हमसफर एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हमसफर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक लांब पल्ल्याची विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या गाड्यांच्या डब्यांमधून विशेष सुविधा असतात. खिडक्यांना पडदे, चहा, कॉफी, दूध, इ. विकत देणारी यंत्रे तसेच प्रवाशांनी आणलेले खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी शीतपेटी तसेच गरम करण्यासाठी उष्णपेटी व इतर सोयी यात असतात. याशिवाय प्रत्येक डब्यात पुढील स्थानकाबद्दलची माहिती तसेच गाडीचा वेग दाखविणारे पडदे आणि प्रवाशांसाठीच्या उद्घोषणा या डब्यांतील इतर काही सुविधांपैकी आहेत.

मार्ग[संपादन]

गाडी क्र नाव
१२५७१/१२५७२ गोरखपूर - आनंद विहार टर्मिनल हमसफर एक्सप्रेस (बरहनी मार्गे)
१२५९५/१२५९६ गोरखपूर - आनंद विहार टर्मिनल हमसफर एक्सप्रेस (बस्ती मार्गे)
१२५०३ - १२५०४ बंगळूर छावणी-कामाख्या हमसफर एक्सप्रेस
२२४९७/२२४९८ श्री गंगानगर – तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस
२०८८९/२०८९० हावरा - विजयवाडा हमसफर एक्सप्रेस
२२७०५/२२७०६ तिरुपती - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस
२२८६७/२२८६८ दुर्ग - हझरत निझामुद्दीन हमसफर एक्सप्रेस
२२८८७/२२८८८ हावरा - यशवंतपूर हमसफर एक्सप्रेस
२२३१७/२२३१८ सियालदाह - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस
२२९१९/२२९२० चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस
२२८३३/२२८३४ भुबनेश्वर - कृष्णराजपुरम हमसफर एक्सप्रेस
२२९१३/२२९१४ वांद्रे टर्मिनस - पाटणा हमसफर एक्सप्रेस