सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विमानतळांच्या नावात योग्य बदल करावा.[संपादन]

तुतिकोरिन वगैरे असे काही नाव नसून तुत्तकुडि असे नाव आहे,बदल अपेक्षीत चे.प्रसन्नकुमार ०६:५३, ६ जून २०१० (UTC) तसेच वेल्लोर नसून वेल्लूर असे नाव आहे. क.लो.अ. दिंडुक्कल हे नाव असून दिंडिगुल वगैरे असे काही नाही.
तंजावर असे मराठीत म्हणत असतीलही परंतु स्थानिक उच्चार आणि नाव तंजावूर असे आहे ,तमिळ मध्ये ऊर ह्या शब्दाचा अर्थ गाव असा होतो. वेल्लूर,कडलूर,कोइमतूर इ.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०६:५६, ६ जून २०१० (UTC)

भारतातील विमानतळे साचे[संपादन]

.प्रथम दर्शनी साचा:भारतातील विमानतळ योग्य मार्गावर आहे असे वाटते. ग्रूप नावे टाकलेली दिसत नाहीत अशी काही अडचण आहे का ? माहितगार १३:४९, ७ जून २०१० (UTC)
साचा छान झाला आहे, साचांचे काम खरेच मेहनतीचे आणि जिकिरीचे असते.
तुम्ही विषयकाढल्यामुळे मी मूळ इंग्रजी साचा सुद्धा तपासला , काही minor गोष्टी पश्चातबुद्धीने सुचल्या
 • भारतातील विमानतळ एवजी भारतातील विमानतळे हे अनेकवचन बरे पडले असते का .
 • इंग्रजी विकिप्रमाणे झाले असले तरिही आंतरराष्टीय आणि देशांतर्गत दोन्ही दाख्वा किंवा दोन्ही लपवा असले असते तर बरे झाले असते का .इंग्रजीविकिपीडियातील लेखात प्रत्यक्षात ते दोन्ही लपवलेल्यास्थितीत दिसते आहे. आणि तसे करता आले तर बरे पडेल.
 • देशांतर्गतमध्ये [[Template: {{{name}}}|प]] • [[साचा चर्चा: {{{name}}}|च]] • [{{fullurl:साचा: {{{name}}}|action=edit}} सं अशी ओळ येते मला वाटते ती टाळणाकरिता मैही हू डॉन किंवा इतर प्रगत साचे तज्ञाचे सहाय्य घ्यावे लागे कारण तो प्रॉब्लेम मला तरी लगेच लक्षात नाही आलेला.
अर्थात या तिन्ही गोष्टी दूर्लक्षील्यातरी चालतील अशा आहेत, तेवढ्या तातडीच्या नाहीत
माहितगार ११:२७, ८ जून २०१० (UTC)

विकिक्वोट[संपादन]

नमस्कार, तुम्ही मराठी 'विकिक्वोट' मध्ये काही योगदान दिले असल्याचे पाहिले. तेथे मराठीत कसे लिहावे हे कळले नाही. मराठी विकिपीडिया सारखी इंग्रजी ते मराठी भाषा बदल करण्यासाठी तेथे सोय आहे का? Gypsypkd ०५:५०, ८ जून २०१० (UTC)

अभिनंदन आणि शुभेच्छा[संपादन]

उद्या विकिवर एक वर्ष पूर्ण होईल.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहात या बद्दल अभिनंदन . मी जी गोष्ट साध्यकरण्याकरिता चार एक वर्षे घेतली तो ट्प्पा आपण खूपच लिलया साध्य केलात. आपणही वेळोवेळी नि:संकोच सहाय्य केलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या रूपाने एक खराखूरा विकिमीत्र मिळाला .या निमीत्ताने प्रताधिकारावरून सुरूकेलेल्या चर्चेत आपली आणि अभ्यंकरांची शीघ्रकाव्य जुगलबंदीने मजा आणली त्याचे स्मरण झाले.

पुढील विकिप्रवासाकरिता शुभेच्छा माहितगार ११:५२, ८ जून २०१० (UTC)

अभिनंदन[संपादन]

नमस्कार, तुम्ही एक महत्त्वाचा टप्पा पार करीत असतांना माझ्याकडूनही अभिनंदन स्वीकारावे. तुम्ही या काळात तब्बल ७,००० संपादने करीत आहात तर मी सुमारे दीड वर्षांच्या काळात केवळ १,५०० संपादने करू शक्लो यावरूनच तुमच्या कामाचा वेग सहजपणे लक्षात येतो. आपण दोघेच वैदर्भीय येथे आहोत हे जरा खटकते. आणखी सोबती असायला हवे. असो. तुम्ही आणखी वेगाने अधिक जोमाने काम करीत राहालच. पुन्हा एकदा अभिनंदन. Gypsypkd ०९:२७, ९ जून २०१० (UTC)

