जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
| जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ सांगानेर विमानतळ जयपुर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा | |||
|---|---|---|---|
| आहसंवि: JAI – आप्रविको: VIJP | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| कोण्या शहरास सेवा | ,जयपूर | ||
| स्थळ | सांगानेर, राजस्थान, भारत | ||
| समुद्रसपाटीपासून उंची | १,२६३ फू / ३८५ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | 26°49′27″N 075°48′44″E / 26.82417°N 75.81222°E | ||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०९/२७ | ९,१७७ | २,७९७ | कॉंक्रिट/डांबरी |
| १५/३३ | ५,२३३ | १,५९२ | डांबरी धावपट्टी |
जयपूर विमानतळ (आहसंवि: JAI, आप्रविको: VIJP) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळ असलेला विमानतळ आहे.यास सांगानेर विमानतळ असेही म्हणतात.हे जयपूरहुन १३ किमी (८.१ मैल) दुर असून सांगानेर या गावाजवळ आहे.हे राजस्थान या राज्यात असलेला एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
२९ डिसेंबर, २००५ रोजी या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिला गेला. येथे एकाच वेळी ४ ए३२० प्रकारची विमाने उभी राहू शकतात. नवीन टर्मिनल इमारतीमध्ये एकाच वेळी ५०० प्रवाशांची सोय होऊ शकते.
इमारत
[संपादन]जयपूर विमानतळाच्या नवीन देशांतर्गत[१] टर्मिनल इमारतीचे उद्घाटन १ जुलै २००९ रोजी करण्यात आले.[२] २२,९५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे नवीन टर्मिनल काच आणि पोलादाच्या संरचनेतून बनलेले असून येथे प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये मध्यवर्ती वातानुकूलन, सामान तपासणी प्रणाली, आलेले सामान उचलण्यासाठीची व्यवस्था, सरकते जिने, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, विमान उड्डाण माहिती प्रदर्शन प्रणाली-, पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, अनेक विमानकंपन्यांना वापरता येणारी चेक-इनची व्यवस्था आणि वाहनतळ इत्यादींचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय टर्मिनल इमारतीची क्षमता गर्दीच्या वेळी ५०० प्रवासी हाताळण्याची आणि वार्षिक ४ लाख प्रवासी हाताळण्याची आहे.
विमानतळाचे प्रवेशद्वार सँडस्टोन आणि धोलपूर दगडांनी बनलेले असून भिंतींवरील राजस्थानी चित्रे पर्यटकांना राजस्थानी संस्कृतीची झलक दाखवतात. इमारतीच्या दोन्ही बाजूंना असलेली दोन कारंजी आणि तेथील ताडाची झाडे विमानतळ परिसरातील तापमान कमी राखण्यास मदत करतात. इमारतीच्या पारदर्शक बाजूच्या भिंतींवर वरखाली करता येण्यासारखे पडदे बसवण्यात आले आहेत, यामुळे सूर्यप्रकाश आणि गरमीचे नियंत्रण होउन वातानुकूलन आणि विजेच्या खर्चात मोठी बचत होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]प्रवासी
[संपादन]तुम्हाला या व्यतिरि
संदर्भ
[संपादन]- ↑ "New domestic terminal set for take-off on 1 July". The Times of India.
- ↑ "Passengers welcomed on Terminal-2". The Times of India.
- ↑ साचा:OAGWorldMay2025Ref
- ↑ "Air India boosts flights in winter schedule". 20 October 2025. 22 October 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Our Network". Air India Express. 29 October 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Introducing direct flights between Guwahati and Jaipur from 12 August 2024". Air India Express. 12 July 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Air India Express NS25 Domestic Network Additions – 20APR25". Aeroroutes. 21 April 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Jaipur to Kullu Flight Commencement". 14 October 2024.
- ↑ साचा:OAGWorldAug2025Ref
- ↑ "Etihad further expands NS24 operations from June 2024".
- 1 2 3 "INDIGO 1H23 DOMESTIC ROUTES ADDITION SUMMARY – 05MAR23". Aeroroutes. 7 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "IndiGo to launch 2nd Route from Dharamshala, From April 2, the airline will connect Chandigarh to Dharamshala". JetArena. 22 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Goa's 2nd international airport starts operations, first flight lands from Hyderabad". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 5 January 2023. 5 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ Sengupta, Joy (21 August 2023). "IndiGo announces connectivity to Jaisalmer". The Times of India (इंग्रजी भाषेत). 22 August 2023 रोजी पाहिले.
- ↑ "IndiGo announces new Jodhpur-Jaipur flight to boost domestic connectivity". Moneycontrol. 16 January 2023. 16 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ "IndiGo to commence flight operations for Navi Mumbai International Airport on December 25". 15 November 2025. 15 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Cherian, Dona (21 November 2023). "Oman's SalamAir launches routes to five destinations in India". Gulf News (इंग्रजी भाषेत). 23 November 2023 रोजी पाहिले.
- ↑ "SpiceJet adds another Ahmedabad-Jaipur direct flight". deshgujarat. 16 November 2024. 16 November 2024 रोजी पाहिले.
- ↑ "SpiceJet adds Pune service". SpiceJet. 11 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ "SpiceJet Adds Prayagraj Service in 1Q25". Aeroroutes. 2 January 2025.
- ↑ साचा:OAGWorldAug2025Ref
बाह्य दुवे
[संपादन]- जयपूर विमानतळ Archived 2011-06-14 at the वेबॅक मशीन., भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या अधिकृत संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
- विमानतळ माहिती वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६. (इंग्लिश मजकूर)
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा (इंग्लिश मजकूर)
