Jump to content

साहिब बीबी और गुलाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Master, Mistress and Servant (es); সাহিব বিবি অউর গুলাম (bn); Le Maître, La Maîtresse et L'Esclave (fr); Sahib Bibi Aur Ghulam (ms); साहिब बीबी और गुलाम (mr); Sahib Bibi Aur Ghulam (de); Sahib Bibi Aur Ghulam (pt); ارباب، همسر و غلام (fa); 国王,王后与奴隶 (zh); साहिब बीबी और ग़ुलाम (new); صاحب بی بی اور غلام (ur); Sahib Bibi Aur Ghulam (id); চাহিব বিবি ঔৰ গুলাম (as); Sahib Bibi Aur Ghulam (en); Sahib Bibi Aur Ghulam (sh); 國王,王后與奴隸 (zh-hant); साहिब बीबी और ग़ुलाम (hi); సాహిబ్ బిబి ఆర్ గులాం (te); ਸਾਹਿਬ ਬੀਵੀ ਔਰ ਗੁਲਾਮ (pa); Sahib Bibi Aur Ghulam (gl); 国王,王后与奴隶 (zh-cn); 国王,王后与奴隶 (zh-hans); Sahib Bibi Aur Ghulam (nl) película de 1962 dirigida por Abrar Alvi (es); pinicla de 1962 dirigía por Abrar Alvi (ext); film sorti en 1962 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1962. aasta film, lavastanud Abrar Alvi (et); película de 1962 dirixida por Abrar Alvi (ast); pel·lícula de 1962 dirigida per Abrar Alvi (ca); १९६२ चा हिंदी चित्रपट (mr); Film von Abrar Alvi (1962) (de); filme de 1962 dirigido por Abrar Alvi (pt); film (sq); film út 1962 fan Abrar Alvi (fy); film din 1962 regizat de Abrar Alvi (ro); 1962 film by Abrar Alvi (en); film från 1962 regisserad av Abrar Alvi (sv); cinta de 1962 dirichita por Abrar Alvi (an); фільм 1962 року (uk); film uit 1962 van Abrar Alvi (nl); film del 1962 diretto da Abrar Alvi (it); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); filme de 1962 dirigit per Abrar Alvi (oc); filme de 1962 dirixido por Abrar Alvi (gl); فيلم أنتج عام 1962 (ar); סרט משנת 1962 (he); film India oleh Abrar Alvi (id) Sahib Biwi aur Ghulam (en); साहब बीबी और ग़ुलाम (hi); Sahib Bibi Aur Ghulam (fr); साहिब बीबी और ग़ुलाम (gl)
साहिब बीबी और गुलाम 
१९६२ चा हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मुख्य विषयमद्यपाश
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Abrar Alvi
निर्माता
Performer
वापरलेली भाषा
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Abrar Alvi
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९६२
कालावधी
  • १५२ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

साहिब बीबी और गुलाम हा १९६२ सालचा भारतीय हिंदी चित्रपट आहे जो गुरू दत्त निर्मित आणि अबरार अल्वी दिग्दर्शित आहे. बिमल मित्राच्या साहेब बीबी गोलम या बंगाली कादंबरीवर आधारित असून ब्रिटिश राजवटीत बंगालमधील सरंजामशाहीच्या शोकांतिकेच्या घटनेचा हा एक देखावा आहे. चित्रपटाची कथा ही एका खानदानी (साहिब)ची सुंदर एकटी पत्नी (बीबी) आणि अल्प-उत्पन्न मिळवीणाऱ्या नोकर (गुलाम) यांच्यातील अलैंगिक मैत्रीचा शोध घेते. चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांचे आहे आणि गीत शकील बदायुनी यांचे होते. व्ही. के. मूर्ती यांच्या उत्तम छायांकनासाठी देखील या चित्रपटाची नोंद केली आहे. या चित्रपटात गुरू दत्त, मीना कुमारी, रेहमान, वहीदा रहमान आणि नजीर हुसेन असे कलावंत आहेत.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण टीकाकारांनी मीना कुमारीच्या अभिनयाने साकारलेल्या छोटी बहूच्या पात्राला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून श्रेय दिले. १३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व ऑस्कर पुरस्कारामध्ये भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून हा निवडला गेला. चित्रपटाने चार फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट) जिंकला.[][] इंडियाटाइम्स मुव्हीज अनुसार बॉलिवूड चित्रपटातील अव्वल २५ चित्रपटांपैकी हा एक आहे.