नरसीकर अभिनंदन! तुमच्याकडून मराठी विकीवर उत्तरोत्तर जोमदार भर पडत राहील, अशी सदीच्छा बाळगतो. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०७, ९ जून २०१० (UTC)
तुमचा उत्साह व सर्वांना सोबत घेउन काम करण्याच्या पध्दतीमुळे मला तुमचे योगदान मोलाचे वाटते.
Maihudon १७:५८, ९ जून २०१० (UTC)

अभिनंदन[संपादन]

आपण खूप मोलाचे काम करत आहात.पुन्श्च अभिनंदन विनोद रकटे १८:०४, ९ जून २०१० (UTC)

गौरव[संपादन]

अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह

अभय नातू १८:२९, ९ जून २०१० (UTC)

पूर्वा म्हणजे पूर्वा फाल्गुनी[संपादन]

माहितीबद्दल धन्यवाद.

अभय नातू ०५:३९, ११ जून २०१० (UTC)

इंग्लिश मजकुरासंबंध्ई विनंती![संपादन]

नमस्कार नरसीकर!

विमानतळांवरील बर्‍याचश्या लेखांमध्ये इंग्लिश मजकूर भविष्यकाळात अनुवादण्यासाठी ठेवलेला दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठी विकिपीडियावर अनुवादण्याच्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असे इंग्लिश परिच्छेद महिनोन्महिने त्या लेखात पडून राहण्याचा आणि त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे तूर्तास लेखांमध्ये इंग्लिश मजकूर ठेवू नये, अशी विनंती करावीशी वाटते. इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकी दुवा देणे/ संदर्भाचे दुवे नोंदवणे, एवढी तजवीज करणे, हे सध्या श्रेयस्कर राहील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०७, १५ जून २०१० (UTC)

सध्या इंग्लिश मजकूर 'कमेंट करावा'. कमेंट करण्याचे चिन्ह वरच्या टूलबारात आहे. कमेंट करण्यामुले तो मजकूर संदर्भासाठी संपादन खिडकीत दिसेल, पण लेखाच्या दृश्य पानावर दिसणार नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:५५, १६ जून २०१० (UTC)
धन्यवाद नरसीकर! तुम्ही घेतलेली खबरदारी खरोखर कौतुकास्पद आहे. मनःपूर्वक धन्यवाद! :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१०, १९ जून २०१० (UTC)

साचा विमानतळ संकेत[संपादन]

दोन्ही साचे वापरण्यास हरकत नाही. द्विरुक्ती झाल्याने माहितीची प्रत कमी होत नाहीच :-) ही माहिती लेखाच्या सुरुवातीस असल्याने वाचकाचा पटकन संदर्भ लागेल असे मला वाटते.

असा प्रश्न व्यक्तींच्या लेखातही येतो. त्यातील जन्म, मृत्यूची माहिती लेखाच्या सुरुवातीस तसेच चौकटीतही असते. किंबहुना चौकटीतील बरीचशी (सगळीसुद्धा असेल) माहिती लेखात या न त्या रुपात परत लिहीली जातेच. तरी दोन्ही ठिकाणी संकेल लिहावे असे माझे मत आहे.

अभय नातू २२:२१, १५ जून २०१० (UTC)

[[Wikiquote:कौल]] हे पान नीट उघडत नाही.माझा कौल [[q:Wikiquote चर्चा:Administrators]], मराठी विकिपीडियावर विकिक्वोटचा दुवा देताना [[Wikiquote:कौल]] आत अलिकडे q: उपसर्ग जोडावा लागतो तो राहिल्यामुळे तसे झाले होते. >

translatewiki[संपादन]

वर usability initiative भाषांतरांना प्राधान्य द्यावे नवीन लूक मध्ये त्यातील भाषांतर खासकरून vector संबधीचे वापरली जातील.माहितगार


भारतातील बंदरांची यादी[संपादन]

'भारतातील समुद्री बंदरांची यादी' 'भारतातील बंदरांची यादी' 'भारतातील समुद्री तळांची यादी' यापैकी कोणते नांव लेखास योग्य राहील कृपया कळवावे.संकल्प व अभयलापण हीच पृच्छा करीत आहे.

माझ मत भारतातील समुद्री बंदरांची यादी हे नाव करून भारतातील बंदरांची यादी ह्या लेख नावावर लेख ठेवणे अधीक उचीत असेल, भारतात नदी/कालव्या/तळ्या काठी असलेल्या बंदरांची संख्या नगण्य आहे.
'भारतातील समुद्री तळांची यादी' एवजी 'भारतातील समुद्री सैनीकी तळांची यादी' हे शीर्षक सैनीकी गोष्टींना बरे पडेल असे वाटले.
भारतातील बंदरांची यादी शीर्षक लेखास सुयोग्य नि:सदीग्धीकरण साचा लावणे सयूक्तीक ठरेल.अर्धे कच्चे हिन्दी +मराठी जाणणार्‍या नवीन पिढीचे गैरसमज टळण्यास कदाचित मदत होईल :)

