बेलापूर (श्रीरामपूर तालुका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलापूर (नवी मुंबई) याच्याशी गल्लत करु नका.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख श्रीरामपूर तालुका विषयी आहे. श्रीरामपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
श्रीरामपूर तालुका
श्रीरामपूर is located in अहमदनगर
श्रीरामपूर
श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग श्रीरामपूर
मुख्यालय श्रीरामपूर

क्षेत्रफळ ५६९.८७ कि.मी.²
लोकसंख्या २,५६,४४१ (२००१)
साक्षरता दर ६९.९५

तहसीलदार श्री किशोर कदम
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ श्रीरामपूर
आमदार श्री भाउसाहेब कांबळे
पर्जन्यमान ४४८.६ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


बेलापूर (श्रीरामपूर तालुका) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हरेगाव हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या या ठिकाणी ब्रॅन्डी ॲन्ड कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज ॲन्ड अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हा कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती,. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. या कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


श्रीरामपुर जिल्हयातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ.