Jump to content

"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{निर्माणाधीन}}
{{निर्माणाधीन}}
आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ|year=२०००|isbn=|location=|pages=}}</ref>. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.

==नावाचा इतिहास==
==नावाचे कारण==
आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.<ref name=":0" />
आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.<ref name=":0" />
या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.<ref name=":0" />
या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.<ref name=":0" />

==आखाडसासरा-आखाडसासू==
आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे. आषाढ महिन्यात नव्या सुनेने आपल्या खऱ्या सासूसासऱ्यांचे तोंड पाहू नये असे म्हणतात, यासाठी तिला दुसऱ्या घरी राहायला पाठवतात. जेव्हा तेथील कर्ता पुरुष व त्याची पत्नी या सुनेवर जास्तच अधिकार गाजवतात, तेव्हा त्या दोघांना अनुक्रमे आखाडसासरा आणि आखाडसासू म्हणतात. त्या अनुषंगाने जेव्हा परका मनुष्य एखाद्यावर विनाकारण अधिकार गाजवू लागतो, त्या माणसाला स्वैर अर्थाने आखाडसासरा म्हणतात.

== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==
== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==

१९:३०, १४ जुलै २०१९ ची आवृत्ती

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो[]. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.

नावाचे कारण

आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.[] या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.[]

आखाडसासरा-आखाडसासू

आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे. आषाढ महिन्यात नव्या सुनेने आपल्या खऱ्या सासूसासऱ्यांचे तोंड पाहू नये असे म्हणतात, यासाठी तिला दुसऱ्या घरी राहायला पाठवतात. जेव्हा तेथील कर्ता पुरुष व त्याची पत्नी या सुनेवर जास्तच अधिकार गाजवतात, तेव्हा त्या दोघांना अनुक्रमे आखाडसासरा आणि आखाडसासू म्हणतात. त्या अनुषंगाने जेव्हा परका मनुष्य एखाद्यावर विनाकारण अधिकार गाजवू लागतो, त्या माणसाला स्वैर अर्थाने आखाडसासरा म्हणतात.

आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस

  • आषाढ शुक्ल प्रतिपदा : (१). कालिदास जयंती. (२). या दिवशी एका गुप्त नवरात्राची सुरुवात होते. (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.).
  • आषाढ़ शुक्ल द्वितीया  : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)[]
  • आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
  • आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
  • आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
  • अमावास्या- दिव्याची आवस
  • कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.
  • अधिक आषाढ महिन्यातल्या दोनही एकादशींचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे - शुक्ल एकादशीचे नाव-पद्मिनी एकादशी, कृष्ण एकादशीचे परम एकादशी)

साधारणपणे दर १९ वर्षांनी अधिक आषाढ येतो (अपवाद आहेत!). विसाव्या शतकात पहिल्यांदा सन १९१२मध्ये अधिक आषाढ आला होता. त्यानंतरचे अधिक आषाढ सन १९३१, १९५०, १९६९, १९९६, २०१५, २०३४, २०५३ या साली आले होते/येतील.

[१]जगन्नाथपुरी येथील रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते. त्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असावा अशी अपेक्षा असते, परंतु कधीकधी चंद्र पुष्यच्या ऐवजी पुनर्वसू, आर्द्रा किंवा आश्लेषा नक्षत्रातही असू शकतो. असे झाले तरी रथयात्रा मात्र शुक्ल द्वितीयेलाच सुरू होते.

रथयात्रेच्या पहिल्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात नसल्याची काही वर्षे : इ.स. २००१-२००३-२००६-२००८-२००९-२०१२-२०१४-२०१७ : पुनर्वसू

इ.स. २००४ : आर्द्रा

इ.स. २००७-२०१५ : आश्लेषा

संदर्भ

  1. ^ a b c d जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड १. भारतीय संस्कृतिकोश मंडळ.