माहितगार १४:५४, २८ जून २०१० (UTC)

भारतातील असमुद्री(वेगळा शब्द?) बंदरांची यादी --> भारतातील बंदरे--> देशानुसार बंदरांची यादी+(भारतातील समुद्री वाहतूक --> भारतामधील वाहतूक)
यातील पहिल्या वर्गात माहितगार म्हणतात त्याप्रमाणे कमी लेख असतील. बहुतांश लेख (यादीच्या लेखासह) भारतातील बंदरे या वर्गात असतील.
भारतातील आरमारी तळांची यादी (लेख) --> भारतीय नौसेना
अभय नातू १५:१५, २८ जून २०१० (UTC)
माझ्या मते 'भारतातील बंदरांची यादी' असे लेखाचे नाव योग्य ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:१३, २९ जून २०१० (UTC)

विकिमेनिआ[संपादन]

मी पान तात्पुरते विकिपीडिया:विकिभेट कडे स्थानांतरीत केले आहे,तात्पुरता तेथेच एखादा परिच्छेद २०१० करता बनवण्यास हरकत नाही . en:Wikimania पान आणि सरळ विकिमेनिया २०११च भाषांतरणा करिता घेतलेले आणि येत्या चार सहा महिन्यात पूर्ण झाले तरी हरकत नाही. सध्या विकिमेनिया २०१० बद्दल तोंड ओळख झालीतरी पुरे असे वाटते.mahitgar ०८:२७, २ जुलै २०१० (UTC)

Count_edits[संपादन]

आपण दिलेला दुवा मला "403: User account expired" एवढाच संदेश देतो आहे. त्यामुळे नेमके काय करून हवे ते ल़क्षात येऊ नाही शकले.
 • आपण ३०,००० लेखांच्या टप्प्याला पोचण्यास फक्त १५ लेख बाकी आहेत.
हा टप्पा साधण्या बद्दल अभिनंदन ,
The woods are lovely, dark, and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
Robert Frost, Stopping by Woods on a Snowy Evening
US poet (1874 - 1963)
माहितगार ०७:२९, ३ जुलै २०१० (UTC)

दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा[संपादन]

मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

नमस्कार, मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०४:४४, १२ जुलै २०१० (UTC)

अर्थ कळला नाही[संपादन]

नमस्कार, काय महाराज बर्‍याच दिवसांनी दिसलात? खूप बिझी आहात का? येथे येवून संपादने करीत राहा. आपण दोघेच वैदर्भीय येथे आहोत. तुम्ही आत्ता विचारलेला प्रश्न मला कळला नाही. डॉ. कार्व्हर हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. तुम्ही राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंगटन यांच्या नावाशी साधर्म्य पाहून गोंधळलात का? तसेच मी हे पान आत्ता नवीन तयार केले नाही. मी फक्त वर्गीकरण मध्ये छोटा बदल केला आणि विकिक्वोट मधील लेखाशी या लेखाचा दुवा जोडला. Gypsypkd ११:५३, १२ जुलै २०१० (UTC) ता.क. मेल आत्ताच पाहिली. विकिक्वोट साठी थोडा वेळ देता आला तर फार बरे होईल. (जास्त वेळ मागत नाही) Gypsypkd ११:५३, १२ जुलै २०१० (UTC)

त्रास-बिस काही नाही[संपादन]

नमस्कार नरसीकर!

त्यात त्रास-बिस मानून घेण्यासारखे काही नाही. नो प्रॉब्लेम.
बरं, अजून एक मुद्दा आपल्याही लक्षात आणून द्यायचा होता - मराठी विकिपीडियावर 'बाह्य दुवे' देताना इंग्लिश किंवा अन्य परकीय भाषांमधील (= मराठी सोडून अन्य सर्व भारतीय व अभारतीय भाषा) संकेतस्थळांचे दुवे देताना त्या-त्या ठिकाणी मजकुराची भाषा जरूर नोंदवावी. हे करण्यामागचे प्रयोजन असे की, मराठी विकिपीडियावर गृहित भाषा केवळ 'मराठी' व गृहित लिपी केवळ 'देवनागरी' आहे; यांखेरीज अन्य भाषांमधील/ लिप्यांमधील शब्द/दुवे नोंदवायचे असल्यास, वाचकांना त्या-त्या भाषेची किंवा लिपीची स्पष्ट पूर्वकल्पना देणे हितावह ठरते. त्यामुळे कोणत्याही इंग्लिश संकेतस्थळावरील दुवे 'बाह्य दुवे' विभागात नोंदवताना तिथे '(इंग्लिश मजकूर)' असे दुव्याच्या अखेरीस नोंदवावे. उदाहरणादाखल जोधाबाई लेखामधील बाह्य दुवे पाहावेत.

