भारतीय प्रजासत्ताक दिन
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.
या सारखेच संचलन भारतातील सर्व राज्यांत आयोजीत केले जाते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
भारताला जरी १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला नव्हता. २८ जानेवरी, इ.स. १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे मुख्य होते. भारतीय स्वंतंत्र्य दिवस हा भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून साजरा केला जातो , तर प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचे संविधान अमलात आले म्हणून साजरा केला जातो.
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो स्वीकारला गेला.
उत्सव [संपादन]
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
प्रमुख अतिथी [संपादन]
सन १९५० पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ १.०० १.०१ १.०२ १.०३ १.०४ १.०५ १.०६ १.०७ १.०८ १.०९ १.१० १.११ १.१२ १.१३ Choosing the Republic Day chief guest: continuing principle, changing preferences Indian Express
- ↑ http://www.claudearpi.net/maintenance/uploaded_pics/SW29.pdf
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ {{{शीर्षक}}}.
- ↑ .
- ↑ .
- ↑ .
- ↑ .
- ↑ .
- ↑ .
- ↑ .
- ↑ [१]साचा:Dead link
- ↑ .
- ↑ .
- ↑ http://meacommunity.org/Documents/ANNUAL%20REPORT%201988.doc
- ↑ २४.०० २४.०१ २४.०२ २४.०३ २४.०४ २४.०५ २४.०६ २४.०७ २४.०८ २४.०९ २४.१० Choosing R-Day chief guest: Behind the warm welcome, a cold strategy Indian Express, 25 Jan 2010
- ↑ "General South African History timeline" sahistory.org.za Accessed on 13 June 2008.
- ↑ .
- ↑ .
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |