आय.आय.एफ.ए. पुरस्कार
Jump to navigation
Jump to search
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (इंग्लिश: International Indian Film Academy Awards) हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. २००० सालापासून सुरू असलेला हा पुरस्कार सोहळा २०१३ मध्ये मकाओ येथे भरवला गेला तर २०१४ साली अमेरिकेच्या टॅंपा महानगरामध्ये आयोजित केला गेला.
पुरस्कार सोहळे[संपादन]
पुरस्कार प्रकार[संपादन]
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक
- सर्वोत्तम अभिनेता
- सर्वोत्तम अभिनेत्री
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्तम खलनायक
- सर्वोत्तम विनोदी कलाकार
- सर्वोत्तम पदार्पण - पुरुष
- सर्वोत्तम पदार्पण - महिला
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
- सर्वोत्तम गीतकार
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक
- सर्वोत्तम महिला पार्श्वगायक
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत