नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ নেতাজি সুভাষচন্দ্র বসু আন্তর্জাতিক বিমানবন্দর डमडम विमानळ | |||
---|---|---|---|
नवे टर्मिनल १ | |||
आहसंवि: CCU – आप्रविको: VECC
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | कोलकाता | ||
स्थळ | उत्तर २४ परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल | ||
हब | एर इंडिया स्पाइसजेट ब्ल्यू डार्ट एव्हिएशन जेटकनेक्ट | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १६ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 22°39′17″N 88°26′48″E / 22.65472°N 88.44667°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
01L/19R | 2,285 | 7,497 | डांबरी |
01R/19L | 3,660 | 12,008 | डांबरी |
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ▲ १,०१,००,२३२ | ||
विमान उड्डाणे | ९२,८७१ |
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे.
डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे.
इतिहास
[संपादन]कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीन व ऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली
गंतव्यस्थाने
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-07-30 at the Wayback Machine.
- ^ "Etihad Airways expands India operations with new flights to Kolkata". 10 July 2014. 2014-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 July 2014 रोजी पाहिले.