हाच संकेत परभाषक शब्दांची त्या-त्या स्थानिक भाषांमधील लेखने नोंदवताना पाळावा. उदाहरणादाखल कान्सू हा लेख पाहावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०४, १४ जुलै २०१० (UTC)

अंकपत्ता(IP address) वापरणार्‍या सदस्यांचे स्वागत[संपादन]

अंकपत्ता वापरून संपादन करणार्‍या सदस्यांचे स्वागत आपण साचा:स्वागत वापरून करत आहात.तसे त्यात वावगे काही नाही पण आपणास कल्पना देऊन ठेवण्याचे दृष्टीने आपन खालील मुद्यांबद्दल विचार करून इष्ट निर्णय घेण्यास सोपे जावे म्हणून खालील माहिती.
 • प्रथमतः बहुसंख्य अंकपत्ते डायनॅमिक असतात म्हणजे मी आत्ता सदस्यत्व न घेता/प्रवेश नकरता काही संपादन विकिपीडियावर केले तर त्या वेळचा माझा अंकपत्ता वेगळा असेल आणि (लगेच संपादन न करता) काही काळाने मी पुन्हा संपादन केले तर त्या वेळचा अंकपत्ता वेगळा असेल. त्यामुळे (लगेच दिलेले सोडून) उशीर झालेले स्वागत संदेश माझ्या कडून वाचले जाण्याची शकयता कमी, नपेक्षा माझा Internet Service Provider माझा आधीचा अंकपत्ता ज्याला देईन तो मराठी विकिपीडियावर आलातरच त्याला संदेश दिसणार आहे.
 • दुसरे एखादा जुना सदस्य अनवधानाने अंकपत्त्यावरून संपादन करत असु शकतो, आणि त्यालाही मागचाच साचा:स्वागत पुन्हा दिसेल. साचा:स्वागत मध्ये साचा:Fasthelp प्रमाणे त्यांचा सदस्य प्रवेश झालेला नाही आणि संपादन अंकपत्त्यावरून होत आहे हे न लक्षात आल्याने थोडासाच जुना असलेला सदस्य आपले संपादन अंकपत्त्यावरून होत आहे हे लक्षात न येऊन स्वतःच्या सदस्य चर्चा पानावरची बाकी चर्चा आणि विचारलेल्या शंका कुठे गेल्या असा विचार करून गोंधळणारतर नाही असा एक विचार मनात येतो.
 • तीसरे बहुसंख्य उत्पात हा अंकपत्ता सदस्यांकडून जाणता किंवा अजाणता होतो.जाणीवपूर्वक उत्पातकरणार्‍यांना "आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो." या वाक्याने गर्भीत अर्थ वापरून उत्पाता विचारांपासून परावृत्त करण्याचा उद्देशही आहे.

आपल्याला स्वागत साचा अधिक सुशोभित वाटल्यामुळे/किवा इतर फिचर्स आवडल्यामुळे आपण तो वापरत असल्यास त्यातील फिचर्स वापरून अंकपत्त्यांच्या स्वागताकरिता असलेल्या साचात सुयोग्य बदल घडवता येतील किंवा कसे काय या बद्दल काही सुचना असल्यास कळ्वणेमाहितगार ०८:३३, १५ जुलै २०१० (UTC)

मी अंकप्त्पत्ता सदस्यांचेही स्वागत करण्याचे स्वागतच करतो,इन फॅक्ट तसे हवे आहे केवळ दुसर्‍या विशेष साचाच्या माध्य्मातून , कारण साचा:स्वागत मधुन काही उपलब्ध गोष्टी आणि वाक्यरचना, काही अंकपत्ता उपयोगकर्त्यास काही विशीष्ट परिस्थितीत गैरलागू ठरतात जसे विकिमार्गदर्शकास माझ्याचर्चा पानावर पाठवा (याबाबतीत तो सहाय्य मिळण्याची वाटच पहात राहील,नवागतास आपला अंकपत्ता बदलला गेला हे उमगणार नाही आणि नवागत सहाय्यकर्ताही चुकीच्या पानावर सहाय्य पोहोचवेल), शिवाय मी आधी म्हणालोप्रमाणे त्या व्यक्तीचे संपादन अनामिक पणे होते आहे आणि त्याने सदस्यत्व घेणे किंवा प्रवेशकरणे हि प्रक्रीया अधीक चांगली याची सुचना सदस्य स्वागत साचात गरजेची नाही पण अनामिक सदस्य साचात गरजेची आहे त्या शिवाय फाँटहेल्पची गरज अनामिक सदस्यांना असण्याची शक्यता जास्त आहे. त्या शिवाय स्वागत साचात खाली लिहिण्याकरिता येथे टिचकी मारा चे बटन आहे ते अंकपत्त्यांच्या बाबतीत गैरलागू ठरते.
मी अंकपत्ता सदस्यांचे स्वागताकरिता साचा:धूळपाटीसाचा१४ येथे नवा साचा स्वागत प्रमाणे सुशोभित साचा बनवला आहे. तो सुयोग्य सुधारणा घडवून साचा:स्वागतअसो अथवा साचा:अंकपत्तास्वागत अशा तुम्हाला सोयीच्या नावाने जतन करून घेतल्यास अंकपत्ता सदस्यांचे स्वागत अधीक योग्य सुचनांच्या सहाय्याने करता येईल असे वाटते.माहितगार १०:२९, १५ जुलै २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

