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | +०.७०९ | |
पापुआ न्यू गिनी | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | -०.४०३ | |
कॅनडा | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | -०.४१५ | २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र आणि लिस्ट-अ दर्जा प्राप्त |
हाँग काँग | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -१.०४४ |
साखळी सामने
[संपादन]आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आय.सी.सी) १० जानेवारी २०१९ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[११]
संदर्भ
[संपादन]- ^ "पात्रतेचा मार्ग". 2017-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "थायलंडमध्ये प्रथमच विश्व क्रिकेट लीगचे सामने". १८ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नेपाळने पापुआ न्यू गिनीला चिरडत एकदिवसीय दर्जा प्राप्त केला".
- ^ "अफगाणांच्या विंडीजवरील विजयानंतर स्पर्धेत रोमांच आला".
- ^ a b "आयसीसीने पात्रतेचा नवा ढाचा केला जाहीर".
- ^ "२०२३ विश्वचषकाच्या पात्रतेच्या मार्गात प्रचंड मोठे बदल".
- ^ "नेपाळसाठी ऐतिहासिक क्षण, पापुआ न्यू गिनी व हाँग काँगने गमावला एकदिवसीय दर्जा".
- ^ "नेपाळ व संयुक्त अरब अमिराती क्रिकेट विश्वचषक पात्रतेत".
- ^ "ओमान अपराजीत".
- ^ "अमेरिकेची विभाग दोनमध्ये प्रथमच बढती".
- ^ "शेवटच्या विश्व क्रिकेट लीगचे वेळापत्रक जाहीर".