सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आभार[संपादन]

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Maihudon ०७:४६, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

आपल्या उत्तरावर प्रतिक्रिया माझ्या चर्चा पानावर लिहीली आहे.धन्यवाद.-मनोज २२:१२, १ ऑक्टोबर २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

सध्या इतर राष्ट्रकुल खेळात थोडा व्यस्त असल्यामुळे उत्तर देण्यास उशीर होतो आहे. थोडा मोकळा वेळ भेटल्यावर तुमच्या सर्व सुचनांवर काम करेल.

१६:३१, ५ ऑक्टोबर २०१० (UTC)

Ek Sawal[संपादन]

Hi there, We need translators for Indian Languages. Would you be interested in helping us with translation for Indic scripts? Thanks.Theo (WMF) २१:४५, २१ ऑक्टोबर २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

धन्यवाद V. narsikar, aapki sahayta ke liye. Theo (WMF) १६:१६, २१ ऑक्टोबर २०१० (UTC)

अभिनंदन[संपादन]

माफ करा तुमचे अभिनंदन करण्यास उशीर झाला आहे. मी आजच माझ्या कामावर रुजू झालो आणि आपली निवड झाल्याचे पाहिले. मनःपूर्वक अभिनंदन. आशा करतो की आपल्याकडे सर्व क्षेम असेल. gypsypkd (चर्चा) १०:२१, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)

Google Chrome[संपादन]

Nice marathi names. :-) वि. आदित्य १६:०३, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)

आदर्श लेख[संपादन]

नमस्कार!

कुठलाही एकच लेख आदर्श मानणे अवघड आहे.. मात्र मुखपृष्ठ सदरासाठी व उदयोन्मुख लेखासाठी निवडले गेलेले लेख मार्गदर्शक ठरायला हरकत नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३२, २९ ऑक्टोबर २०१० (UTC)

नव्या एक्स्टेन्शनांच्या स्थापनांसाठी कौल[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विस्तार-सिद्धतेसाठी काही नव्या मीडियाविकी एक्स्टेन्शनांची स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्याचा प्रस्ताव मी विकिपीडिया:कौल#नव्या एक्स्टेन्शनांची स्थापना येथे मांडला आहे. आपण आपला प्रस्तावागणिक कौल त्याच पानावर द्यावा, अशी सादर विनंती!

धन्यवाद.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३६, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)

बॅनस्टार[संपादन]

१००० संपादनांचा बॅनस्टार दिल्याबद्दल आभाराचा आपण कृपया स्वीकार करावा.

धन्यवाद,

--वि. आदित्य (चर्चा) ०९:४२, १४ नोव्हेंबर २०१० (UTC)

विंनंती[संपादन]

नम्सकार,

सुचने बद्दल धन्यवाद, पुढे काळजी घेयीन.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:५९, २३ नोव्हेंबर २०१० (UTC)

Thank you[संपादन]

Thank you for the translation Narsikar, would you mind translating the message below and posting it on marathi Wikipedia Community page/Village Pump. There is also the Localized version of the donation page that we would love to have in Marathi, if you or anyone from the Marathi Wikipedia would like to help us with that please consider translating [१] and [२] in .mr, I really appreciate all the help, Thank you. Theo (WMF) १७:५९, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)

Contribute Campaign[संपादन]

Hi everyone, I wanted to inform everyone about the ongoing Contribute campaign for this year's fundraiser. As part of the campaign, we want to drive up participation on the Indian language Wikipedias, We have created a page on Meta where we can discuss and brainstorm Ideas on what we can do to improve Indian Language Wikipedias. I would like to invite anyone who is interested in contributing to join in, and share their thoughts. Thank you. [३]Theo (WMF) १७:५९, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)

मत हवे[संपादन]

नमस्कार नरसीकर, क्रुपया साचा चर्चा:Navbox येथील माझा संदेश बघावे, व आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४५, २ डिसेंबर २०१० (UTC)

नववर्षाभिनंदन[संपादन]

* हॅप्पी न्यु इयर २०११* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*

प्रसन्नकुमार १४:४०, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

काही हरकत नाही. जेवढा आणि जसा वेळ मिळेल, तसे थोडा वेळ आलात, तरीही फार बरे होईल.
बाकी, सध्या इथे भरपूर चांगली भर पडत आहे. त्यामुळे काम करायला हुरूप येतोय. :)
बाकी, ग्रेगोरियन नववर्षानिमित्त शुभेच्छा!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४३, २ जानेवारी २०११ (UTC)

काय कसे काय?[संपादन]

नरसीकर,

बरेच दिवसांत काही संदेश नाही. सगळे ठीकठाक?

