संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद
संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद | |
---|---|
आर्थिक व सामाजिक परिषदेचे भवन | |
प्रकार | मुख्य अंग |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | इ.स. १९४५ |
मुख्यालय | न्यू यॉर्क शहर |
संकेतस्थळ | www.un.org/ecosoc |
संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद (इंग्लिश: United Nations Economic and Social Council) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.
जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.
सदस्य
[संपादन]आर्थिक व सामाजिक परिषदेमधील ५४ सदस्य देश आमसभेतून निवडले जातात.
विशेष संस्था
[संपादन]संयुक्त राष्ट्रांच्या खालील विशेष संस्था आर्थिक व सामाजिक परिषदेमार्फत चालवल्या जातात.
- आंतरराष्ट्रीय मजूर संस्था (ILO)
- खाद्य व कृषी संस्था (FAO)
- युनेस्को (UNESCO)
- विश्व स्वास्थ्य संस्था (WHO)
- विश्व बँक समूह
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
- आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था (ICAO)
- आंतरराष्ट्रीय सागरी संस्था (IMO)
- आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ (ITU)
- जागतिक पोस्ट संघ (UPU)
- विश्व हवामान संस्था (WMO)
- विश्व बौद्धिक संपदा संस्था (WIPO)
- आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD)
- युनिसेफ (UNICEF)
- संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (UNHCR)
- संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था (UNIDO)
- संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP)
- संयुक्त राष्ट्रे परियोजना कार्यालय (UNOPS)
- आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण बोर्ड (INCB)
बाह्य दुवे
[संपादन]- "संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)