दो दूनी चार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दो दूनी चार 
२०१० चा हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
प्रकार चलचित्र
गट-प्रकार
  • comedy film
मूळ देश
संगीतकार
  • Meet Bros
निर्माता
  • Arindam Chaudhuri
चित्रपट दिग्दर्शक
  • Habib Faisal
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
कालावधी
  • ११० min
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Do Dooni Chaar (it); দো দুনি চার (bn); Do Dooni Chaar (nl); दो दूनी चार (mr); ధో దూని చార్ (te); Do Dooni Chaar (de); Do Dooni Chaar (en); ದೋ ದೂನಿ ಚಾರ್ (kn); दो दूनी चार (hi); दो दूनी चार (new) film del 2010 diretto da Habib Faisal (it); pinicla de 2010 dirigía por Habib Faisal (ext); film sorti en 2010 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2010. aasta film, lavastanud Habib Faisal (et); película de 2010 dirixida por Habib Faisal (ast); pel·lícula de 2010 dirigida per Habib Faisal (ca); २०१० चा हिंदी चित्रपट (mr); Film von Habib Faisal (2010) (de); filme de 2010 dirigido por Habib Faisal (pt); film út 2010 fan Habib Faisal (fy); film din 2010 regizat de Habib Faisal (ro); film från 2010 regisserad av Habib Faisal (sv); 2010 film by Habib Faisal (en); סרט משנת 2010 (he); film uit 2010 van Habib Faisal (nl); cinta de 2010 dirichita por Habib Faisal (an); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); filme de 2010 dirigit per Habib Faisal (oc); filme de 2010 dirixido por Habib Faisal (gl); فيلم أنتج عام 2010 (ar); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); película de 2010 dirigida por Habib Faisal (es) Two Times Equals Four (en)

दो दूनी चार हा २०१० सालचा हिंदी कौटुंबीक विनोदी चित्रपट आहे जो अरिंदम चौधरी (प्लॅनमन मोशन पिक्चर्स) निर्मित आणि हबीब फैसल दिग्दर्शित व लिखीत आहे. यात ऋषी कपूर, नीतू सिंग, आदिती वासुदेव आणि आर्चीत कृष्णायांनी अभिनय केला असून मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय शाळेतील शिक्षकाविषयी आहे जो महागाईच्या काळात पत्नी आणि मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि कार खरेदी करण्याच्या स्वप्नांमध्ये रमतो. त्याच्या याच एका कारच्या खरेदी भोवतीची ही कथा आहे. वाढत्या महागाईत आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागण्या पूरविण्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे ज्यात कमी वेतन असलेल्या मध्यमवर्गीय शालेय शिक्षकांच्या समस्यांचा मुद्दा उभारला आहे. या सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या कपूर दांप्ताने रुपेरी पडद्यावर मुख्य जोडी म्हणून पुनरागमन केले. या जोडीने ३० वर्षांमध्ये चित्रपटात भूमिका केली नसली तरी त्यांनी यापूर्वी १९७० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. दिग्दर्शकीय पदार्पण करणारा चित्रपट डिस्ने वर्ल्ड सिनेमाद्वारे वितरित केलेला पहिला गैर-ॲनिमेटेड हिंदी चित्रपट देखील होता. ५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला.[१][२][३][४]

निर्माण[संपादन]

चित्रपटाच्या कथालेखनाच्या वेळी देखिल ऋषी कपूर निर्मात्यांच्या मनात होते. ऋषी कपूरच्या विरुद्ध महिला कलाकारासाठी सुरुवातीला जूही चावलाकडे संपर्क साधला गेला होता, तथापि, तिने ही भूमिका नाकारली.[५] नीतू-ऋषीच्या जोडीने सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणच्या २००९ सालच्या लव आज कल या सिनेमातून थोडक्यात हजेरी लावली असली तरी, दो दूनी चार हा या जोडीचा ३० वर्षानंतरचा पहिला चित्रपट होता. १९७९ मध्ये ऋषी कपूरसोबत तिच्या विवाहानंतर नीतू सिंग यांनी चित्रपटातून निवृत्ती घेतली होती. एका मुलाखतीत नीतूने हा खुलासा केला की तिचा या चित्रपटात काम करण्याचा कोणताही हेतू नव्हता; पण तिच्या पतीच्या आग्रहास्तव तिने संहिता ऐकण्याची तयारी दर्शविली आणि मग होकार पण दिला.[६]

किरोरी माल कॉलेज, विनोबापुरी, शालीमार बाग, खान मार्केट, चित्तरंजन पार्क, मयूर विहार फेज ३ आणि नोएडा यासारख्या दिल्लीतील ठिकाणांवर चित्रीकरण झाले आहे.[७]

मीत ब्रदर्सने या चित्रपटाचे संगीत देले असून शंकर महादेवन, विशाल ददलानी, सुनिधी चौहान यांनी गाणी गायली आहेत.

पुरस्कार[संपादन]

५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला.[८] तसेच, त्यास चार फिल्मफेअर पुरस्कार[९] आणि एक स्टार स्क्रीन पुरस्कारही मिळाले.[१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bhushan, Nyay. "New York Indian Film Festival to Open with Walt Disney India's First Live-Action Hindi Film". The Hollywood Reporter. 2011-04-04 रोजी पाहिले. 
  2. ^ "How small films made it big? - Film Festivals & Markets". BollywoodTrade.com. 26 March 2011. 2011-04-04 रोजी पाहिले. 
  3. ^ "New York Indian Film Festival to Open with Walt Disney's Film". Pravasi Herald. 9 March 2011. 2011-04-04 रोजी पाहिले. 
  4. ^ "Disney India to release 'Do Dooni Char' Oct 8". Yahoo! Movies. 19 August 2010. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 23 August 2010 रोजी मिळविली).  Unknown parameter |url-status= ignored (सहाय्य)
  5. ^ "Script is vital says 'Do Dooni Chaar' producer -". The Times of India. 6 Oct 2010. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 23 November 2010 रोजी मिळविली).  Unknown parameter |url-status= ignored (सहाय्य)
  6. ^ "Do Dooni Chaar script brought me back to films: Neetu Singh". Money Control. 23 Oct 2010. 
  7. ^ "Do Dooni Chaar". Bollywood Hungama. 
  8. ^ "58th National Film Awards: Rishi Kapoor, Arbaaz Khan on cloud nine after bagging national award". The Economic Times. 20 May 2011. 2011-07-08 रोजी पाहिले. 
  9. ^ "Winners of 56th Filmfare Awards 2011". Bollywood Hungama. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 5 March 2011 रोजी मिळविली). 2011-03-21 रोजी पाहिले.  Unknown parameter |url-status= ignored (सहाय्य)
  10. ^ "Winners of 17th Annual Star Screen Awards 2011". Bollywood Hungama. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 9 January 2011 रोजी मिळविली). 2011-01-07 रोजी पाहिले.  Unknown parameter |url-status= ignored (सहाय्य)