Jump to content

के.डी. सिंह बाबू स्टेडियम (लखनौ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के डी सिंग बाबु स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
के.डी. सिंग बाबू स्टेडियम
मैदान माहिती
स्थान हजरतगंज, लखनौ, उत्तर प्रदेश
स्थापना १९५७
आसनक्षमता २५,०००
मालक उत्तर प्रदेश सरकार[]
यजमान उत्तर प्रदेश क्रिकेट संघ, लखनौ फुटबॉल क्लब

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. १८-२२ जानेवारी १९९४:
भारत  वि. श्रीलंका
एकमेव ए.सा. २७ ऑक्टोबर १९८९:
पाकिस्तान वि. श्रीलंका
शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

लखनौचे के.डी. सिंग बाबू स्टेडियम, हे पूर्वी सेंट्रल स्पोर्ट्‌स स्टेडियम म्हणून ओळखले जात असे.[] ह्या स्टेडियमला लोकप्रिय भारतीय हॉकी खेळाडू के.डी. सिंग ह्याचे नाव देण्यात आले आहे.

सदर मैदान १९५७ साली तयार झाले. लखनौ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या हजरतगंजनजीक हे मैदान वसलेले आहे. मैदानाची आसनक्षमता २५,००० इतकी असून दिवस-रात्र सामन्यांसाठी लागणारी प्रकाशदिव्यांची सोय ह्या मैदानावर नाही. हे मैदान उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे.[] मैदानावर स्थानिक सामने नियमितपणे होतात. ह्या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळवले गेले आहेत, त्याशिवाय सदर मैदान स्थानिक आणि काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठीसुद्धा वापरले गेले आहे. ह्या मैदानावर असोसिएशन फुटबॉल सामने खेळवले जातात.

सोयी

[संपादन]

के.डी. सिंग बाबू मैदान हे लखनौचे मुख्य क्रीडा केंद्र आहे,[] ह्या केंद्रावर खालील सुविधा उपलब्ध आहेत:

  • जलतरण संकुल[]
  • इनडोअर क्रीडा संकुल []
  • सिंथेटिक टेनिस कोर्ट []

नोंदी

[संपादन]

क्रिकेट

[संपादन]

के.डी. सिंग बाबू मैदानावर पुढील आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले :

  • १९८९ मध्ये, एमआरएफ वर्ल्ड सिरिज (नेहरु चषक) स्पर्धा. पाकिस्तानने श्रीलंकेचा सहा धावांनी पराभव केला. इम्रान खान सामनावीर होता. हा ह्या मैदानावर खेळवला गेलेला एकमेव एकदिवसीय सामना होता.[]
  • १९९३/९४ च्या मोसमात, श्रीलंकेच्या भारतीय दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि ११९ धावांनी जिंकला. ह्या मैदानावर पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाने खेळलेला हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. नयन मोंगियाने कसोटी पदार्पण केले आणि सामनावीर म्हणून अनिल कुंबळेला घोषित करण्यात आले. ५-दिवसीय कसोटी असूनही सामन्याचा ४था दिवस (२१ जानेवारी १९९४) विश्रांती घेतली गेली []
  • महिला क्रिकेटमध्ये, मैदानावर भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड क्रिकेट संघाचे कसोटी सामने झाले आहेत. पहिला महिला कसोटी सामना २१ नोव्हेंबर (वर्ष?) रोजी सुरू झाला आणि शेवटचा कसोटी सामना १४ जानेवारी २००२ रोजी संपला.[]
  • महिला क्रिकेटमध्ये, मैदानावर भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे एकदिवसीय सामने झाले आहेत. पहिला सामना ५ डिसेंबर १००५ (??) तर शेवटचा सामना १ डिसेंबर २००५ रोजी खेळवला गेला.[]

विक्रम आणि आकडेवारी

[संपादन]

महिला क्रिकेटमध्ये, ह्या मैदानावर भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळत असताना पहिल्या दिवशी इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर कॅरोलिन ॲट्किन्स आणि ॲरन ब्रिंडल यांनी इंग्लंडतर्फे सलामीच्या भागीदारीचा विश्वविक्रम मोडीत काढत १५० धावांची भागीदारी केली.[१०][११][१२]

मैदानावर उभारली गेलेली सर्वात मोठी धावसंख्या सर्वबाद ५११ भारताने केली होती. भारताच्या सचिन तेंडुलकरने येथे सर्वात जास्त १४२ धावा केल्या आहेत तर ह्या मैदानावर सर्वात जास्त ५ बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथिया मुरलीधरनच्या नावे आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावर पाकिस्तानने सर्वात जास्त २१९/६ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानी खेळाडू इम्रान खानच्या नावे आहे (८४ धावा). तर पाकिस्तानच्याच वसिम अक्रम, अब्दुल कादिर आणि अक्रम रझा ह्यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

  1. ^ शशांक, किशोर. "प्रवीण, भुवनेश्वर आणि मीरतची उन्नती". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ भुषण, रवी. रेफरन्स इंडिया: ए-एफ, व्हाॅल्यूम १ ऑफ रेफरन्स इंडिया: बायोग्राफिकल नोट्स ऑन मेन अँड विमेन ऑफ अचिव्हमेंट ऑफ टुडे अँड टुमॉरो. २००३. p. ३४२.CS1 maint: location (link)
  3. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/ground/58273.html
  4. ^ a b c "लखनौ बद्दल". ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ उत्तरा प्रदेश. उत्तर प्रदेश. p. १५४.
  6. ^ http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65928.html
  7. ^ http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63631.html
  8. ^ http://stats.espncricinfo.com/ci/engine/ground/58273.html?class=8;template=results;type=aggregate;view=innings
  9. ^ http://stats.espncricinfo.com/ci/engine/ground/58273.html?class=9;template=results;type=aggregate;view=innings
  10. ^ http://www.espncricinfo.com/england/content/story/115543.html
  11. ^ http://www.espncricinfo.com/england/content/story/115528.html
  12. ^ http://stats.espncricinfo.com/women/content/records/283607.html