Jump to content

इंका साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंका या पानावरून पुनर्निर्देशित)
इन्का साम्राज्य
[[चित्र:|150 px]]

१४३८ - १५३३
राजधानी कुस्को, पेरू
राजे १४३८ - १४७१ पाचाकुती
१४७१ - १४९३ तुपाक इंका युपांक्वी
१४९३ - १५२७ हुय्ना कापाक
१५२७ - १५३२ वास्कार
१५३२ - १५३३ अतावाल्पा
भाषा क्वेचुआ
क्षेत्रफळ सुमारे ८,००,००० वर्ग किमी
लोकसंख्या सुमारे १,२०,००,००० (१४३८)

इन्का साम्राज्य हे लॅटिन अमेरिकेतील एक ऐतिहासिक साम्राज्य होते. आजच्या पेरू देशातील कुस्को ही इन्का साम्राज्याची राजधानी होती. इ.स. १४३८ ते १५३३ दरम्यान इन्का ह्या दक्षिण अमेरिकेतील जमातीने दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिमेकडील बऱ्याचशा भागावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. १५२६ साली स्पॅनिश खलाशी ह्या भागात पोचले व त्यानंतरच्या काही वर्षांत इन्का साम्राज्याचा अस्त झाला

आजही माक्सू पिक्त्सू येथे इन्का साम्राज्याचे भग्न अवशेष पाहायला मिळतात.

या साम्राज्याची अधिकृत भाषा क्वेचुआ होती परंतु शेकडो क्वेचुआच्या अपभ्रंशित भाषा येथे बोलल्या जात असत. इंका त्यांच्या साम्राज्याचा उल्लेख तावान्तिन्सुयु म्हणजे चार प्रदेश अशाप्रकारे करत असत.

इंका त्यांच्या साम्राज्याचा उल्लेख तावान्तिन्सुयु म्हणजे चार प्रदेश अशाप्रकारे करत असत. क्वेचुआ भाषेत तावान्तिन म्हणजे चार वस्तूंचा गट (तावा: चार, न्तिन: गट) आणि सुयु म्हणजे "प्रदेश" किंवा "विभाग". इंका साम्राज्य चार विभागात विभागले होते व त्यांची टोके राजधानी कुझ्को येथे एकत्र येत असत. स्पॅनिशांनी हे नाव तौआतिन्सुयो किंवा तौआतिन्सुयु असे भाषांतरित केले. ते आजही बऱ्याचदा वापरले जाते.

इंका याचा अर्थ क्वेचुआमध्ये शासक किंवा देव असा होतो. ही व्याख्या सम्राटांच्या घराण्याबाबत वापरली जात असे. स्पॅनिशांनी त्याचा अर्थ संपूर्ण साम्राज्य असा लावला. Imperio inca म्हणजे स्पॅनिशांनी जे राष्ट्र जिंकून घेतले ते होय.

सांस्कृतिक इतिहास

[संपादन]

इन्का साम्राज्याचा कालखंड हा १४ व्या आणि १५ व्या शतकातील आहे. ही इंका सभ्यता पूर्णपणे भारतीय संस्कृती होती. दक्षिण अमेरिका हा विस्तीर्ण खंड आहे.मंका आर्य याने अन्डीज पर्वतात कुस्को येथे राजधानी स्थापन केली.त्याने आपल्या बहिणीशीच विवाह केला.ओक्लोन अम्मा ही इंका साम्राज्याची पहिली राणी झाली.पाचव्या पिढीतील कपश उपांकी याने राज्याचा विस्तार केला. आठव्या पिढीतील राजा वीरकोच याने सर्व जन - जातींना साम्राज्यात सामावून घेतले.त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य हे धार्मिक क्षेत्रात होते. जनजातींचा धार्मिक नेता आणि शासकीय नेते यांची त्याने एक परिषद भरवली.देवतांची श्रेणी निश्चित केली. धर्मगुरूंचे अधिकार निश्चित केले. सगळे पंथ संप्रदाय एका सूत्रात बांधले गेले. १४२८ मध्ये कुशी इंका हा वीरकोचाचा पुत्र गादीवर आला. त्याच्या काळात भौगोलिक दृष्ट्या साम्राज्याचे त्याने चार विभाग केले.शीघ्र संदेशवहनाची व्यवस्था त्याने केली.केचुआ ही त्याची राज्यभाषा होती. शेतीसाठी पाणीपुरवठा योजना,मंत्रालय , शासकीय नोंदणी ,शीरगणती अशा सर्वच बाबतीत इंका साम्राज्य आघाडीवर होते. कुस्को ही राजधानी महत्त्वाची होती.प्रशस्त राजमार्ग,विशाल प्रासाद,शासकीय कार्यालये ,सार्वजनिक सभागृहे ,उद्याने आणि सूर्याचे सुवर्णमंदिर हे या राजधानीचे वैशिष्ट्य होते. राजधानीच्या पहाडावर नगराच्या रक्षणासाठी साक्षीवामन नावाचा किला बांधला होता.या किल्ल्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. आजही अयमार, क्वेचुवा या जनजातीचे पुरुष तिथे श्रद्धेने आलेले दिसतात.

धर्मकल्पना

[संपादन]

इंका सूर्यपुत्र होते असे मानले जाते.साम्राज्यातील सर्व जनजाती सूर्यपूजक होत्या.पचममा ही त्यांची प्रमुख देवता.साहसी नाविकांची देवी म्हणून ती पूजनीय होती. एका हातात विद्युत आणि दुस-या हातात कलश घेतलेला पर्जन्यदेव इल्लप त्यांना पूजनीय होता.या स-या जमातीचा नीतीमत्ता या तत्त्वावर विश्वास होता. इंका तत्त्वज्ञ लोकांना “अमौतस” म्हणत असत.ही मंडळी मौखिक परंपरेने आलेली आख्याने,पुराण,इतिहास कथन करत असत.आत्म्याला ते “वाका” म्हणत.पूर्वजांचे आत्मे सद्गुणी लोकांना मदत करतात अशी त्यांची श्रद्धा होती.त्यांच्या प्रार्थना आणि सूक्ते मानवी कल्याणाचा विचार करणारी होती. इ.स. १५३२ मध्ये या साम्राज्यावर स्पेनिश आक्रमण झाले.पिझारो हा राजा इंकाच्या राजाला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आग्रह करू लागली. त्याने नकार दिल्याने पिझारोने त्याला ठार मारले आणि इंका साम्राज्यावर ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.[]


  1. ^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृृतीचा विश्वसंचार