Jump to content

अहिल्यानगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

अहिल्यानगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील राहाता तालुका यात आहे आणि प्रसिद्ध देवस्थान शनि शिंगणापूर आणि देवगड देवस्थान या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे.

अहिल्यानगर जिल्हा
नगर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
मुख्यालय अहिल्यानगर
तालुके १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगाव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर
क्षेत्रफळ
 - एकूण १७,४१३ चौरस किमी (६,७२३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४५,४३,०८० (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १७.६७%
-साक्षरता दर ८०.२२%
-लिंग गुणोत्तर ९३९ ♂/♀
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
-लोकसभा मतदारसंघ १.अहमदनगर
२.शिर्डी
-खासदार १. निलेश लंके
२. भाऊसाहेब वाकचौरे
-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ५०१.८ मिलीमीटर (१९.७६ इंच)
प्रमुख_शहरे अहिल्यानगर, श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर श्रीगोंदा
वाहन नोंदणी महा-१६, महा-१७
संकेतस्थळ

नामांतर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.[१][२]

भौगोलिक स्थान

अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी२ असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व धाराशिव आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.

अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हणले जाते. अहिल्यानगर सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-

  • पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. कळसूबाई, जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.

  • मध्य भागातील पठारी प्रदेश

पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा, श्रीगोंदा तालुक्याचा व कर्जत तालुक्याचा काही भर यात मोडतो.

  • उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश

यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात गोदावरी, मुळा नदी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

हवामान

अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

दळणवळण

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील संंगमनेर तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहिल्यानगर- पुणे या मार्गावर. अहिल्यानगर रेल्वे स्थानक हे दौंड - मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहिल्यानगर - बीड - परळी आणि पुणतांबा- शिर्डी हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. संंगमनेरहून भंडारदरा धरणाकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

शिक्षण

विद्यापीठ

क्र.विद्यापीठाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरीhttps://mpkv.ac.in/
२संजीवनी विद्यापीठकोपरगावhttps://www.sanjivani.edu.in/

अभियांत्रिकी महाविद्यालये

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगरविळद घाट, अहिल्यानगरhttps://www.enggnagar.com
२विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालयसारोळा बद्दी,अहिल्यानगरhttps://vacoea.com Archived 2025-03-30 at the वेबॅक मशीन.
३श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयनेप्ती,अहिल्यानगरhttps://www.scoea.org
४आडसूळ टेक्निकल कॅम्पसचास,अहिल्यानगरhttps://sgvssatc.com Archived 2025-06-17 at the वेबॅक मशीन.
५प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयलोणी, राहताhttps://pravaraengg.org.in
६राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयकर्जुले हर्या,पारनेरhttps://www.rgcoe.org
७अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयअमृतनगर, संगमनेरhttps://www.avcoe.org
८विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयबोटा,संगमनेरhttps://www.vidyaniketanglobal.com Archived 2025-06-18 at the वेबॅक मशीन.
९श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानमाळवाडी,बोटा,संगमनेर
१०संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयकोपरगावhttps://sanjivanicoe.org.in[permanent dead link]
११परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयकाष्टी,श्रीगोंदाhttps://parikramaengineering.com
१२समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालयराक्षी,शेवगावhttps://www.dhakanecoe.co.in Archived 2025-08-05 at the वेबॅक मशीन.
१३अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलजीअशोकनगर,श्रीरामपूरhttp://ashokengg.co.in/

वैद्यकीय महाविद्यालय

MBBS-बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयMBBSअहिल्यानगरhttps://pahgmcahilyanagar.org/
२डॉ. विठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेजMBBSविळद घाट, अहिल्यानगरhttps://www.vimsmch.edu.in/
३प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,रूरल मेडिकल कॉलेजMBBSलोणी बुद्रुक, राहाताhttps://www.pravara.com/

BDS – बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अँड रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलBDSवडगाव गुप्ता रोड, अहिल्यानगरhttps://yashdental.org/
२प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,रूरल डेंटल कॉलेजBDSलोणी बुद्रुक, राहाताhttps://www.pravara.com/
३एस.एम.बी.टी. डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलBDSघुलेवाडी, अमृतनगर,संगमनेरhttps://dcs.smbt.edu.in/

