एरएशिया
|
| ||||
| ||||
| स्थापना | १९९३ | |||
|---|---|---|---|---|
| हब | क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (क्वालालंपूर) | |||
| मुख्य शहरे | सिंगापूर चांगी विमानतळ (सिंगापूर) | |||
| उपकंपन्या |
| |||
| विमान संख्या | १६९ | |||
| ब्रीदवाक्य | Now Everyone Can Fly | |||
| मुख्यालय | क्वालालंपूर, मलेशिया | |||
| प्रमुख व्यक्ती | टोनी फर्नांडिस | |||
| संकेतस्थळ | www.airasia.com | |||

एरएशिया ही आग्नेय आशियाच्या मलेशिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशियामधील अनेक देशांमध्ये उपकंपन्या चालवणाऱ्या एरएशियाद्वारे २२ देशांमधील सुमारे १०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
सरासरी ०.०२३ अमेरिकन डॉलर प्रति किलोमीटर इतक्या कमी दरात विमानप्रवास उपलब्ध करून देणारी एरएशिया जगातील सर्वात स्वस्त विमानसेवा आहे. नोव्हेंबर १९९६ मध्ये एरएशियाची विमानसेवा चालू झाली. २ डिसेंबर २००१ रोजी ११ दशलक्ष डॉलर्स इतक्या रकमेने कर्जबाजारी झालेली एरएशिया कंपनी मलेशियन उद्योगपती टोनी फर्नांडिस ह्याने १ मलेशियन रिंगिट ह्या किंमतीस विकत घेतली. फर्नांडिसने कंपनीमध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणल्या व एरएशियाला पुन्हा नफ्याच्या मार्गावर नेले. एरएशियाने मलेशिया एरलाइन्स ह्या प्रतिस्पर्धी कंपनीचे वर्चस्व कमी करण्यासाठी अनेक नवे मार्ग चालू केले व प्रवासदरांमध्ये लक्षणीय घट केली. २००३ साली एरएशियाने आंतरराष्ट्रीय विमानसेवेस प्रारंभ केला.
एरएशियाचे आसपासच्या प्रदेशांमध्ये संलग्न विमान कंपन्यांचे जाळे आहे. यामध्ये थाई एरएशिया, इंडोनेशिया एरएशिया, फिलिपिन्स एरएशिया आणि एरएशिया कंबोडिया या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे तळ अनुक्रमे बँकॉक, जकार्ता, मनिला आणि पनोम पेन या शहरांमध्ये आहेत. एरएशिया एक्स ही उपकंपनी प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या मार्गांवर सेवा देते. प्रवासी सेवांव्यतिरिक्त एरएशिया टेलिपोर्ट नावाचा मालवाहतूक विभाग चालवतेते. एकत्रितपणे या विमान कंपन्या दक्षिण-पूर्व आशियाला आशियाच्या इतर भागांशी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेशी जोडणारे एक विस्तृत जाळे तयार करतात.
उपकंपन्या
[संपादन]एरएशिया इंडिया
[संपादन]भारत सरकारने नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी दिल्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये एरएशियाने भारतामध्ये विमानसेवा चालू करण्याची प्रक्रिया सुरू केली. १९ फेब्रुवारी २०१३ रोजी एर एशियाचा 49 %, टाटा उद्योगसमूहाचा 30%, आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लसचा 21% वाटा असलेली एरएशिया इंडिया नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. बंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रमुख हब असलेल्या एरएशिया इंडियाच्या विमानसेवेस १२ जून २०१४ रोजी प्रारंभ झाला.
गंतव्यस्थाने
[संपादन]२००१ मध्ये किफायतशीर विमानकंपनी म्हणून आपले अस्तित्त्व केल्यापासून एरएशियाने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा वेगाने विस्तार केला आहे. विमान कंपनीचे मुख्य हब क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KLIA) स्थित आहे, कंपनीच्या बहुतांश विमानांचे उड्डाणसंचालन येथून होते. एरएशियाचे मलेशियामधील देशांतर्गत जाळे अनेक शहरे आणि प्रादेशिक केंद्रांना जोडते. क्वालालंपूर, पेनांग, कोटा किनाबालू आणि कुचिंग ही यातील प्रमुख गंतव्यस्थाने आहेत.
