Jump to content

दिया मिर्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिया मिर्झा
जन्म दिया मिर्झा-हेंड्रिच
९ डिसेंबर, १९८१ (1981-12-09) (वय: ४३)
हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००१ - आजपर्यंत
भाषा हिंदी
पती  • 
साहिल संघा (ल. २०१४२०१९)
 • 
वैभव रेखी (ल. २०२१)
अधिकृत संकेतस्थळ http://www.diamirza.com

दिया मिर्झा-हेंड्रिच ( ९ डिसेंबर १९८१) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. हैदराबाद येथे जन्मलेल्या दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. ह्याच वर्षी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड तर लारा दत्ताने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्या होत्या.

२००१ साली दियाने रहना है तेरे दिल में ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत.

दिया मिर्झाचा पहिला विवाह तिचा व्यावसायिक भागीदार साहिल संघा सोबत ऑक्टोबर २०१४ मध्ये आर्य समाज पद्धतीने झाला.[].

दिया मिर्झा आणि साहिल संघा

इ. स. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[][] आणि १५ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यावसायिक वैभव रेखी सोबत दिया मिर्झा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Inside Dia Mirza, Sahil Sangha's Wedding" (इंग्रजी भाषेत). NDTV Movies. 19 October 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Dia Mirza Announces Separation From Husband Sahil Sangha on Social Media" (इंग्रजी भाषेत). News 18. 1 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Dia Mirza And Sahil Sangha Announce Separation After 11 Years Together: 'We Remain Friends'" (इंग्रजी भाषेत). NDTV. 1 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Dia Mirza-Vaibhav Rekhi wedding: First pictures of newlyweds are here". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 15 February 2021. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ Basu, Nilanjana (15 February 2021). "Dia Mirza And Vaibhav Rekhi Are Married. See Pics Of The Newlyweds". NDTV (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Dia Mirza ties the knot with Vaibhav Rekhi; looks lovely in a red sari". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 15 February 2021. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दिया मिर्झा चे पान (इंग्लिश मजकूर)