अ‍ॅम्स्टरडॅम अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अ‍ॅम्स्टरडॅम अरेना बाहेरून

अ‍ॅम्स्टरडॅम अरेना (डच: Amsterdam ArenA) हे नेदरलॅंड्सच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलॅंड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी बेआट्रिक्स राणीने अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी युरो खर्च आला. एराडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील ए.एफ.सी. एयाक्स हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. युएफा यूरो २००० स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चॅंपियन्स लीग १९९७-९८चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.

फुटबॉल व्यतिरिक्त अमेरिकन फुटबॉल सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.

[[File:|900px|alt=|
अ‍ॅम्स्टरडॅम अरेनाचे विस्तृत चित्र
]]
अ‍ॅम्स्टरडॅम अरेनाचे विस्तृत चित्र


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 52°18′51″N 4°56′31″E / 52.31417°N 4.94194°E / 52.31417; 4.94194