स्ताद दा फ्रान्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्ताद दा फ्रान्स (फ्रेंच: Stade de France) हे फ्रान्स देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. सीन-सेंत-देनिस विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे युरोपातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात.
हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
गुणक: