Jump to content

आशीर्वाद (१९६८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
আশীর্বাদ (bn); Aashirwad (id); آشیرواد (فلم) (ur); आशीर्वाद (1968 फ़िल्म) (hi); ఆశీర్వాద్ (te); ಆಶಿರ್ವಾದ್ (kn); Aashirwad (en); برکت (فیلم ۱۹۶۸) (fa); आशीर्वाद (१९६८ चित्रपट) (mr); आशीर्वाद (सन् १९६८या संकिपा) (new) película de 1968 dirigida por Hrishikesh Mukherjee (es); pinicla de 1968 dirigía por Hrishikesh Mukherjee (ext); film sorti en 1968 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1968. aasta film, lavastanud Hrishikesh Mukherjee (et); película de 1968 dirixida por Hrishikesh Mukherjee (ast); pel·lícula de 1968 dirigida per Hrishikesh Mukherjee (ca); हिंदी चित्रपट (mr); Film von Hrishikesh Mukherjee (1968) (de); filme de 1968 dirigido por Hrishikesh Mukherjee (pt); film út 1968 fan Hrishikesh Mukherjee (fy); film din 1968 regizat de Hrishikesh Mukherjee (ro); 1968 film by Hrishikesh Mukherjee (en); cinta de 1968 dirichita por Hrishikesh Mukherjee (an); סרט משנת 1968 (he); film India oleh Hrishikesh Mukherjee (id); ১৯৬৮ হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); фільм 1968 року (uk); film uit 1968 van Hrishikesh Mukherjee (nl); filme de 1968 dirigit per Hrishikesh Mukherjee (oc); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); హృషికేష్ ముఖర్జీ దర్శకత్వంలో 1968లో విడుదలైన బాలీవుడ్ సినిమా (te); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); filme de 1968 dirixido por Hrishikesh Mukherjee (gl); فيلم أنتج عام 1968 (ar); film del 1968 diretto da Hrishikesh Mukherjee (it); film från 1968 regisserad av Hrishikesh Mukherjee (sv)
आशीर्वाद (१९६८ चित्रपट) 
हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मूळ देश
संगीतकार
निर्माता
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९६८
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आशीर्वाद हा १९६८ सालचा बॉलिवूड चित्रपट असून, दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात अशोक कुमार आणि संजीव कुमार मुख्य भुमीकेत आहेत. अशोक कुमार यांनी सादर केलेल्या रॅप गाणे, "रेल गाडी", साठी हा चित्रपट उल्लेखनीय आहे.[] या चित्रपटाने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

कथानक

[संपादन]

जोगी ठाकूर (अशोक कुमार) हा उच्च तत्त्वांचा एक साधा माणूस आहे. आपल्या पत्नीसह वीणा (लीला चौधरी) सासरच्यातर्फे मिळालेल्या मालमत्ते मध्ये तो राहत असतो. त्याच्या पत्नीच्या आदेशावरून ती धूर्तपणे गरीबांची घरे जाळण्याच्या आदेशा देते आणि चतुराइने जोगी ठाकूरच्या स्वाक्षर्या करून घेते. ही माहिती मिळताच तो आपला विवाह तोडतो, लहान मुलगी नीनाला पण मागे सोडून पुन्हा परत येणार नाही अशी शपथ घेऊन तो घर सोडतो. तो मुंबईत फिरतो, जेथे तो एका पार्कमध्ये मुलांचे मनोरंजन करून जगतो. त्याला एक लहान मुलगी आवडते जिचे नाव संयोगाने नीना (सारिका) असते. दुर्दैवाने, ती मुलगी आजारी पडते आणि तिचा मृत्यू होतो.

त्यानंतर जोगी आपल्या गावी चंदनपुरला परततो. तेथे त्याच्या एका ग्रामस्थ मित्रा बैजू (हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय)च्या मुलीचे अपहरण झाले आहे. एका धूर्त मुख्य लेखापालने तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असतानाच तो धावपळ करत त्या ठिकाणी पोहचतो आणि त्या मुलीच्या रक्षणासाठी लेखापालाला ठार मारतो. त्याला वाचवण्यासाठी गावकरी काल्पनिक कथा बनवतात, परंतु तो कोर्टात खोटे सांगण्यास नकार देतो आणि त्याला तुरूंगावासाची शिक्षा होते. तेथेच तो बागेत काम करणे सुरू करतो आणि तात्त्विक कविता तयार करतो. तुरूंगातील डॉक्टर बिरेन (संजीव कुमार) त्यांना जोगी ठाकूर खास आवडतात. योगायोगाने जोगी ठाकूर यांची मुलगी नीना (सुमिता सान्याल) डॉक्टरांशी लग्न करणार आहे. त्याची मुलगी गुन्हेगारांचा द्वेष करते हे देखील त्याला कळते आणि म्हणूनच आपली ओळख समोर येऊ नये याची तो काळजी घेतो. त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल सरकार त्याला माफी देते व लवकर त्याची सुटका करते. डॉक्टर बिरेन त्याला वडिलधाऱ्यासमान मानू लागतो. तो जोगी ठाकूरला सांगतो की ज्या दिवशी तो तुरूंगातून सुटेल त्याच संध्याकाळी त्याचे लग्न आहे. जोगी ठाकूर आपल्या मुलीचे लग्न बघण्याच्या इच्छेने तेथे येतो. लग्नासाठी जमलेल्या भिकार्यांमधे तो सामील होतो आणि जोडप्याला आशीर्वाद देतो. तथापि, तो रस्त्यावर कोसळत असतानाच त्याची ओळख जमावाला समजते. त्याच्या शेवटच्या क्षणी वडिलांना भेटायला घटनास्थळी नीना येते.

निर्माण

[संपादन]

चित्रपटाचे संगीत वसंत देसाई यांचे होते, गुलजार यांच्या गीतांवर. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी "रेल गाडी" हे गीत लिहिले आहे व अशोक कुमार यांनी गायलेले आहे. इतर गाणी लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायली आहेत.

पुरस्कार

[संपादन]

१९६८ मध्ये या चित्रपटाला १६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच अशोक कुमारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जिंकला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Hrishikesh Mukherjee's best films: Aashirwad (1969)". Rediff.com Movies. 28 August 2006. 30 July 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "16th National Film Awards". International Film Festival of India. 20 ऑक्टोबर 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 सप्टेंबर 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "16th National Film Awards (PDF)" (PDF). Directorate of Film Festivals. 22 September 2011 रोजी पाहिले.