BAMS – बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयBAMSविश्रामबाग, माळीवडा अहिल्यानगरhttp://guneayurvedahmednagar.org/ Archived 2026-07-26 at the वेबॅक मशीन.
२डॉ. एन. जे. पॉलबुधे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरBAMSनारायणडोह, अहिल्यानगर http://ayurved.sspmonline.org/
३शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरBAMSपाचेगाव, नेवासा https://www.spamcrc.in/
४पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBAMSभानसहिवरे,नेवासा https://pvbcoayurved.com/ Archived 2026-07-27 at the वेबॅक मशीन.
५प्रवरा रूरल आयुर्वेद कॉलेजBAMSलोणी बुद्रुक, राहाताhttps://www.pravara.com/
६डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरBAMSचंद्रपूर,लोणी बुद्रुक, राहाताhttps://pirensayurved.in/
७श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालयBAMSशिवाजीनगर, राहुरी फॅक्टरी, राहुरी
८सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयBAMSपिंपरणे रोड, संगमनेर खुर्दसंगमनेरhttps://siddhakala.com/
९अश्विन रूरल आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलBAMSमंची हिल, आश्वी बुद्रुकसंगमनेरhttps://www.arac.co.in/
१०डॉ. भानुदास ढेरे कॉलेज ऑफ आयुर्वेदBAMSकऱ्हे, निमोण,संगमनेरhttps://www.drdereayurvedcollege.com/
११रुख्मिणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजBAMSवेल्हाळे, राजापूर,संगमनेर
१२राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरBAMSकोकमठाण, कोपरगावhttps://bams.rjsgi.com/
१३संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि रिसर्च सेंटरBAMSखिर्डी गणेश, कोपरगावhttps://sanjivaniayurveda.org.in/
१४सौ. सुरेखाताई प्रकाश कोल्हे आयुर्वेद कॉलेज आणि रिसर्च सेंटररBAMSकोळपेवाडी, कोपरगावhttps://sspkayukolpewadi.com/
१५प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालयBAMSआखेगाव रोड, शेवगाव https://www.ayurvedpravara.com/ Archived 2026-07-28 at the वेबॅक मशीन.
१६मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरBAMSकर्जुले हर्या, पारनेर https://macharc.org.in/ Archived 2025-04-09 at the वेबॅक मशीन.

BHMS – बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSसावेडी, अहिल्यानगरhttps://www.ahmednagarhomoeopathicmedicalcollege.org/ Archived 2026-07-27 at the वेबॅक मशीन.
२काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजBHMSनागापूर, अहिल्यानगरhttps://kmhmc.org.in/
३अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSजळके-खडके,देवगड फाटा ,नेवासा https://atalbiharivajpayeehmc.com/
४वाणी पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSगणेगाव, गुहा, राहुरी
५शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSवडाळा महादेव, श्रीरामपूर
६एम.एच.एफ. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSगुंजाळवाडी, संगमनेरhttps://drsgihmc.org/[permanent dead link]
७वामनराव इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSसंगमनेरhttps://www.vihmc.org/
८राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरBHMSकोकमठाण, कोपरगावhttps://bhms.rjsgi.com/
९मातोश्री सुलोचना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलBHMSआनंदगड, विरगाव, अकोले