convert[संपादन]

short list व full list बद्दल माहितीसाठी इंग्लिश विकिचा दुवा देत आहे, अजुन तरी सर्व याद्या मराठी विकित आणलेल्या नाहि आहेत. {{Convert/list of units}}

साच्यांच्या अभ्यासासाठी इंग्रजी विकिपिडियावरील काहि दुवे देत आहे, [१], [२]

Maihudon १३:१७, १६ जुलै २०१० (UTC)

स्टॅटीक अंकपत्ता ओळखण्याचे तंत्र[संपादन]

विशेष:योगदान/116.72.169.119 हे अंकपत्ता योगदान तपासले तर दिर्घ कालावधी नंतरही(मार्च नंतर एकदम जुलै) अंकपत्त्यावरून एकाच प्रकारची/एकाच विषयातील संपादने हा (नेमकेपणाने सांगता नाही आलेतरी) स्टॅटीक म्हणजे दिर्घकालीन अंकपत्ता (बर्‍याचदा कायमस्वरूपी) असल्याचा अंदाज देते. या अंकपत्त्यावरून (काही चूका सोडल्यातर) चांगल्याच संपादनांचा प्रयत्न चालू आहे असे दिसते.

हि माहिती केवळ माहिती करिता म्हणून शेअर केली .

माहितगार १५:०३, १६ जुलै २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

धन्यवाद तुमच्या सूचना मी नक्की पाळेन. मदतीची अपेक्षा. Swapnilprakashpatil ०८:२४, १९ जुलै २०१० (UTC)

स्वप्नील पाटलांना तत्पर मदत केल्याचे पाहिले. धन्यवाद! :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०१, १९ जुलै २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

आपण खुशाली विचारली.बर वाटल.सध्या नोकरीत व्यस्त असल्याने वेळ मिळत नाही.त्याच खूप वाईट वाटतय. विनोद रकटे १५:०२, २२ जुलै २०१० (UTC)

तुमचे पोहे..[संपादन]

नमस्कार व्ही.नरसीकर, तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये (दूव्यामध्ये)= इथे आलु टाका असे लिहिलय...म्हणजे काय्??आता हे आलु काय भानगड आहे?? विदर्भात पिकणारा पदार्थ आहे का तो??त्याला इतर नावे कोणती?? ते दिसत कस?? किंवा तो आलु जे काही असेल ते..तुमच्या पोहे लेखात विस्तृत चर्चा केली आहे ती पहावी. செ.प्रसन्नकुमार १७:५५, २२ जुलै २०१० (UTC)

तुमच्या आलुविषयी[संपादन]

