Jump to content

साहित्य अकादमी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता साहित्य अकादमी, भारत सरकार
प्रथम पुरस्कार १९५५
शेवटचा पुरस्कार २०१७
संकेतस्थळ http://sahitya-akademi.gov.in

साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला. इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.

भाषा

[संपादन]

खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[]

आसामी, इंग्रजी, उर्दू, उडिया, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधीहिंदी.

मराठीतील पुरस्कार विजेते

[संपादन]

मराठी व इतर भाषांतील इ.स. २००८ सालचे पुरस्कार विजेते साहित्यिक

[संपादन]

कादंबरीकार

कवी

लघुकथाकार

समीक्षक

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)

[संपादन]

हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.

पुरस्कार्थी (एकूण २४)
  • अयूब साबीर
  • ओमप्रकाश ठाकुर
  • के.एम. कोथांडम
  • के. श्रीकुमार
  • जगदीश लच्छानी
  • दीनदयाल शर्मा
  • पलक्ल भट
  • पीतांबर हंसदा
  • बन्सीलाल शर्मा
  • बलराम बसाक
  • बाबा भांड (मराठी बालसाहित्यकार)
  • बाला शौरी रेड्डी
  • मनझीर आशिक हरगानवी
  • मनमोहन सिंहदाऊँ
  • मुरलीधर झा
  • योसेफ मेकवान
  • रस्किन बाँड
  • राम प्रसाद मोहंती
  • रेड्डी राघवैय्या
  • शंतनू तमूली
  • शिशुपाल शर्मा
  • सगोलसेम सिंह
  • सुधा खरांगटे
  • हरी चरण बोडो

साहित्य अकादमी सुवर्ण महोत्सवी पुरस्कार

[संपादन]

सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, साहित्य अकादमी ने भारतीय भाषांमधील अनुवादातील उत्कृष्ट काव्यरचनांसाठी खालील पारितोषिके दिली.

जीवनगौरव आणि तरुण यशासाठी सुवर्ण महोत्सवी पारितोषिक नामदेव ढसाळ, रणजीत होस्कोटे, मंदाक्रांता सेन, अब्दुल रशीद, सीतारा एस. आणि नीलाक्षी सिंग.

अधिक वाचन

[संपादन]

साहित्यातील इतर पुरस्कार

[संपादन]

पहा : पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ; ज्ञानपीठ ; पुरस्कार

बाह्य दुवे

[संपादन]

साहित्य अकादमीचे संकेतस्थळ (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

संदर्भ

[संपादन]