विकिपीडिया:लेख काय आहे?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अवधूत डोंगरे लेखनविशेष

     लेखक म्हंटलं कि, साहित्यिक आपल्या मनातील अमूर्त इच्छा, आकांक्षा, भाव-भावना,कल्पना यांना मूर्त रूप देण्याचे काम हे साहित्यिक करत असतात. लेखकाचं अवघ विश्वच हे साहित्याने भरून गेलेले असते .त्याचे लहान-मोठे अनुभव हे जगद्अनुभव तर असतातच पण वाचणाऱ्यासाठी ती पुढच्या आयुष्याची शिदोरी असते .
  
    लेखकाचं भाव विश्व हे त्याचं असत. त्याच्या साहित्यात/लेखनात त्याचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं . जसं एखाद्याच्या लेखनशैलीवरून ,देहबोलीवरून किंवा वागण्यावरून व्यक्तिमत्व आपल्याला कळतं ,अगदी तसच लेखकाचं सुद्धा .त्याची गावंढळ, खेडवळ किंवा शहरी लेखणीवरून त्याच्या व्यक्तीमत्वाच प्रतिबिंब आपल्याला प्रतीत होत असतं . तो शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. आपल्या मनातील भाव -भावना,इच्छा, आकांक्षा मनातील सुप्त विचार कल्पना शब्दांच्या माध्यमातून समाजासमोर मांडत असतो .त्याची प्रत्येक साहित्यकृती ही भाषेच्या माध्यमातून साकारत असते .असे असले तरी लेखकागणिक आणि साहित्यकृतीच्या आशयागणिक प्रत्येक साहित्यकृतीची भाषा ही वेगळी असते.
     असंच एक व्यक्तीमत्व म्हणजे 'अवधूत डोंगरे ' होय. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च म्हणून ओळखला जाणारा साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित युवा साहित्य पुरस्कार 'अवधूत डोंगरे' यांच्या ' या कादंबरीला मिळाला आहे . अवधूत डोंगरे यांनी 'स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट' आणि 'एका लेखकाचे तीन संदर्भ ' या छोटेखानी आकाराने लहान पण आशयाने मोठ्या असणाऱ्या कादंबऱ्या लिहून मराठी साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे . पत्रकार संजय जोशी म्हणतात 'कोसलाच्या अर्पण पत्रिकेतील शंभरातील नव्यान्नव स्वतःला फालतू समजणारेच असतात. अशा तरुणाची मौलिक गोष्ट लिहून अवधूतने सुरुवात केली आणि साहीत्याची निर्मिती आणि तिचा असलेला जगण्याशी संबंध दुसऱ्या कादंबरीत शोधला ' डोंगरे यांनी आपल्या भूमिका ही अगदी सुरुवातीलाच 'रेघ' या ब्लॉगच्या अगदी सुरुवातीला निवेदनात स्पष्ट केली आहे की,बादशाहची रेघ शेजारी मोठी रेघ काढून लहान करणाऱ्या बिरबीलाची गोष्ट सांगून पुढे अवधूत डोंगरे लिहितात–"आता बादशाह कोण आहे ते ज्याचे त्याने ठरवावे ,त्याच्या बद्द्ल अधिक लिहून वेळ आणि शब्द खर्च करण्यात अर्थ नाही .पण असे बादशाह सगळीकडे पसरलेले आहेत.जरा आजूबाजूला बघितलं तर दिसतात. आम्ही बिरबल नाही,एवढं मात्र नक्की त्यामुळे कोणाची रेघ छोटी करण्यासाठी ही रेघ काढलेली नाही. पण बहुतेक बादशाह खोटारडे आहेत. त्याला तर काही करू शकत नाही पण आपण आपली एक रेघ मारू शकतो म्हणून ही रेघ."
     म्हणूनच वरती म्हंटल्याप्रमाणे लेखक जसं आपलं आयुष्य जगत असतो तसंच तो साहित्यात मांडत असतो .अवधूत चे लेखन ही अशाच प्रकारे मनस्वी पणे,मुक्तपणे विचार मांडणारं पत्रकारिता, लेखकपण आणि वास्तवातल्या वास्तवाचं साहित्यातल्या वास्तवात होणारं रूपांतर हेच विषय या कादंब-याचे आहेत त्यांच्या लेखनात अनुभवा बरोबरच या प्रगल्भ युगात ताजी मानसिकता असणाऱ्या आधुनिक पद्धतीने विचार करणं आणि रिऍक्ट होणं हे त्यांच्या लेखनाचे बलस्थान आहेत 
     'डोंगरे 'यांच्या 'स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट ' आणि ' एका लेखकाचे तीन संदर्भ ' या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या . त्यांची ' स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट 'ही कादंबरी अधिक लक्षणीय ठरते.याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे कादंबरीचा आशय आणि भाषेच्या बाबतीत केलेला भन्नाट प्रयोग एकूणच मराठी कादंबरीच्या आकृती बंधाची कक्षा रुंदावणारी , कादंबरीची अनवट संरचना ,पत्रकारिता आणि लेखकपण आणि वास्तवातल्या वास्तवाचे साहित्यातल्या वास्तवात होणारे रूपांतर हे आजवरच्या अवधूत च्या कादंबरीचे विषय आहेत असे दिसते अर्थात या अनुभवाबरोबरच एक तरुण ताजी मानसिकता आणि नव्या युगाच्या पद्धतीने विचार करणे हे त्यांच्या लेखनाचे बलस्थान आहे .यामध्ये त्यांची भाषिक प्रयोग शिलतापात्रनिर्मिती प्रक्रिया, मानवेतर प्राणी, अवकाश व्यापणारी भाषा आहे. क्षत्रनिर्देशक शब्द, नादमय शब्द , आणि इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो,.... तो म्हणजेकादंबरीचे  शीर्षक -'स्वतः ला फालतू समजण्याची गोष्ट' हे शीर्षक वाचलं की वाचकाला खरोखरच प्रश्न पडतो ,चेहऱ्यावर स्मितहास्य उमटते , मनात कुतुहलसुद्धा जागं होतं, वाचकाला अनेक प्रश्न पडतात .ते म्हणजे फालतू म्हणजे नेमके काय ? कोण आहे फालतू कादंबरीचा नायक की कादंबरीचा आशय .कथानकात कोणती घटना ,कोणता प्रसंग कादंबरी नायकाच्या आयुष्यात घडून गेलेला आहे की, जेणेकरून तो स्वतः ला फालतू समजायला लागलाय. स्वतः ला फालतू समजून आपलं आयुष्य संपवायचं असा विचार करायला लागलाय .पण कादंबरी वाचल्यावर वाचकाला उमगते की नावात काय आहे ?कोणत्याही लेखकाच्या साहित्य कृतीचा अंदाज आपण त्या कलाकृतीच्या शिर्षकावरून बांधू शकत नाही.डोंगरे यांची ही कादंबरी वाचली की याचा अर्थ उमगतो .