२००५ पासुन वापरात असलेला इल-दा-फ्रान्सचा लोगो
इल-दा-फ्रान्स (फ्रेंच: Île-de-France; शब्दश: अर्थ: फ्रान्सचे बेट) हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय विभाग आहे (इंग्लंड, नोर्डर्हाईन-वेस्टफालन व बायर्न) खालोखाल. आर्थिक दृष्ट्या इल-दा-फ्रान्स जगातील चौथ्या तर युरोपातील अव्वल क्रमांकाचा धनाढ्य प्रदेश आहे. २००९ साली इल-दा-फ्रान्सचा जीडीपी ५५२ अब्ज युरो इतका होता.
खालील आठ फ्रेंच विभाग इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
इल-दा-फ्रान्समधील ८८ टक्के जनता पॅरिस महानगर क्षेत्रात राहते. व्हर्साय हे ऐतिहासिक शहर देखिल इल-दा-फ्रान्समध्येच मोडते.
फ्रान्सचे आर्थिक व राजकीय इंजिन असलेला इल-दा-फ्रान्स रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडला गेला आहे. चार्ल्स दि गॉल हा फ्रान्समधील सर्वात मोठा विमानतळ इल-दा-फ्रान्सच्या तीन विभागांमध्ये पसरला आहे. युरोपातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक पॅरिस गार द्यु नॉर हे फ्रेंच टीजीव्ही सेवेमधील प्रमुख स्थानक आहे.
वास्तूशास्त्र[संपादन]
इल-दा-फ्रान्समध्ये गॉथिक रचनेच्या वास्तू मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. नोत्र देम दे पॅरिस हे पॅरिसमधील चर्च तसेच सेंत-देनिसची बासिलिका इत्यादी गॉथिक शास्त्रातील सर्वोत्तम इमारती येथे आढळून येतात.
इल-दा-फ्रान्स हे फ्रेंच क्रीडाविश्वाचे माहेरघर आहे. फ्रेंच ओपन ही मानाची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दरवर्षी मे महिन्यात पॅरिसमध्ये खेळवली जाते. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्सचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम सीन-सेंत-देनिस ह्या विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित आहे.
|
|
नागरी इल-दा-फ्रान्स: पॅरिस.
|
|
|
सांस्कृतिक इल-दा-फ्रान्स: लूव्र
|
|
|
|
कृषीप्रधान इल-दा-फ्रान्स.
|
|
|
|
नैसर्गिक इल-दा-फ्रान्स: फाउंटनब्लू जंगल.
|
|