अभय नातू १३:५९, २८ जानेवारी २०११ (UTC)

नरसीकर, तुमचा अधूनमधून वावर आणि सहभाग दिसतो... बरे वाटते. असेच येत जा (आणि इतरांनाही आणा :) ).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५१, २९ जानेवारी २०११ (UTC)

नरसीकर धन्यवाद् माझ्यासारख्या न्वीन सदस्यास मदतीबद्दल धन्यवाद [Dr.sachin23 ०९:२८, २९ जानेवारी २०११ (UTC)]

धन्यवाद[संपादन]

नरसीकर धन्यवाद् माझ्यासारख्या न्वीन सदस्यास मदतीबद्दल धन्यवाद Dr.sachin23 १७:२८, ३१ जानेवारी २०११ (UTC)

नमस्कार,
संचिका चढवा पद्धतीत कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडिया पद्धतीचा सुटसूटीत पणा आणण्या साठी,इंग्रजी विकिपीडियावरून बेतलेल्या विकिपीडिया:संचिका चढवा पानाचे मराठी भाषांतरात आपले सवडीनुसार सहाय्य हवे आहे
आपला
माहितगार १९:१४, ३ फेब्रुवारी २०११ (UTC)
नमस्कार ! ठीक आहे एकंदरीत. :) मराठी विकिपीडियावर गेल्या काही महिन्यांमध्ये आशयाची चांगली भर पडत आहे. तुमची हालहवाल काय ? कसे चालले आहे ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३९, १४ जून २०११ (UTC)
हरकत नाही. जेव्हा जमेल तेव्हा येत जा. :) आणि तुम्हांला आवडेल त्या विषयाचा पाठपुरावा करून त्यात आशयाची भर घातलीत, तरीही थेंबे थेंबे तळे साचेल. लेख फुलवायला चार-पाच महिन्यांचा अवधी लागला, तरीही हरकत नाही; पण तुम्हांला स्वतःलादेखील त्यातून मौज वाटेल आणि त्यातूनच इथे परत परत यावेसे वाटेल. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, १४ जून २०११ (UTC)

खूप दिवसांनी[संपादन]

दिसलात....नवीन/वाढीव काम कसे चालू आहे?

अभय नातू १६:११, २१ जून २०११ (UTC)


धन्यवाद![संपादन]

शुद्धलेखन सुधारण्यासाठी मला बारकाईने काम करावे लागत नाही. सहज वाचतावाचता ज्या चुका नजरेला खुपतात तेवढ्याच मला सुधारायला मिळतात. शुद्धलेखनापेक्षा व्याकरणावर काम करताना अधिक बारकाईने काम करावे लागते. भोंगळ शब्दरचना केलेली आणि एकच आशय सांगणारी अनेक वाक्ये बदलून, कमीतकमी शब्दांत तोच भावार्थ व्यक्त करणारे एखादेच वाक्य ठेवताना माझी खरी कसोटी लागते. ते काम जसे मला जमेल, तसे करण्याचा माझा प्रयत्न असतो. विकिपीडिया ज्ञानकोश असल्याने त्यात अघळपघळ विधानांना स्थान असू नये असे मला वाटते. अमराठी शब्द मराठीत लिहिताना कोणती तथ्ये पाळावीत हे सांगण्यासाठी आपल्या पूर्वसूरींनी विशद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुरेपूर पालन कसे होईल, इकडे माझा कटाक्ष असतो.

आपल्या शुभेच्छांबद्दल आभार....J १४:२६, २ जुलै २०११ (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

गुगल म्यापस[संपादन]

नमस्कार नरसीकर,

लेखातील माहिती त्या लेखात टाकली, पानकाढा साचा लावला.

त्रुटी लक्षात आणुन दिल्याबद्दल धान्यवाद ...!

राहुल देशमुख १२:०८, ११ जुलै २०११ (UTC)

एकत्रीकरण कोण करणार?[संपादन]

जोपर्यंत तुंबा(Leucas indica) आणि तुंबी(Leucas aspera) या दोन्ही द्रोणपुष्पी या समान नावाने ओळखल्या जाणार्‍या वनस्पती एकच आहेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत या पानांचे एकत्रीकरण कसे आणि कुणी करायचे? या विषयावर निर्णय घेण्याइतकी मी अधिकारी व्यक्ती नाही, तरीसुद्धा, जशी एकाच वनस्पतीला एकाहून अधिक शास्त्रीय नावे असू शकतात, तशीच मराठी नावेही आहेत असे समजून एकत्रीकरण व्हावे असे माझे मत आहे. ...J १०:५५, १२ जुलै २०११ (UTC)

शंकर दाजीशास्त्री पदे[संपादन]

