गंडकी नदी
Jump to navigation
Jump to search
गंडकी नदी तथा गंडक नदी किंवा नारायणी नदी ही नेपाळ आणि भारतातून वाहणारी मोठी नदी आहे. गंगेची उपनदी असेलली ही नदी हिमालयात उगम पावते व खोल खोऱ्यातून वाहत तराईमध्ये प्रवेश करते. या नदीचे खोरे पूर्वेच्या कोसी नदी आणि पश्चिमेच्या घाघरा नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये आहे.
या नदीचे पाणलोट क्षेत्र ४६,३०० किमी२ इतके मोठे असून त्यात धौलागिरी, मनास्लु आणि अन्नपूर्णा १ या शिखरांवरून दक्षिणेस वाहणारे पाणीही असते.