लाल चौक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्कोच्या सेंट बेसिल कॅथेड्रलमधून घेतलेले लाल चौकाचे छायाचित्र

लाल चौक (रशियन: Красная площадь) हे रशिया देशातील मॉस्को शहराच्या मध्य भागातील एक मोठे खुले आवार आहे. मॉस्को क्रेमलिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय लाल चौकामध्येच स्थित आहे. लाल चौकामध्ये मॉस्कोमधील सर्व प्रमुख हमरस्ते जुळतात. लाल चौक ही रशियन साम्राज्य, सोव्हिएत संघ व आजचा रशिया ह्या महासत्तांची एक महत्त्वाची ओळखखूण मानली गेली आहे.

लाल चौकाचे ३६०° दृष्य

लाल चौकाच्या भोवतालच्या बहुतेक सर्व इमारती ऐतिहासिक आहेत.

लाल चौकाचा नकाशा
थडगे
सरकारी
संग्रहालय
कझान कॅथेड्रल
वोस्क्रेसेन्स्की दरवाजे
शासकीय दुकान

क्रेमलिन व लाल चौक १९९० सालापासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 55°45′15″N 37°37′12″E / 55.75417°N 37.62000°E / 55.75417; 37.62000