दीनदयाल उपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंडित दीनदयाल उपाध्याय (२५ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११ फेब्रुवारी, इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

कार्य[संपादन]

पं. दीनदयाल उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये ते प्रचारक झाले. साधी राहाणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतन मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा मांडला व सिद्धांत भारतीय समाजाला अर्पण केला.

हत्या[संपादन]

फेब्रुवारी ११ इ.स. १९६८ रोजी त्यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या झाली. बेगूसराय स्टेशनच्या रुळाजवळ त्यांचे शव आढळले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.