एरएशिया आग्नेय आशिया आणि त्यापलीकडे अनेक मार्ग चालवते; ज्यामध्ये थायलंड, इंडोनेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि चीन यांसारख्या देशांमधील गंतव्यस्थानांचा समावेश आहे. या विमान कंपनीने भारत आणि ऑस्ट्रेलियासह इतर प्रदेशांमध्येही विस्तार केला आहे. या व्यापक जाळ्यामुळे एरएशियाला व्यावसायिक आणि पर्यटक दोन्ही प्रकारच्या प्रवाशांची सोय करून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान मिळवणे शक्य झाले आहे.
इंटरलाइन करार
[संपादन]विमानताफा
[संपादन]सध्याचा ताफा
[संपादन]
ऑगस्ट २०२५मध्ये एरएशिया खालील विमानांचा वापर करीत होती:[२]
| विमान | सेवेमध्ये | खरेदीवर | प्रवासी संख्या | नोंदी | ||
|---|---|---|---|---|---|---|
| एरबस ए३२०-२०० | ६९ | — | १८० | ४ माजी मायएरलाइन विमाने | ||
| १८६ | ||||||
| एरबस ए३२० निओ | २९ | — | १८६ | |||
| एरबस ए३२१ एलआर | — | ३६ | ठरायचे आहे | २०२५ पासून मिळणार आहेत.[३] | ||
| एरबस ए३२१ एक्सएलआर | --- | ५०[४] | जाहीर केले जाईल | २० पर्यायी (options). | ||
| एरबस ए३२१ निओ | ८ | ३२३[५] | २३६ | |||
| टेलिपोर्ट ताफा | ||||||
| एरबस ए३२१-२००/P2F | ३ | —[६] | मालवाहतूक | 9M-TLA, 9M-TLB आणि 9M-TLP | ||
| एकूण | १०९ | ४०९ | ||||
खासगी विमाने
[संपादन]| विमान | सेवेमध्ये | ऑर्डर्स | प्रवासी संख्या | नोंदी |
|---|---|---|---|---|
| बाँबार्डियर ग्लोबल एक्सप्रेस | १ | ० | १३ | 9M-CJG |
| एकूण | १ | ० | १३ |
निवृत्त विमाने
[संपादन]| विमान | एकूण | ताफ्यात सामील | निवृत्त | पर्यायी विमान | नोंदी |
|---|---|---|---|---|---|
| बोईंग ७३७-३०० | ३२ | १९९६ | २००९ | एरबस ए३२०-२०० | |
| बोईंग ७४७-२००बी | २ | २००० | २००० | काहीही नाही | टॉवर एर कडून भाड्याने घेतले होते. |
| ३ | २००३ | २००३ | एर अटलांटा आइसलँडिक आणि युरोपियन एव्हिएशन एर चार्टर कडून भाड्याने घेतले होते. | ||
| मॅकडोनेल डग्लस एमडी-११ईआर | १ | १९९९ | २००० | वर्ल्ड एरवेझ कडून भाड्याने घेतले होते. |
अपघात व दुर्घटना
[संपादन]- २८ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरबयाहून सिंगापूरकडे निघालेले इंडोनेशिया एरएशिया फ्लाइट ८५०१ गायब झले.
बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ↑ "AirAsia Plans To Interline With Full-Service Carrier In 2025 | Aviation Week Network". aviationweek.com.
- ↑ "Global Airline Guide 2025 - AirAsia". Airliner World. September 2025. p. 66.
- ↑ "A321LR joins AirAsia's Airbus order book". The Edge Malaysia. 22 February 2024. 10 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Long-range jet deal to revive AirAsia's plans to fly to the US, Europe — Fernandes". The Edge Malaysia. 2025-07-05. 2026-04-03 रोजी पाहिले.
- ↑ Airbus Orders and Deliveries (XLS), monthly updated, accessed via "Orders & deliveries". Airbus. Airbus SAS. 16 June 2021. 2 September 2023 रोजी पाहिले.
- ↑ "AirAsia Group eyes growth, 19 more aircraft in 2023". ch-aviation.com. 25 June 2023.
