बोमन इराणी
Appearance
बोमन इराणी | |
---|---|
बोमन इराणी | |
जन्म |
बोमन इराणी डिसेंबर २, १९५९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
बोमन इराणी (डिसेंबर २, इ.स. १९५९:मुंबई - ) हा भारतीय चित्रपट व नाट्यअभिनेता आहे.
बालपण
[संपादन]इराणीचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. तो सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकला व मिठीबाई महाविद्यालयातून स्नातक झाला. त्यानंतर त्याने ताज महाल पॅलेस अँड टॉवर या हॉटेलात वेटर आणि हरकाम्या म्हणून नोकरी केली.[१] यानंतर तो आपल्या आईबरोबर दक्षिण मुंबईतील नोव्हेल्टी सिनेमा व अप्सरा सिनेमा यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने दादरमध्ये अंकल चिप्सचे एक दुकानही काढले पण धंद्यात नुकसान झाल्याने १९८६ च्या सुमारास ते बंद केले.[२] १९८७ ते १९८९ दरम्यान त्याने छायाचित्रण शिकून त्याचा धंदा सुरू केला. आजही इराणी व्यावसायिक छायाचित्रकार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Boman Irani gets candid[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Hindustan Times (इंग्लिश भाषेत). 2011-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-20 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Interview with Shekhar Gupta of the Indian Express" (इंग्लिश भाषेत). Indianexpress.com. 2007-07-30. 2011-02-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)