सियाचीन हिमनदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियाचीन हिमनदीचे उपग्रहीय चित्र

सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची सरासरी उंची २२,००० फूट आहे. सियाचिन हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीन हिमनदी वर पाकिस्ताननेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने कायमस्वरूपी चौकी येथे स्थापन केली आहे. पाकिस्तानशी लष्कराशी सातत्याने चकमकी येथे होत असतात. सियाचीन हिमनदीवर अतिशय टोकाचे हवामान असल्याने बरेचसे सैनिक हवामानामुळे मृत्युमुखी पडतात.

सियाचीन हिमनदी ही काराकोरम पर्वत रांगेमध्ये स्थित आहे. याची एकूण लांबी ७० किमी इतकी असून काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे व अध्रुवीय हिमनद्यांमध्ये लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची हिमनदी आहे.35°30′N 77°00′E / 35.5, 77. सर्वात लांब अध्रुवीय हिमनदी ताजिकिस्तानची फेडचेंको हिमनदी आहे. तीची लांबी ७७ किमी इतकी आहे. भारताने जवळपास हिमनदीच्या व मुख्य हिमनदीला मिळणाऱ्या सर्व उपहिमनद्यांवर सर्व भागावर नियंत्रण स्थापन केले आहे.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

जम्मू काश्मीरच्या नकाशात सियाचीनचे स्थान

सियाचीन हिमनदीमध्ये अतिशय टोकाचे हवामान असले तरी सियाचीन या शब्दाचा अर्थ होतो की जंगली फुलांची जागा. कदाचीत खोऱ्याच्या कमी उंचीच्या भागात आढळणाऱ्या फुलांमुळे हे नाव पडले असावे.

नद्या[संपादन]

सियाचीनचे वितळणारे पाणी हे नुब्रा नदीला मिळते ही नदी पुढे श्योक नदीला मिळते जी सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी आहे. म्हणून ही हिमनदी सिंधू नदीसाठी एक महत्त्वाची उपनदी आहे. जागतिक तापमानवाढी चे परिणाम ह्या हिमनदीवरही दिसत असून हिमनदी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच मोसमी पावसाने वितळण्यास हातभार लागत आहे. असे मानले जाते की हिमनदीचा आकार गेल्या २० वर्षात ३५ टक्यांनी घटला आहे. १९८४ नंतरचे सातत्याचे युद्धही हिमनदीचे सौंदर्य बिघडवण्यास जवाबदार असल्याचे मानले जाते. [१]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. Zee News - Siachen glacier melting fast due to military activity: study