आय एम (चित्रपट)
ओनीर द्वारा दिग्दर्शित हिंदी चित्रपट (२०१०) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | गर्भारपण, समलैंगिकता | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
Performer | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
आय एम हा २०१० चा ओनिरचा भारतीय हिंदी-भाषेतील अँथॉलॉजी चित्रपट आहे. यात ‘ओमर’, ‘आफिया’, ‘अभिमन्यू’ आणि ‘मेघा’ या चार लघुपटांचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटात "भीती" हा सामान्य विषय आहे आणि हे वास्तविक जीवनातील कथांवर आधारित आहे. जगभरातील ४०० हून अधिक वेगवेगळ्या लोकांच्या देणग्यांद्वारे चित्रपटाला वित्तपुरवठा करण्यात आला,[१] त्यापैकी अनेकांनी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे देणगी दिली.[२] ह्यात चार कथा आहेत पण प्रत्येक कथेत पात्रं गुंफलेली आहेत. "अभिमन्यू" बाल शोषणावर आधारित आहे, "ओमर" समलिंगी हक्कांवर, "मेघा" काश्मिरी पंडितांवर आधारित आहे आणि "आफिया" शुक्राणू दानाशी संबंधित आहे. चित्रपटात हिंदी, इंग्रजी, कन्नड, मराठी, बंगाली आणि काश्मिरी अशा सहा वेगवेगळ्या भाषा बोलल्या गेल्या आहे.[३][४]
पात्र
[संपादन]आफिया
[संपादन]- आफिया किडवाई - नंदिता दास
- सूरज - पूरब कोहली
- डॉक्टर बसू - अनुराग बसू
- विशेष भूमिका - मानव कौल
मेघा
[संपादन]- मेघा - जुही चावला
- रुबीना - मनीषा कोईराला
अभिमन्यू
[संपादन]- अभिमन्यू - संजय सुरी
- नताशा/नॅट्स - राधिका आपटे
- आशा - शेरनाज पटेल
- विनय - अनुराग कश्यप
- अपर्णा - पूजा गांधी
उमर
[संपादन]- जय गौडा - राहुल बोस
- उमर - अर्जुन माथूर
- पोलीस कर्मचारी - अभिमन्यू सिंग
पुरस्कार
[संपादन]२०१२ मध्ये ह्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ Mehul Satish Thakkar (19 June 2010). "Believe it or not, 600 co-producers for a film!". CNN-IBN. 22 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Manali Shah (5 August 2010). "Onir raises funds through Facebook". Hindustan Times. 19 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Adarsh, Taran (15 March 2011). "Reasons why 'I Am' will be released with sub-titles in India". Bollywood Hungama.com. 2 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2011 रोजी पाहिले.
- ^ "Independent filmmakers are wiped out in India: Onir". NDTV. Press Trust of India. 27 November 2010. 28 November 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2011 रोजी पाहिले.
- ^ "Vidya Balan wins National Award for 'The Dirty Picture'". The Times of India. 2013-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित.