कैलास पर्वत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलास पर्वताचा उत्तरेकडचा भाग

कैलास पर्वत हे हिंदू, जैनबौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे व तिबेटाच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून चहू बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. ह्या पर्वताची उंची ६,६३८ मीटर इतकी असून सिंधू, ब्रम्हपुत्रासतलज अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात.

कैलास पर्वताचा दक्षिणेकडचा भाग

हिंदू व बौद्ध धर्मियांची या पर्वतावर आपार श्रद्धा व पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. एखाद्या प्रसिद्ध शिखरावर न झालेली चढाई हे कैलास पर्वताबाबत लक्षात घेण्याजोगे आहे.