Jump to content

राहाता तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राहता तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख राहाता तालुका विषयी आहे. राहाता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
राहाता तालुका
राहाता तालुका
महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील राहाता तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर जिल्हा
जिल्हा उप-विभाग शिर्डी
मुख्यालय राहाता

क्षेत्रफळ ७५९.१९ कि.मी.²
लोकसंख्या २,८८,००३ (२००१)
साक्षरता दर ६८.१६

प्रमुख शहरे/खेडी लोणी, शिर्डी, पुणतांबा
तहसीलदार ए.सी.शिदें
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ शिर्डी
आमदार राधाकृष्ण विखे
पर्जन्यमान ४४१ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

राहता पूर्वी कोपरगाव तालुक्यात होता. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी कोपरगाव जिल्हा कृती समिती स्थापन केली आहे.

राहाता गावाचे आराध्य दैवत म्हणजे वीरभद्र महाराज आणि नवनाथ महाराज आहे. या देवांची जत्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या सुमारास भरत असते. आधल्या दिवशी नवनाथ महाराजांची जत्रा भरते, व दुसऱ्या दिवशी वीरभद्र महाराजांची जत्रा भरते. या दोन्ही दिवशींच्या जत्रेचे प्रतीक म्हणजे वाजत गाजत निघणारी गळवंती. पहिल्या दिवशी गळवंती वीरभद्र मंदिराकडून नवनाथ मंदिराकडे नेतात. व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिराकडून वीरभद्र मंदिराकडे नेतात. त्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोर डफाचा खेळ असतो, व त्याच बरोबर गळवंतीचा कार्यक्रमही चालत असतात.

राहाता शहर अहमदनगर -मनमाड राज्य महामार्गावर मधोमध व शिर्डीपासून ४ कि.मी. अंतरावर आहे़.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "राहता तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.