निर्माण

[संपादन]

१९५८ मध्ये या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच छोटा बहुच्या भूमिकेसाठी मीना कुमारी ही मूळ निवड होती पण कमाल अमरोही यांच्या सूचनेनुसार तिने या प्रकल्पातून पाठिंबा दर्शविला. अमरोहीच्या म्हणण्यानुसार, छोटी बहुचे पात्रमुळे तिची "आयडियल इंडियन वूमन"ची प्रतिमा डागाळली असती. त्यानंतर ही भूमिका नर्गिस दत्त आणि लंडनमधील मुलगी छाया आर्य यांच्याकडे गेली; पण दोघांनीही ही नाकारली. अखेर १९६०-६१ च्या सुमारास दत्तने पुन्हा एकदा या चित्रपटाची पटकथा कुमारीकडे पाठविली जी या वेळी भूमिका करण्यास तयार झाल्या.[]

गुरुदत्तला संगीतासाठी सचिनदेव बर्मन आणि गीतांसाठी साहिर लुधियानवी हवे होते. पण बर्मन अस्वस्थ होता आणि साहिरने हे काम नाकारले.[] भूतनाथच्या भूमिकेसाठी शशी कपूर यांची पहिली पसंती होती. गुरू दत्त आणि अबरार अल्वी यांच्या भेटीसाठी त्यांनी अडीच तास उशीर केला आणि म्हणुन दत्तने त्यांना नाकारले. त्यानंतरची निवड बंगाली अभिनेता विश्वजीत यांची होती, ज्यांचा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा चित्रपट थरला असता. विश्वजीत यांनी पाठिंबा दर्शविला नाही कारण त्याला गुरुदत्त यांच्याबरोबर अनन्य करारात बांधायचे नव्हते. शेवटी, गुरू दत्तने स्वतःला भूतनाथ (म्हणजे गुलाम) या भूमिकेसाठी नियुक्त केले. छोटी बहूची भूमिका वहीदा रहमानला करायची होती. परंतु छायाचित्रकार व्ही.के. मूर्तीनी या प्रौढ भूमिकेसाठी त्या खूप लहान असल्याचे सांगीतले. तथापि, जेव्हा अल्वीने तिला जाबाच्या भूमिकेसाठी विचारले, तेव्हा मीना कुमारीच्या खालची भूमिका असूनही त्यांनी ती स्वीकारली.

कलकत्ताजवळील धनकुरीया हवेली येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते आणि मुंबईमध्ये हवेलीतील सेट पुन्हा तयार करण्यात आले होते.[]

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांनी केले आहे. शकील बदायुनी यांनी गीत लिहिले आहे. गीता दत्त आणि आशा भोसले यांनी हे गायले आहेत. "ना जाओ सैया छुडके बैयां" हे या चित्रपटाचे सर्वात प्रसिद्ध गाणे आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "10th National Film Awards". International Film Festival of India. 29 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 सप्टेंबर 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "1st Filmfare Awards 1953" (PDF). 2009-06-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ "'Meena Kumari used to wear her roles like a dress' – Birth anniversary special". Cinestaan. 2017-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-01 रोजी पाहिले.
  4. ^ Sahib Bibi Aur Gulam Upperstall.
  5. ^ "Indian cinema@100: Five facts about Sahib Bibi Aur Ghulam …". movies.ndtv.com. 2013-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-11 रोजी पाहिले.