फार्मसी

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसीविळद घाट, अहिल्यानगरhttps://www.vikhepharmacynagar.com
२आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसीचास, अहिल्यानगरhttps://www.adsulpharmacy.com
३साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचास, अहिल्यानगरhttps://sakeshwarpharmacy.com
४अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीसोनेवाडी,केडगाव, अहिल्यानगरhttp://arihantpharmacynagar.org
५काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसीनागापूर, अहिल्यानगरhttps://kmcop.org.in Archived 2025-06-21 at the वेबॅक मशीन.
६विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसीसारोळा बड्डी, अहिल्यानगरhttps://vacop.in Archived 2025-06-21 at the वेबॅक मशीन.
७एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसीआनंद धाम रोड, अहिल्यानगरhttps://rsmcopharmacy.com Archived 2025-06-21 at the वेबॅक मशीन.
८डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीवसंत टेकडी, सावेडी,अहिल्यानगरhttp://bpharmacy.sspmonline.org Archived 2025-03-21 at the वेबॅक मशीन. http://dpharmacy.sspmonline.org Archived 2025-04-23 at the वेबॅक मशीन.
९धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेजवाळकी, अहिल्यानगर
१०मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसीसोनई,नेवासाhttps://www.mespharmacy.org
११त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेजखडके,नेवासाhttps://trimurtigraminpharmacy.com
१२पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसीभानशिवारे,नेवासा
१३शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसीपाचेगाव, नेवासा
१४श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसीशिवाजीनगर,राहुरी फॅक्टरी,राहुरीhttps://www.svnhtcop.edu.in
१५श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसीगणेगाव,राहुरीhttps://prasadgramin.com/mrs-saraswati-wani-college-of-pharmacy
१६वाणी कॉलेज ऑफ फार्मसीगणेगाव,राहुरीhttps://prasadgramin.com/wani-college-of-pharmacy
१७राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीकोकमठाण,कोपरगावhttps://pharmacy.rjsgi.com
१८संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्चकोपरगावhttps://sanjivanipharm.org.in Archived 2025-07-12 at the वेबॅक मशीन.
१९डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीकोळपेवाडी,कोपरगाव
२०प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसीप्रवरारानगर,लोणी,राहताhttps://prcop.in
२१प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीलोणी खुर्द,राहताhttps://pravara.in/institute-of-pharmacy-loni
२२आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीबोधेगाव, शेवगावhttp://www.kakadebpharmacy.in Archived 2025-08-07 at the वेबॅक मशीन.
२३श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेजढोरजलगाव-पूर्व,शेवगाव
२४मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसीकर्जुले हर्या,पारनेरhttps://mmacop.org
२५शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीधोत्रे बुद्रुक,पारनेरhttps://www.shantiniketancollegeofpharmacy.com
२६सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसीनिघोज,पारनेरhttps://web.archive.org/web/20250714055041/https://www.shraddhaedu.com/
२७डी.के. औटी कॉलेज ऑफ फार्मसीपारनेर
२८परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसीकाष्टी, श्रीगोंदाhttps://parikramapharmacy.com
२९साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीघारगाव, श्रीगोंदाhttp://saikrupapharmacy.com Archived 2025-07-19 at the वेबॅक मशीन.
३०रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीरत्नापूर, जामखेडhttps://rpcjamkhed.com
३१कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसीसाकत, जामखेड
३२मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसीवीरगाव,अकोलेhttps://www.mrcpvirgaon.education
३३प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीवडाळा महादेव, श्रीरामपूरhttps://pratibhataipawarcop.com Archived 2025-06-19 at the वेबॅक मशीन.
३४अशोक कॉलेज ऑफ फार्मसीअशोकनगर,श्रीरामपूर
३५लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीआदिनाथनगर,पाथर्डीhttps://pharmacy.dprss.in
३६अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीसंगमनेर एस. के.,संगमनेरhttps://www.amrutdpharm.org
३७अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीसंगमनेर एस. के.,संगमनेरhttps://www.amrutdpharm.co.in[permanent dead link]
३८विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटरबोटा, संगमनेरhttps://www.vidyaniketanglobal.com/pharmacy Archived 2023-07-12 at the वेबॅक मशीन.
३९डॉ. इथापे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीवेल्हाळे,संगमनेरhttps://drithapepharmacy.com
४०श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,माळवाडी,बोटा, संगमनेर
४१अश्विन कॉलेज ऑफ फार्मसीमांची हिल,संगमनेर
४२शारदा कॉलेज ऑफ फार्मसीवडगाव गुप्ता, अहिल्यानगर

शेती(एग्रीकल्चर)

क्र.महाविद्यालयाचे नावगाव, तालुकासंकेतस्थळ(वेबसाईट)
१कृषी महाविद्यालयविळद घाट, अहिल्यानगरhttps://www.vikheagrinagar.in/
२कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञानमदडगाव,अहिल्यानगर
३कृषी महाविद्यालयमदडगाव,अहिल्यानगर
४मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालयसोनई,नेवासाhttps://coasonai.com/
५कृषी महाविद्यालयभानशिवारे,नेवासाhttps://sbsbssagri.org/
६डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अ‍ॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमहात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
७कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञानलोणी बुद्रुक,राहताhttps://pravara.in/college-of-agricultural-biotechnology-loni/
८कृषी महाविद्यालयलोणी बुद्रुक,राहताhttps://pravara.in/college-of-agriculture-loni/
९कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयलोणी बुद्रुक,राहताhttps://pravara.in/business-management-loni/
१०कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीखडकेवाके ,राहता
११साईकृपा कृषी महाविद्यालयघारगाव, श्रीगोंदाhttp://saikrupabscagri.com/ Archived 2025-09-18 at the वेबॅक मशीन.
१२साईकृपा अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयघारगाव, श्रीगोंदा
१३पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय(Goverment )हळगाव,जामखेड
१४कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयमिरजगाव,कर्जत
१५सदगुरू कृषि महाविद्यालयमिरजगाव,कर्जत
१६श्रमशक्ती कृषी महाविद्यालयमालदाड,संगमनेरhttp://sevasanskarsanstha.org.in/Shramshakti%20college%20of%20Agriculture/Home.php Archived 2025-08-12 at the वेबॅक मशीन.
१७कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयमालदाड,संगमनेरhttp://sevasanskarsanstha.org.in/Sharamshakti%20Engineering%20Technology/Home.php Archived 2025-09-20 at the वेबॅक मशीन.
१८श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञानमालदाड,संगमनेरhttp://sevasanskarsanstha.org.in/Sharamshakti%20Food%20Technology/index.php Archived 2025-09-20 at the वेबॅक मशीन.
१९सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयअमृतनगर, संगमनेरhttps://www.amrutagri.assvs.org/
२०वृंदावन कृषी महाविद्यालयगुंजाळवाडी,संगमनेरhttps://drsgiagri.org/ Archived 2025-07-10 at the वेबॅक मशीन.
२१कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयगुंजाळवाडी,संगमनेरhttps://drsgilmdp.org/ Archived 2025-07-17 at the वेबॅक मशीन.