नमस्कार व्ही.(किंवा तुमच्या लिखाणानुसार वी.)नरसीकर,मला एक नविनच शोध लागलाय तो म्हणजे विदर्भातील लोक बटाट्याला आलु असे म्हणतात, नंतर मला असं लक्षात आलं (इथे तुम्ही आल्याला-अदरक वगैरे म्हणत असाल पण तो हा शब्द नाहिये) कि ह्या लेखात कुणीतरी आलु ह्या हिंदी शब्दास (आता तो हिंदी कि मराठी माहित नाही पण हिंदीच/उत्तरभारतातील असावा असे वाटते) पुनर्निर्देशीत करुन मराठीतील सर्वसाधारण वापरातील (प्रमाण शब्द)" बटाटा" कडे वळविले आहे.माझ्या माहितीनुसार मला इतके दिवस वाटत होते कि "बटाटा" हाच मराठी शब्द आहे पण त्यास मराठीत आलु (?) म्हणतात हे आपल्यामुळे कळले त्याबद्दल धन्यवाद .(माझा आणि विदर्भाचा फारसा संब्ंध नाही किंवा तिकडे जाणे येणे नाही, मी आपला पुण्यामुंबईत राहणारा मराठी माणूस त्यामुळे शेव बटाटा पुरी,बटाटा वडा,कांदे-बटाटे पोहे,अळूभजी,अळुवडी इ.(आलुभजी नाही) शब्दांशी परिचीत असणारा तसेच दक्षिणेकडे काही दिवस राहिल्याने हिंदी शब्दांची माझी ओळख तशी कमीच,असो.).कदाचीत काही दिवसांनी आणखी नवनविन शब्दांची त्यात भर पडेलही पण एक प्रमाण शब्द म्हणून आणि विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी आपण सोपा आणि सुटसूटीत ज्ञानकोश निर्माण करू शकलो तर सर्व मराठी भाषकांस ते उपयुक्त होईल पर्यायाने सर्व मराठी जनमाणसात एकसारखीच प्रमाण बोलीभाषा निर्माण होण्यास मदत होईल असे मला वाटते.जसे इंग्रजी विकिपीडिया किंवा इंग्रजी भाषेत जो शब्द योग्य असतो तोच बहूदा उल्लेखीत असतो इतर जर्मॅनीक किंवा रोमान्स (हे दोन मुख्य भाषांचे गट/प्रकार आहेत) भाषेतील शब्दप्रयोगांचा उल्लेख नसतो तसेच काहीसे मराठी (भाषा आणि विकिपीडिया) बद्दल करता आले तर बरे होईल नाहीतर मराठी शब्दकोशा ऐवजी तो सर्वभाषांचा (बहूदा भारतातील) सामाईक शब्दकोश/ज्ञानकोश व्हायचा.माझ्यामते विकिपीडियावर फक्त प्रमाण भाषा असावी आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे त्या त्या भागातील शब्दप्रयोगाविषयी टिपा त्याही लेखात कुठेतरी समाविष्ट केलेल्या असाव्यात.माझ्या पहाणीत मराठी विकिपीडियावर हिंदी (किंवा इतर देवनागरी भाषांतील शब्दप्रयोग) शब्दांची रेलचेल अधिक प्रमाणात आढळते ते कदाचीत लिपीसाधर्म्यामुळे असावे किंवा मग रोजच्या व्यवहारात लुप्त होत जाणार्‍या मराठी शब्दांविषयी अनास्था असल्यामुळे होत असावे.आपण विकिपीडियन्स ने ह्याविषयी जागरूकता दाखवून (लेखांविषयी,शब्दप्रयोग,भाषाप्रयोग इ.) एक उत्तम दर्जाचा मराठी भाषेतील ज्ञानकोश निर्माण करून मराठी शब्दांचे स्थान अबाधीत राखले पाहिजे आणि जमेल तसे माध्यमांना सूचना करुन योग्य शब्दांची आठवण करून द्यायला हवी त्याने इतर भाषांतील शब्द तर त्यांच्या ठिकाणी राहतीलच शिवाय मराठी राज्यात मराठी शब्द आणि भाषेचे वैशिष्ट्य टिकून राहिल.(आपण एक जबाबदार नागरीक आणि विकिपीडियावरील संपादक ह्यानात्याने प्रमाण मराठी शब्दांचा प्रसार करू शकतो आणि त्याद्वारे भाषेची सेवाच होईल असे मला वाटते,भविष्यात हळूहळू अनेक बोली नाहिशा होऊन (जे आता होतच आहे) एक सामाईक प्रमाण बोली आस्तित्त्वात येण्यास त्याद्वारे मदतच होईल.विशेषत: मराठीचे महाराष्ट्रातील स्थान पाहता,तीला ह्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे.) (मी एवढे उपदेशात्मक सांगतोय ह्याचा अर्थ मी काही कुणी मोठा मराठीभाषातज्ञ आहे किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या विचाराने प्रेरीत होऊन सांगतोय असे नाही,मी एक सामान्य मराठीचा कळवळा असणारा अस्सल मराठी भाषक होण्याचा प्रयत्न करणारा विकिपीडियाचा संपादक आहे. ) आपण कोणत्याही गोष्टीचा गैरसमज न करता.मोकळेपणाने माझ्याशी बोलून आपल्या सूचना मला कळवा.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार ०४:५५, २३ जुलै २०१० (UTC)

आमचेही बटाटेपोहे खा.[संपादन]

नमस्कार नरसीकर,तुमचा वैदर्भीय पाहूणचार घेण्याचा योग सहजच आला,पण आता आमच्या अस्सल मराठी पोह्यांची चव (टेस्ट)चाखायला या. बाकी चर्चा होतीलच पण सर्वांसाठी एक छान माहिती देण्यासाठी हा खटाटोप ,मराठी भाषेत हा सर्व खटाटोप का करावा किंवा मातृभाषाच का? ह्या वर छान असे काव्य मला आढळले ते अवश्य पहावे.कदाचीत कुणाला सांगायलाही होईल.आम्ही उगीचच आमचा वेळ घालवत नाही ते..असो

 • ह्या चर्चेबाहेरचे परंतु एक वेगळीच माहिती आपल्यासाठी = सर्वांनी अवश्य वाचावी अशी.

