सप्त सिंधू
Appearance
सिंधू नदी व त्याच्या उपनद्यांच्या समूहाला सप्त सिंधू असे म्हणतात. वेदांमध्ये सप्त सिंधू या नावाचा वारंवार उल्लेख आहे. सप्त सिंधू मध्ये खालील नद्यांचा समावेश होतो.
- सिंधू
- झेलम
- चिनाब
- रावी
- सतलज
- बियास
- सरस्वती
यातील सरस्वती नदी ही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली आहे.