गांधारपाले बौद्ध लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गांधारपाले बौद्ध लेणी,महाड.

हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे.हि लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत.यांचा ताबा भारतीय पुरातत्व विभागा कडे आहे.

Gandhapale caves inside.jpg

माहिती:

येथिल शिलालेखा नुसार हि लेणी बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांच्या कारकिर्दित ई.स. १३० च्या आसपास निर्माण केली गेली.

हा एकुण ३० लेण्यांचा समुह असुन ३ चैत्यगृह व १९ विहार आहेत.लेणे क्र.१ मधे ५३ फुट लांब व ८ फुट रुंद ओसरी आहे.गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत.

लेणे क्र.२१ में गौतम बुद्ध यांची बसलेली मुर्ती,त्यांचे शिष्य व हरिणाची चित्र कोरली आहेत.[१]

Gandhapale caves inscription.jpg

येथिल शिलालेखा नुसार ई.स. बौद्ध संघाला सावकारांकडुन देणगी व जमिनी मिळाल्याची नोंद आहे.

ऐतिहासिक व पर्यटन या दोन्हि दृष्टिने हि लेणी महत्वपूर्ण आहेत.

राजा पुलित याच्या नावावरुन पाले हे गावाचे नाव रुढ झाले.

कसे जाल:

गांधारपाले हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर (NH 17) महाड शहरा लगत आहे.मुंबई पासुन अंतर १७५ कि.मी.

डोंगरावर कोरलेली हि लेणी महामार्गाला लागुनच असुन वर जायला पायरी मार्ग आहे.

  1. ^ Ahir, D. C. (2003). Buddhist sites and shrines in India : history, art, and architecture (1st ed ed.). Delhi: Sri Satguru Publications. ISBN 81-7030-774-0. OCLC 52722049.CS1 maint: extra text (link)