Jump to content

कॅथे ड्रॅगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ड्रॅगनएर या पानावरून पुनर्निर्देशित)

हॉंगकॉंग ड्रॅगनएर एरलाइन्स लिमिटेड ही हाँग काँगस्थित आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी कॅथे ड्रॅगन नावाने धंदा करते. या कंपनीचे पूर्वीचे नाव ड्रॅगनएर होते[१] संपूर्णपणे कॅथे पॅसिफिकच्या मालकी असलेल्या कॅथे ड्रॅगनचे कॉर्पोरेट मुख्यालय कॅथे ड्रॅगन हाऊस आणि मुख्य केंद्र हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.[२] ३० ऑक्टोबर २०१३ च्या माहितीनुसार ही विमानकंपनी आशियातील ४४ शहरे आणि १३ देशांमध्ये प्रवासी सेवा पुरवित आहे. तसेच कंपनीची ३ मित्रकंपन्यांद्वारे इतर मार्गांवर सेवा देते. कॅथे ड्रॅगनकडे एरबसच्या ४१ विमानांचा ताफा आहे, ज्यात ए-३२०, ए-३२१, ए-३३० आणि बोईंगच्या ७४७ (कार्गो) विमानांचा समावेश आहे. कॅथे ड्रॅगन ही वन वर्ल्ड विमानसंघाची संलग्न सदस्य आहे. या कंपनीची स्थापना २४ मे, १९८५ रोजी चाओ कुआंग पीउ यांनी केली. ते सध्या कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत. जुलै १९८५ मध्ये हवाई वाहतुकीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर कंपनीने पहिल्यांदा कोटा किनाबलु, मलेशिया या शहराला पहिले उड्डाण केले. २०१० पर्यंत ड्रॅगनएर आणि तिची मुख्य कंपनी कॅथे पॅसिफिकच्या मिळून १,३८,००० उड्डाणे, जवळपास २ कोटी ७० लाख प्रवाशांची आणि १.८ अब्ज कि.ग्रॅ. पेक्षा जास्त मालाची वाहतूक झालेली होती.[३]

इतिहास[संपादन]

सुरुवातीचा काळ[संपादन]

विमान कंपनीची स्थापना हॉंगकॉंगमध्ये २४मे १९८५ रोजी कुआंग पिउ चाओ, जे सध्याचे मानद अध्यक्ष आहेत; यांच्या पुढाकाराने हॉंगकॉंग-मकाऊ इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीची उपकंपनी म्हणून झाली होती. जुलै,१९८५ मध्ये हॉंगकॉंग सरकारकडून हवाई वाहतूक प्रमाणपत्र मिळाल्यावर, बोईंग ७३७-२०० सह काई टाक आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मलेशियामधील कोटा किनाबलु आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंतच्या सेवेसह कंपनी कार्यरत झाली. १९८६ मध्ये फूकेट, थायलंड तसेच मेनलॅंड चायना मधील ६ दुय्यम दर्जाच्या शहरांमध्ये कंपनीची नियमितपणे चार्टर तत्त्वावर सेवा सुरू झाली. १९८७ साली कंपनीने, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची सदस्य असणारी पहिली हॉंगकॉंग स्थित कंपनी होण्याचा मान मिळविला.

गेल्या ४० वर्षात हॉंगकॉंगची सगळ्यात मोठी विमानकंपनी, कॅथे पॅसिफिक साठी ड्रॅगनएर पहिली स्थानिक प्रतिस्पर्धी कंपनी होती; आणि तेव्हापासूनच कॅथे पॅसिफिकने, ड्रॅगनएरचे फ्लाईट स्लॉटस ब्लॉक करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. जानेवारी १९८७ मध्ये कंपनीने दोन लांब पल्ल्याचे McDonnell Douglas MD-11 विमाने घेऊन विस्तार केला. नंतर हॉंगकॉंगच्या हवाई वाहतूक लायसेन्सिंग ऑथोरिटीच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर हॉंगकॉंगच्या सरकारने एक मार्ग एक कंपनी हे धोरण लागू केले. जे कि २००१ पर्यंत लागू होते. कंपनीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रभावशील मार्ग मिळत नव्हते. कंपनीसाठी सगळ्यात नुकसानदायक बाब ही होती कि, हॉंगकॉंगचे तेव्हाचे आर्थिक सचिव सर जॉन ब्रेम्रीज, हे कॅथे पॅसिफिकचे माजी अध्यक्ष होते.[४] नंतर काही काळाने कॅथे पॅसिफिकने जगातील इतर भागातील बाजारपेठ मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले व अविकसित मेनलॅंड चायना ड्रॅगनएरसाठी सोडून दिला. कमी फायदेशीर मार्ग स्वीकारणे भाग पडल्यामुळे कंपनीने मेनलॅंड वर लक्ष केंद्रित केले.

जानेवारी १९९० मध्ये कॅथे पॅसिफिक, स्वायर ग्रुप आणि CITIC पॅसिफिकने कंपनीचे ८९% शेअर्स घेतले, ज्यात CITIC पॅसिफिकचा हिस्सा ३८% होता; त्याचवेळी कंपनीचे अध्यक्ष कुआंग पिउ चाओ ह्यांच्या परिवाराचा हिस्सा २२% वरून ६% झाला. मालकीत बदल झाल्याच्या परिणामास्तव कॅथे पॅसिफिकचे दोन मार्ग बीजिंग आणि शांघाय हे ड्रॅगनएरला मिळाले. तसेच Lockheed L-1011 TriStar भाडेतत्त्वावर मिळाले. मार्च १९९३ मध्ये कंपनीच्या विमान ताफ्यात पहिले एरबस A-३२० सामील झाले आणि डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडे एकूण ६ A-३२० विमाने होती.

२८ सप्टेंबर २००६ रोजी, कॅथे पॅसिफिक, स्वायर ग्रुप, CITIC पॅसिफिक, एर चायना, आणि चायना राष्ट्रीय विमानचालन महामंडळ गट यांच्यात झालेल्या शेअर्सच्या पुनर्गठन नंतर, ड्रॅगनएर ही कॅथे पॅसिफिकची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी झाली.[५]

जानेवारी २०१६ मध्ये, कॅथे पॅसिफिकने ड्रॅगनएरचे नाव बदलून कॅथे ड्रॅगन करीत असल्याचे घोषित केले.[६] कॅथे ड्रॅगन हे नाव २१ नोव्हेंबर २०१६ पासून कार्यरत झाले.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दि वर्ल्ड'स बेस्ट एरलाईन्स इन २०१४". Archived from the original on 2016-11-12. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "हेड ऑफिस - हाँग काँग ऑफिस".
  3. ^ "कॅथे पॅसिफिक रिलिझेस कॉम्बिनेड ट्रॅफिक फिगर्स फॉर डिसेंबर २००९". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "हाँग काँग एरलाइनस लिमिटेड हिस्टरी". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "ड्रॅगनएर एरलाईन्स सर्विसेस". Archived from the original on 2013-09-13. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "टू अवॉर्ड-विंनिंग एरलाईन्स, वन एन्हान्सड ट्रॅव्हल एक्सपेरियन्स - ड्रॅगन एर इज नाऊ कॅथे ड्रॅगन". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "ड्रॅगनएर इज नाऊ कॉल्ड कॅथे ड्रॅगन".