भारतेंदू हरिश्चंद्र (आधुनिक हिंदी साहित्याचे जनक)(साहित्य हरिश्चंद्र ),1885 ह्या विद्वान साहित्यीकाने आपल्या मातृभाषेविषयी काय म्हटले आहे ते अवश्य वाचावे.अधिक माहिती करीता इंग्रजी विकिपीडीयावर भारतेंदू हरिश्चंद्र ह्या लेखाचा शोध घ्यावा. The following two rhyming couplets are taken from his famous poem, मातृ-भाषा के प्रति (For the Sake of Mother-Tongue or Towards Mother-Tongue). The poem has ten couplets in total. The poet asserts the importance of using mother tongue as a medium of instruction – conversational and educational.

  निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल ।
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ।।
विविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार।
सब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार ।।
Translation:
Progress is made in one's own language (the mother tongue), as it the foundation of all progress.
Without the knowledge of the mother tongue, there is no cure for the pain of heart.
Many arts and education infinite, knowledge of various kinds.
Should be taken from all countries, but propagated in own mother tongue.

तात्पर्य= माणसाचा खरा विकास होतो ते त्याच्या मातृभाषेतच,त्यामुळे कुठेही जा कितीही माहिती मिळवा पण आपल्या भाषेतून ती समजावून घ्या म्हणजे विकासाचा पाया अधिक समृद्ध होतो.इंग्रजांनीही अगदी असेच केले असावे त्यामुळे आज इंग्रजीला जागतीक महत्व असावे.असो.

वर्ग:किटकनाशके नको; वर्ग:कीटकनाशके[संपादन]

नमस्कार! वर्ग:किटकनाशके हे वर्गीकरण लेखनदृष्ट्या शुद्ध नव्हे. वर्ग:कीटकनाशके हे लेखन शुद्ध होईल. मूळ संस्कृतात 'कीटक' असे लेखन आहे. आणि तद्भव शब्दांच्या इकार-उकारांबाबत (अंत्य इकार-उकार वगळता) मराठीतील लेखननियम संस्कृताप्रमाणेच चालतात.

उपवर्गांचेही लेखन दुरुस्त करावे लागेल, असे दिसते.

खेरीज 'पारंपारिक' हे लेखन योग्य नव्हे; ते 'पारंपरिक' असे असायला हवे. 'परंपरा' या शब्दाचे इक-प्रत्ययान्त नाम बनवताना आद्याक्षर गुरू होते (म्हणजे प => पा), परंतु त्यापुढील अक्षरांचे गुरू अक्षरात रूपांतर होत नाही. उदा.: 'रसायन' शब्दातील 'र' गुरू होऊन 'रा' होतो; 'य' गुरू होऊन 'या' होत नाही. 'रासायनिक' हे लेखन योग्य; 'रासायानिक' अर्थातच अयोग्य.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०६, २४ जुलै २०१० (UTC)

साचा:Marathihelp[संपादन]

साचा:Marathihelp या साचाचा उद्देश साचा मजकुर वाचल्या नंतर आपल्या लक्षात येईलच. साचात सुयोग्य सुधारणा कराव्यात हि नम्र विनंती.माहितगार ०६:३१, २६ जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:सजगता[संपादन]

हो ते हवेच आहे.सोबतच हे संदेश कमीतकमी शब्दात काही सुशोभीकरण सहज शक्य असेल तर आंतर्भूत करण्यातही सहाय्य हवे आहे.शुद्ध लेखन आणि सुशिभितकरणे पूर्ण झाल्यानंतर हि संदेश पाने कायस्वरूपी प्रचालकांकरिता सुरक्श्ःईतकरणे गरजेचे आहे. एकुण बेत सदस्यांना काही माहिती संपादनसंख्येनुसार अभिनंदन करताना द्यावी. काही माहिती विकिपीडिया:साईट नोटीस पानावर नमुद केल्या प्रमाणे विवीध बाबतीत सजगता आवश्यकतांबाबत गटवार सजगता संदेश उपलब्ध करावेत, प्रथमतः ते गट/विषयवार प्रथमतः साईट नोटीस मधून दाखवावेत, नंतर अविशीष्ट अनुक्रमे सलग वर्षभर दाखवावेत(गट/विषयवार संबधीत पानावर स्थानांतरीत करावे). पण साईट नोटीस मधून असे संदेश कायम दाखवणे खूपसे सयूक्तीक ठरत नाही त्यामुळे साधारणतः वर्ष दिडवर्षानंतर , होपफूली सर्वसाधारणतः सजगता वाढली आणि सदस्य परस्परांना अधीक विश्वासाने मार्गदर्शन करावयास लागले म्हणजे सजगता संदेश गट/विषयवार केवळ सयूक्तीक पानांवरून उपलब्ध करावेत असा मानस आहे.

यात पुढचा भाग प्रचालन सजगता असाही घेण्याचा मानस आहे. माहितगार १०:१८, २६ जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता[संपादन]

सवडीनुसार विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता येथेही काही सुयोग्य बदल सुचवता/करता आलेतर हवे आहे.माहितगार ०६:५०, २७ जुलै २०१० (UTC)

साचा:मूलकण माहितीचौकट[संपादन]

'साचा:मूलकण माहितीचौकट' हे योग्य राहिल.