विशेष

मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहिल्यानगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.

'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने

क्र.कारखान्याचे नावगाव, तालुका
१पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,प्रवरानगर, राहता
२श्री गणेश सहकारी साखर कारखानागणेशनगर, राहाता
३मुळा सहकारी साखर कारखानासोनई, नेवासा
४लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानाभेंडा, नेवासा
५स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लि.माळेवाडी, वरखेड, नेवासा
६अगस्ती सहकारी साखर कारखाना लि.अगस्तीनगर, अकोले
७अशोक सहकारी साखर कारखाना लि.अशोकनगर, श्रीरामपूर
८डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि.शिवाजीनगर, राहुरी
९प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेडवांबोरी, राहुरी
१०सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर, संगमनेर
११श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)कवठे मलकापूर, संगमनेर
१३गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडगंगामाई, हरीनगर, शेवगाव
१३संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखानासुमननगर, बोधेगाव, शेवगाव
१४बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि.हळगाव, जामखेड
१५श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडअंबिकानगर, कर्जत
१६कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखानागौतमनगर कोळपेवाडी, कोपरगाव
१७सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी)सहजानंदनगर,शिंगणापूर कोपरगाव
१८पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेडवाळकी देऊळगाव सिद्धी, अहिल्यानगर
१९कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखानापिंपळगाव पिसा, श्रीगोंदा
२०ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)देवदैठण, श्रीगोंदा
२१गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)हिरडगाव, श्रीगोंदा
२२सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा
२३श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखानाआदिनाथनगर, पाथर्डी
२४श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेडदेवीभोयरे,पारनेर
२५कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अ‍ॅग्रो पॉवर लिमिटेड,ढवळपुरी, पारनेर

ऐतिहासिक महत्तव

पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही

मुख्य लेख: निजामशाही

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी झाले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहिल्यानगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.

भारत छोडो आंदोलन

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

राजकीय संरचना

अहिल्यानगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा झाला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ

हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा झाला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

शेती

ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

कृषी व शैक्षणिकदृष्ट्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले भंडारदरा धरण, राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील मुळा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

धार्मिक स्थळे

  • जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
  • विशाल गणपती मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
  • स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
  • श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
  • कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
  • बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
  • श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
  • रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
  • अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी
  • जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
  • दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
  • जगदंबामाता मंदिर, टाहाकरी
  • जगदंबा देवी मंदिर, राशिन
  • श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
  • भगवानगड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
  • रेणुकामाता मंदिर, केडगाव
  • शनी-शिंगणापूर
  • साईबाबा मंदिर, शिर्डी
  • पैस खांब मंदिर, नेवासा
  • वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
  • विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
  • श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
  • सिद्धटेक
  • गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
  • देवगड (नेवासा)
  • साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
  • शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
  • भगवती माता मंदिर, कोल्हार
  • वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
  • कुशाबाबा देवस्थान (सातवड)
  • ढोलेश्वर देवस्थान (सातवड)

ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे

  • अहिल्यानगर किल्ला
  • सलाबत खान कबर
  • चांदबिबी महाल
  • फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
  • धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
  • किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
  • कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.

निसर्गपर्यटन स्थळे

महत्त्वाची ठिकाणे

  • कोकमठाण - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
  • पुणतांबा - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
  • मढी - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
  • साकुरी - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
  • राळेगण सिद्धी व हिवरे बाजार - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
  • दायमाबाद- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
  • राशिन - श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.

  1. अकोले (संगमनेर उपविभाग)
  2. कर्जत (कर्जत उपविभाग)
  3. कोपरगाव (संगमनेर उपविभाग)
  4. जामखेड (कर्जत उपविभाग)
  5. नगर (अहिल्यानगर उपविभाग)
  6. नेवासा (श्रीरामपूर उपविभाग)
  7. पाथर्डी (अहिल्यानगर उपविभाग)
  8. पारनेर (अहिल्यानगर उपविभाग)
  9. राहाता (श्रीरामपूर उपविभाग)
  10. राहुरी (श्रीरामपूर उपविभाग)
  11. शेवगाव (अहिल्यानगर उपविभाग)
  12. श्रीगोंदा (अहिल्यानगर उपविभाग) नवीन रचनेनुसार
  13. श्रीरामपूर (श्रीरामपूर उपविभाग)
  14. संगमनेर (संगमनेर उपविभाग)

नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहिल्यानगर येथे स्थापण्यात आले आहे.

अहिल्यानगर शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत छत्रपती शाहू महाराज यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.

तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अहिल्यानगर शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.

स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.

संदर्भ

  1. ↑ "Ahilyanagar District website".
  2. ↑ "Times of india".