नाना फाल्गुनराव पटोले
Appearance
(नानाभाऊ पाटोळे या पानावरून पुनर्निर्देशित)
नाना फाल्गुनराव पटोले नानाभाऊ पटोले | |
विद्यमान | |
पदग्रहण १ डिसेंबर, इ.स. २०१९ | |
मतदारसंघ | भंडारा-गोंदिया |
---|---|
जन्म | ५ जून, इ.स. १९६३ |
राजकीय पक्ष | भारतीय काँग्रेस |
निवास | सुकळी, तालुका - साकोली, जिल्हा - भंडारा |
धर्म | हिंदु |
नाना फाल्गुनराव पटोले (नानाभाऊ नावाने प्रसिद्ध) हे भारतीय काँग्रेस सदस्य आहेत. पाटोळे ह्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले. त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला. ८ डिसेंबर २०१७ला त्यांनी शेतकरी व इतर मागास वर्गाच्या प्रश्नावर लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे व इतर मागास वर्गावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी राजीनामा दिला.