No probs. सुचवत राहा. Anyways i was also thinking on similar lines for Parity=साम्य/समानता but the problem is it doesn't feel like larger meaning of the word in particle physics. Gimme some more time. If no better word can be found out then this seems to be the closest one so far.

p.s. reason of sudden shift to english: मराठी टंकलेखनाचा कंटाळा :(

अनिकेत जोगळेकर १२:१०, २९ जुलै २०१० (UTC)

काही चित्र विनंत्या[संपादन]

या लेखना बद्दल बर्‍याच जणांची तक्रार असते.त्या ऐवजी अॅ अ वर चंद्रकोर यावी अशी मागणी असते तर व बर्‍याचदा बरेच जण विन्स्लो, अॅरिझोना असे लेखन करून मोकळे होत आहेत. अ वर चंद्रकोर हा प्रकार खरे तर सिडॅक आणि यूनिकोड मंडळींनी मिळून सोड्वायचा आहे. पण अ वर चंद्रकोर चे चित्र मिळाले तर विकिच्या बगझीलावर किमान तांत्रिक चौकशी तरी करून पहावे म्हणतो.
त्या येत्या काही महिन्यात काही घोषवाक्यांची चित्रे करून फेसबुकवरून प्रसारित करावित असा मनोदय आहे. अर्थात या वाक्यांचा संबध मराठी आणि विकिपीडीया या दोन्ही संदर्भात असेल.
काहिशी खाली धर्तीवरची वाक्ये काल मनात घोळत होती आत्ता नेमकी कालच्याप्रमाणे आठवत नाहित त्यात अजून सुधारणा करेन पण उदाहरणा दाखल:
 • वाचक हवे आहेत ! (खाली कंसात अजून एखादे मराठी विकिपीडिया वेधक वाक्य)
 • Here is a global tender for genetic engineers to change languge of 9 crore people if they can या धर्तीवर एखादे (वेधक वाक्य)

तुमचे काही सजेशन असेल तर जरूर द्यावेमाहितगार ०६:३७, ३० जुलै २०१० (UTC)

होय संचिका खूप छान झाली आहे खूपखूप धन्यवाद माहितगार १३:००, ३० जुलै २०१० (UTC)

विज्ञानातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही उपयुक्त शब्द[संपादन]

भौतिकशास्त्रातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही सतत येणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द असलेली एक यादीच जतन करावी असे वाटते. कुठे करु?

’वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा’ हे कोठेतरी पाहिले पण ही नुसतीच झलक आहे. हे कसे? अनिकेत जोगळेकर ११:४४, ३० जुलै २०१० (UTC)

वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द[संपादन]

मी सुद्धा वर्गास उपपान हा प्रयोग प्रथमच केला आहे.पण हे सयूक्तीक ठरेल असे वाटते,खरे तर संकल्पाम्चेही यावर मत घ्यावयास हवे , त्यांचे मत कदाचित वेगळेही असू शकेल.पुढे मागे काही बदल करावयाचे झाल्यास माहिती काढून इतरत्र डकवता येईल असे वाटते म्हणून अधीक विचार नकरता सरळ पुढे गेलो एवढेच.
मला वाटते हि यादी सारणीत नेली तर बरे , पण अनिकेत जोगळेकरांना सारणीत लेखन करण्याची सवय नसताना हटकण्याचे जीवावर येते आणि मी आधिच त्यांना भली मोठी लांब उत्तरे दिली आहेत. हे काम पुन्हा केव्हातरी करु.
विज्ञान हा माझ्याही आवडीचा (वाचना करिता, माझ्या अभ्यासाचा नव्हे ) विषय असला तरी प्रत्यक्ष पारिभाशिक शब्दात लक्ष घलणे (कॉन्संट्रेट करणे) लगेच जमेलसे असवाटत नाही.
वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द याचा उपवर्गात पुन्हा वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द पुन्हा उपवर्ग म्हनून दाखवत आहे असे का होते मलाही कल्पना नाही. मला वाटते तात्पुरते या त्रूटीकढे दुर्लक्ष करावे.माहितगार १५:२६, ३० जुलै २०१० (UTC)

आणखी आवाज[संपादन]

नमस्कार, तुम्हाला आधीच्या फाईल मधला आवाज आवडल्याचे म्हणालात त्याबद्दल धन्यवाद. आता मोर आणि लाल बुडाचा बुलबुल हेही पहा. येवढ्यात पावसाचा जोर असल्याने जमेल तेव्हा बाहेर पडून रेकॉर्डींग केले आहे. त्यातून निवडक आवाजच येथे चढवायचे आहेत. सगळे एक हाती असल्याने थोडा त्रास होतो पण काम जमले आणि तुमच्यासारखी दाद मिळाली की आनंद होतो. Gypsypkd ११:२५, ३१ जुलै २०१० (UTC)