Jump to content

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही भारत सरकारची तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठीची एक योजना आहे.

ही योजना २५ सप्टेंबर २०१४ला नितीन गडकरीव्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेसाठी दीनदयाल उपाध्याय यांच्या ९८व्या जयंतीचे निमित्त साधण्यात आले. या योजनेद्वारे १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. १५०० कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत. या योजनेमुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यांत पैसे थेट जमा करण्याची सोय आहे.[ संदर्भ हवा ]

या योजेअंतर्गत खाजगी शिक्षण व प्रशिक्षण तज्ञांना प्रशिक्षण स्थापन करण्यास निधी दिला जाईल.

या योजनेअंतर्गत जम्मू काश्मीर व्यक्तीसाठी हिमायत व नक्षल प्रभावित व्यक्तीसाठी रोशनी नावाचा उपक्रम चालवला जातो

By किरण जाधव.