Jump to content

नीरजा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Neerja (es); নীরজা (bn); Neerja (fr); نیرجا (ckb); Neerja (fi); Нирджа (ru); नीरजा (mr); Neerja (de); Neerja (pt); നീർജ (ml); نیرجا (fa); 妮嘉 (zh); Neerja (it); नीरजा (ne); ニールジャー (ja); Neerja Bhanot (pt-br); ਨੀਰਜਾ (pa); نيرجا (arz); Neerja (pl); නීර්ජා (si); Neerja (nl); ನೀರಜ ಭಾನೋಟ್ (kn); नीरजा भनोट (hi); నీర్జా (te); 니르자 (ko); Neerja (en); نيرجا (ar); Neerja (id); Neerja (ms) película india de 2016 dirigida por Ram Madhvani (es); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); película de 2016 dirixida por Ram Madhvani (ast); pel·lícula de 2016 dirigida per Ram Madhvani (ca); Film von Ram Madhvani (2016) (de); film út 2016 fan Ram Madhvani (fy); भनरतीय चलचित्र (ne); film från 2016 regisserad av Ram Madhvani (sv); фільм 2016 року (uk); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); నీర్జా 2016లో విడుదలైన హిందీ సినిమా. (te); vuoden 2016 elokuva (fi); cinta de 2016 dirichita por Ram Madhvani (an); pinicla de 2016 dirigía por Ram Madhvani (ext); film de Ram Madhvani, sorti en 2016 (fr); 2016. aasta film, lavastanud Ram Madhvani (et); २०१६चा हिंदी चित्रपट (mr); ୨୦୧୬ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); filme de 2016 dirixido por Ram Madhvani (gl); film del 2016 diretto da Ram Madhvani (it); filme de 2016 dirigido por Ram Madhvani (pt-br); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film India oleh Ram Madhvani (id); ᱒᱐᱑᱖ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); индийский фильм 2016 года (ru); film uit 2016 van Ram Madhvani (nl); filme de 2016 dirigido por Ram Madhvani (pt); film din 2016 regizat de Ram Madhvani (ro); රාම් මාධ්වානිගේ 2016 චිත්‍රපටය (si); فيلم 2016 (arz); 2016 film by Ram Madhvani (en); فيلم أنتج عام 2016 (ar); filme de 2016 dirigit per Ram Madhvani (oc); סרט משנת 2016 (he) Нирджа (фильм) (ru)
नीरजा 
२०१६चा हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मुख्य विषयदहशतवाद,
Pan Am Flight 73
ला समर्पित
गट-प्रकार
  • जीवनचरित्रावर आधारीत चित्रपट
  • नाट्य
मूळ देश
पटकथा
  • Saiwyn Quadras
निर्माता
  • Atul Kasbekar
दिग्दर्शक
  • Ram Madhvani
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २०१६
  • फेब्रुवारी १९, इ.स. २०१६ (भारत)
कालावधी
  • १२२ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नीरजा हा २०१६ मधील हिंदी भाषेचा नीरजा भनोतच्या जीवनचरित्रा वर आधारीत रोमांचक चित्रपट आहे. राम माधवानी दिग्दर्शित, या चित्रपटचे लिखाण सायविन क्वाड्रस आणि संयुक्ता चावला शेख यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओसमवेत अतुल कसबेकर यांच्या "ब्लिंग अनप्लग्ड" कंपनीने ही निर्मिती केली आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य पात्र आहेत, आणि सोबत आहेत यात शबाना आझमी, योगेंद्र टिकू आणि शेखर रावजियानी.

हा कथानक वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. ५ सप्टेंबर १९८६ रोजी पाकिस्तानच्या कराची येथे पॅन एम फ्लाइट ७३ चे लीबिया समर्थित अबु निदल ऑर्गनायझेशनने अपहरण केले होते. नीरजा भनोट यांनी वैमानिकांना इशारा देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न रोखला, आणि विमान जमीनीवर उतरवले. ३७९ प्रवाशांपैकी ३५९ प्रवाशांचा जीव वाचविण्यात मदत करण्याचा प्रयत्न करीत भानोत यांचा मृत्यू झाला.

सप्टेंबर २०१४ मध्ये चित्रपटासाठी कसबेकर यांनी राम माधवानी आणि सोनम कपूर यांना निवडले. १९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रदर्शीत झाल्यावर समीक्षकांनी सकारात्मक स्वागता करत कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले. हा महिला नायिका असलेल्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹१३५.५२ कोटी कमाई केली.

कपूरच्या अभिनयासाठी आणि माधवानी यांच्या दिग्दर्शनासाठी चित्रपटस अनेक पुरस्कार मिळाले. ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कपूरसाठी विशेष उल्लेख असे दोन पुरस्कार जिंकले. ६२व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नीरजाने सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) (कपूर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (आझमी) यांच्यासह सहा पुरस्कार जिंकले.

निर्माण

[संपादन]

चित्रपटाची मुख्य छायाचित्रण १९ एप्रिल २०१५ रोजी मुंबई येथे सुरू झाले.[] दोन महिन्यांच्या चित्रीकरणानंतर १९ जून २०१५ रोजी शूटिंग संपले.[]

शूटिंगसाठी वास्तविक विमान संपादन करणे हे एक आव्हान होते; दिग्दर्शक राम माधवानी आणि रुचा पाठक यांनी विमानाचा देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला कारण चित्रपटाच्या प्रमुख भाग विमानात आहे. विमान तयार करण्यासाठी त्यांना ४८ दिवस लागले, जे दिसायला मूळ विमानाच्या अगदी जवळपास असलेल्यासारखेच होते.[]

पुरस्कार

[संपादन]

हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०१६ रोजी अंदाजे ६७१ थिएटरमध्ये जगभरात प्रदर्शित झाला होता.[] या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये बंदी घातली गेली कारण यात पाकिस्तानला नकारात्मक दृष्टीने दर्शविले आहे.[]

हा चित्रपट महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारने करमुक्त घोषित केला होता.[]

चित्रपटास १ एशियाविझन पुरस्कार, ६ फिल्मफेअर पुरस्कार, ४ आय.आय.एफ.ए. पुरस्कार, २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,[]स्क्रीन पुरस्कार, ४ स्टारडस्ट पुरस्कार व ७ झी सिने पुरस्कार मिळाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sonam Kapoor Begins Filming Neerja Bhanot Biopic, Bollywood Stars Tweet Good Wishes". NDTV. 22 डिसेंबर 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  2. ^ "Sonam Kapoor Wraps Up Neerja Bhanot Shoot!". Yahoo!. 20 June 2015. 29 May 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "WATCH: How The Crew Of 'Neerja' Built An Actual Plane". The Huffington Post. 13 फेब्रुवारी 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 फेब्रुवारी 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Neerja movie review: Sonam Kapoor's gripping performance as Neerja Bhanot leaves Anupama Chopra teary-eyed". India.com. 20 फेब्रुवारी 2016. 23 एप्रिल 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 मे 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Why Sonam Kapoor's 'Neerja' may have been banned in Pakistan". Emirates 24/7. 29 फेब्रुवारी 2016. 7 ऑगस्ट 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 जून 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "'Neerja, 'Jai Gangaajal' go tax-free in Madhya Pradesh". Daily News and Analysis. 9 मार्च 2016. 11 मार्च 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 मार्च 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "64th National Film Awards: Full winners' list". India Today. 7 एप्रिल 2017. 18 मे 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 जुलै 2017 रोजी पाहिले.