जगातील सात नवी आश्चर्ये
जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[१] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.
विजेते
[संपादन]आश्चर्य | स्थान | चित्र |
---|---|---|
ताज महाल Taj mahal |
आग्रा, भारत | |
चिचेन इत्सा Chi'ch'èen Ìitsha' |
युकातान, मेक्सिको | |
क्रिस्तो रेदेंतोर O Cristo Redentor |
रियो दि जानेरो, ब्राझिल | |
कलोसियम Colosseo |
रोम, इटली | |
चीनची भिंत Wànlǐ Chángchéng |
चीन | |
माक्सू पिक्त्सू Machu Pikchu |
कुस्को, पेरू | |
पेट्रा al-Batrāʾ | जॉर्डन |
ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.
आश्चर्य | स्थान | चित्र |
---|---|---|
गिझाचा भव्य पिरॅमिड | गिझा, इजिप्त |