विकिपीडिया:सायटॉइड
सायटॉइड हे यथादृश्यसंपादक मध्ये एकत्रित केलेले एक नवीन संदर्भ साधन आहे. याची सुरवात मराठी विकिपीडियावर १ मार्च इ.स. २०१८ रोजी झाली. हे साधन वापरून तुम्ही मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये संदर्भ घालू शकता.
सायटॉइड कसे वापरले जाते?
[संपादन]सायटॉइड यथादृश्यसंपादक मध्ये समाविष्ट असल्यामुळे सर्वात आधी यथादृश्यसंपादकाकडे जावे.
दृश्य संपादन चालू करा
[संपादन]टूलबार मध्ये 'स्रोत संपादित करा' हे बटन दाबून स्त्रोत संपादित करा. चित्र १ प्रमाणे इंटरफेस येतो. या नंतर एडिटरच्या उजव्या बाजूस पेन आयकॉन वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला यथादृश्यसंपादक (दृश्य संपादन) असा पर्याय मिळतो. चित्र २ प्रमाणे इंटरफेस येतो व चित्र ३ प्रमाणे ते लोड होते.
-
-
चित्र १
-
चित्र २
-
चित्र ३
संदर्भ जोडा
[संपादन]खालील उदाहरणात मुंबई हा लेख दाखवला आहे. लेखातील बदल हा आहे.
यथादृश्यसंपादक मध्ये चित्र ४ प्रमाणे दिसेल. आपल्याला ज्या जागी संदर्भ जोडायचे असेल त्याजागी चित्र ५ प्रमाणे कर्सर ठेवा. चित्र ६ व ७ प्रमाणे टूलबार मध्ये उद्धृत करा
असा एक पर्याय दिसेल. चित्र ८ मध्ये दाखविल्यानुसार त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला चित्र ९ सारखे दृष्य दिसेल. चित्र १० मध्ये दाखिवल्याप्रमाणे त्यात दुवा टाका. चित्र ११ मध्ये दुवा संदर्भ चढताना दिसेल. चित्र १२ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली दिसते. चित्र १३ प्रमाणे बदलांचा आढावा घेऊन बदल प्रकाशित करा. संदर्भ प्रकाशित झालेला चित्र १४ मध्ये दिसतो आहे.