Jump to content

"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ८५: ओळ ८५:
<references />
<references />
* २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
* २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
* ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
* ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
* ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
* ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
* ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
* ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
* ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
* ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
* ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
* ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
* १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
* ११. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
* १२. सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)



{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:३२, १० फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

शिवसेना
स्थापना १९६६
मुख्यालय शिवसेना भवन, दादर, मुंबई.
युती राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन
लोकसभेमधील जागा १८/५४५[]
राज्यसभेमधील जागा ४/२४५[]
राजकीय तत्त्वे हिंदुत्व
प्रकाशने सामना
संकेतस्थळ शिवसेना.ऑर्ग

शिवसेना हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

इतिहास

१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी आणि गुजराती लोकांना मात्र भाषिक राज्य मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांतामधे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली.

शेवटी, १९६०मध्ये मुंबई प्रांत विभागून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळच्या हैद्राबाद राज्यातील तसेच मध्य प्रदेशा तील मराठी भाषक लोकसंख्या असलेला भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई प्रांतात असलेले मराठी भाषी बेळगाव-कारवार मात्र म्हैसूर प्रांतात घालण्यात आले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरवली गेली.

निवडणूक १९९५

१९९५ मध्ये सेना-भाजप युतीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.

बाळासाहेबांनंतर या पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली व ती पार पडताना त्यांच्या नेतृत्वाचा नेमका अंदाज राज्यातील लोकांना अजूनही लागलेला नाही.सत्तेत असूनही विरोधी राहणं व घेतलेला निर्णय पुन्हा माघारी घेणं तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणं हे भविष्यात शिवसेनेच्या दृष्टीने हितकारक नाहीये.

बाळासाहेबांनी या पक्षाची धुवा उद्धव ठाकरेंच्या हातात देऊन खूप मोठी चूक केली हि जनतेच्या मनावरील ठसलेली कोर मिटवण्यात अजूनही उद्धव ठाकरेंना यश मिळालेले नाहीये.

नेहमीच बाळासाहेबांच्या नावावर मते मागणे हेच राजकारण करताना सध्याचे चित्र आहे. परंतु याच बाळासाहेबांमुळे या पक्षच्या नेतृत्वाकडे अजूनही लोकांचा चांगला पाठिंबा या पक्षाला आहे.

निवडणूक चिन्ह

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

पुष्पा भावे यांची शिवेसेना आणि बाळ ठाकरे यांच्याबद्दलची मते

आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावे यांनी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोईस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरू झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.
४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेव्हा ते ध्यानात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होत आहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारे नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर होत्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग नव्हता, दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

शिवसेना गीत

आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जिवाचे रान।
पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान।।

अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा।
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।धृ।।

वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हांस
खड्ग घउनि हाती भरली हिंदुत्वाची कास।
लालकिल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास
महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास।
बस पुरे आता ना होउनि देऊ माणुसकीची दैना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।१।।

धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा
जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा।
अरे हिशेब आम्हीं ठेवत नसतो अशा भेकडांचा
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा।
अरे घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।२।।

कायापालट कोंकणचा ह्या आम्ही करुनि दावू
मराठवाण्या हिरवा शालू आम्ही नेसवुनि दावू।
अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी .......
धूळ चारुनि पुन्हा त्यांना सोने पिकवुनि दावू।
विदर्भ आमुचि शान असे अन् मान असे हो आमुची
कशी छाटुनि देऊ आम्हीं प्राण पणाला लावू।
जळगाव असे हो आमुचे जितके बेळगावही तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ।
अरे आठवा Bombayचे ह्या मुंबई आम्हीच हो केलेना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।३।।

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b (PDF) http://www.shivsena.org/Padadhikari_shivsenaN.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  • २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
  • ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
  • ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
  • ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
  • ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
  • ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
  • ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
  • ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
  • १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
  • ११. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
  • १२. सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)