Jump to content

झनक झनक पायल बाजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jhanak Jhanak Payal Baaje (it); ঝনক ঝনক পায়েল বাজে (bn); Jhanak Jhanak Payal Baaje (id); Jhanak Jhanak Payal Baaje (nl); झनक झनक पायल बाजे (hi); Jhanak Jhanak Payal Baaje (sh); Jhanak Jhanak Payal Baaje (de); झनक झनक पायल बाजे (mr); ఝణక్ ఝణక్ పాయల్ బాజే (te); ಜನಕ್ ಜನಕ್ ಪಾಯಲ್ ಬಾಜೆ (kn); Jhanak Jhanak Payal Baaje (en); جهانک جهانک پایال باجی (fa); 脚铃声声 (zh); झनक झनक पायल बाजे (new) película de 1955 dirigida por V. Shantaram (es); pinicla de 1955 dirigía por V. Shantaram (ext); film sorti en 1955 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1955. aasta film, lavastanud V. Shantaram (et); película de 1955 dirixida por V. Shantaram (ast); pel·lícula de 1955 dirigida per V. Shantaram (ca); १९५५चा भारतीय चित्रपट (mr); ffilm ddrama gan V. Shantaram a gyhoeddwyd yn 1955 (cy); filme de 1955 dirigido por V. Shantaram (pt); film (sq); film út 1955 fan V. Shantaram (fy); film din 1955 regizat de V. Shantaram (ro); 1955 film by V. Shantaram (en); cinta de 1955 dirichita por V. Shantaram (an); film del 1955 diretto da V. Shantaram (it); film India oleh V. Shantaram (id); סרט משנת 1955 (he); фільм 1955 року (uk); film uit 1955 van V. Shantaram (nl); filme de 1955 dirigit per V. Shantaram (oc); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); ১৯৫৫-এর হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); filme de 1955 dirixido por V. Shantaram (gl); فيلم أنتج عام 1955 (ar); film från 1955 regisserad av V. Shantaram (sv); Film von V. Shantaram (1955) (de) Jhanak Jhanak Payal Baje (de)
झनक झनक पायल बाजे 
१९५५चा भारतीय चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
निर्माता
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९५५
कालावधी
  • १४३ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झनक झनक पायल बाजे हा व्ही. शांताराम दिग्दर्शित १९५५ सालचा बॉलिवूड चित्रपट आहे. यात शांतारामची पत्नी संध्या शांताराम आणि नर्तक गोपी कृष्ण मुख्य भूमिकेत आहेत. हा भारतातील रंगीत चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात बनवलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने १९५५ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र जिंकले.[१] सोबतच फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पण मिळविला.[२] बॉक्स ऑफिस इंडिया येथे या चित्रपटाला ‘सुपर हिट’ घोषित करण्यात आले होते.

कथानक

[संपादन]

शास्त्रीय नृत्य गुरू मंगल (केशवराव दाते) नीलाने (संध्या शांताराम) बांधलेल्या भव्य हवेलीतील नृत्याच्या कार्यक्रमात एके ठिकाणी अडखळतात. ते आपला प्रतिभावंत मुलाला गिरधर (गोपी कृष्ण) यांना शास्त्रीय नृत्य करण्याची खरी पद्धत प्रेक्षकांना दाखवून देण्याचे आदेश देतो. गिरधरच्या कौशल्यामुळे नीला स्वतःला मंगल गुरुजींची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश द्यायला विनवणी करते. शेवटी मंगल गुरुजी दोन अटींवर सहमत होतात: तिने आपले आयुष्य कलेसाठी समर्पित केले पाहिजे आणि तिने आगामी नृत्य स्पर्धेच्या तांडवनृत्यात गिरधरला सोबत दिली पाहिजे. दोघे मिळून सराव करताना ती गिरधरच्या प्रेमात पडू लागते. स्वतःला नीला मिळावी ही अपेक्षा बाळगणारा श्रीमंत व मत्सरी मनीलाल (मदन पुरी) हे दोघे प्रेमात पडत आहे असा इशारा मंगलला देतो पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मंगळ या जोडीसाठी नवीन पोशाख विकत घेण्यासाठी काही काळासाठी निघून जातो तेव्हा ते एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली देतात आणि नाचण्याकडे दुर्लक्ष करतात. मंगल परततो आणि त्याला हे दोघे प्रेमात असल्याचे समजते. गिरधरच्या नृत्यकलेत भंग पडला आहे असा विश्वास ठेवत तो आता कधीही "भारत नटराजन" ही पदवी जिंकणार नाही, असा मंगलचा समज होतो. म्हणून तो आपल्या मुलाचा त्याग करतो.

तिने गिरधरच्या कारकिर्दीला नुकसान पोहचवले या भीतीने निराश होऊन नीला ढोंग करतो की ती मनीलाल वर प्रेम करते आणि गिरधरचा विश्वासघात करते. गिरधर आपल्या वडिलांकडे आणि त्याच्या कलेकडे परततो. उद्ध्वस्त झालेली नीला स्वतःला नदीत बुडवण्याचा प्रयत्न करते, पण एक दयाळू साधू (नाना पळशीकर) तिची सुटका करतो. ती मीराबाईच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा निर्णय घेते आणि कृष्णावर आपले जीवन समर्पित करते. गिरधर तिला विसरू शकत नाही असे जाहीर करतो पण ती त्याला ओळखत नाही असे दर्शवते ज्याने तो संतापतो. त्याचे वडील त्याला घेऊन जातात. नीला आजारी पडते आणि साधू आणि नीलाला ज्या मंदिरात नृत्य स्पर्धा असते तेथे नेतात. शेवटचा डाव म्हणुन मनिलाल गिरधरच्या सोबतच्या नर्तकीला स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी लाच देतो. तांडव नृत्यात नीला तिचे स्थान घेते आणि मंगलला समजते की तिने स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी गिरधरची मदत केली. त्यानंतर मंगल आपल्या मुलाला नीलाला दुसरी संधी देण्यासाठी पटवतो. नीलाच्या मदतीने गिरधर ही स्पर्धा जिंकतो आणि मंगल या जोडप्याला लग्न करण्याचा आशीर्वाद देतो.

संगीत

[संपादन]

चित्रपटास वसंत देसाई यांनी संगीत दिले असून हसरत जयपुरी यांनी गीत लिहिले आहेत. मीराबाईंवर प्रेरित असलेले गीत "जो तुम तोडो पिया" हे नंतर १९८१ च्या सिलसिला या हिंदी चित्रपटात देखील वापरले गेले. या चित्रपटात पद्मश्री आणि पद्मविभूषण प्राप्त संगीतकार शिवकुमार शर्मा यांनी संतूरची साथ दिली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ 3rd National Film Awards
  2. ^ Raheja, Dinesh. "Jhanak Jhanak Payal Baje: Dance and Drama". Rediff. 30 July 2011 रोजी पाहिले.