वैद्यराज महामहोपाध्याय पदेशास्त्री यांचे संपूर्ण नाव शंकर दाजीशास्त्री पदे असे असावे. नरसीकरांच्या अनेक लेखांच्या शेवटी हे नाव उलटसुलट पडले आहे असे आठवते. शास्त्रीबुवांच्या आयुर्वेदाच्या ग्रंथावर नक्की काय नाव आहे हे पाहून पदेशास्त्रींवरच्या माझ्या लेखात आणि आपल्याही लेखांत गरज असेल तर, योग्य ते बदल करावेत, ही विनंती... J १६:४१, १२ जुलै २०११ (UTC)

नियमित प्रोत्साहन[संपादन]

नमस्कार नार्सिकारजी ,

मध्यंतरी डॉ सचिन ह्या सदस्यांनी गौरव हा काय प्रकार असतो....? अशा आशयाचे लिखाण चावडीवर केले होते त्यावर थोडी चर्चा पण झाली. हि गोष्ट खरी आहे कि प्रोत्साहन देण्यासाठी गौर्वासारखे दुसरे साधन नाही.

आपण ह्या मताशी सहमत असालच, आपण ४-५ सदस्याची गौरव समितच बनवून टाकवि असे वाटते, प्रचाल्कानी याआधीच सांगितले कि गौरव कुणीही करू शकतो आणि प्रचालकांना इतर कामातून त्यासाठी वेळ काढणे कठीण होते. मग जर अशी समिती बनवली आणि तिने दर महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात किमान स्वरूपातील जसे १००० संपादने, २००० , ५००० संपादने किंवा काही इतर गौरव, (सदस्यांचे काम तपासून ) प्रचालकांनकडे शिफारीस करावी आणि प्रचाल्कानी (पदसिद्ध) अथवा त्यांनी मनोनीत केलेल्या सदस्यांनी के कार्य पूर्ण करावे असे वाटते.

मी आपणास विनंती करतो कि ह्या बाबत आपण पुढाकार घ्यावा. चावडी ध्येय आणि धोरणे मध्ये आपण ह्या बाबतचे संपूर्ण धोरण मांडून त्यास अधिकृत स्वरूप प्राप्त करून देऊ जेणे करून बार्नस्टार चे महत्व पण अभाधित राहील आणि सदस्यांना नियमित प्रोत्साहन पण मिळेल. दिलेल्या गौरवाची यादी, वर्ग,जबाबदार्‍या आदी. गोष्टी सारे ठरून घेता येईल.

ह्या बाबतचे आपले मत आणि योजना मला कळवावे

आपल्या सहकार्याच्या अपेक्षित राहुल देशमुख ११:५५, १७ जुलै २०११ (UTC)

प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा[संपादन]

नमस्कार,

चावडी ध्येय आणि धोरणे वर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरु आहे. जेष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे भाषा निर्देश आपल्या लेख द्वारे सदर चावडीवर मांडले आहेत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चाविडी ध्येय आणि धोरणे वर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कमी अमुल्य योगदान करावे हि विनंती. राहुल देशमुख ०२:२९, १८ जुलै २०११ (UTC)

आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

अभिनंदन[संपादन]

१०००० पेक्षा जास्त संपादने केल्याबद्दल विशेष अभिनंदन.

नरसिकरजी, दहा हजार संपादनांचा टप्पा तुम्ही पहाता पहाता पार करून पुढे गेला आहात.पुढेही आपल्या आवडीचे लेखन असेच घडत राहो हि शुभेच्छा.

आपल्या सारखी अनेक मराठी माणसे मराठी विकिपीडियास जोडली जावोत हि ईश्वर चरणी प्रार्थना .माहितगार ०६:०१, १८ जुलै २०११ (UTC)

Dcoetzee[संपादन]

हा उत्पाती नसून बहुधा कॉमन्सवरील सदस्य अथवा बॉट असावा असे वाटते. कॉमन्सवर चित्र बदलले गेले किंवा वगळलेली चित्रे इतर विकिवर बदलण्याचे काम कॉमन्सवरील बरेच सदस्य करतात त्यांना सध्या चित्र सुयोग्य ठिकाणी आहे का याच्याशी कर्तव्य नसते. आहे ते चित्र अपडेट झालेतर अपडेट करणे एवढेच करतात.तरीपण शंका वाटते तेव्हा लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने उत्पाती यादीत ते नाव काही दिवस ठेवण्यास माझी काही हरकत नाही.माहितगार ०६:१७, १८ जुलै २०११ (UTC)

स्मरण पत्र[संपादन]

नमस्कार नार्सिकारजी,

काही दिवसान पूर्वी मी आपणास मराठी पीवीवर "नियमित प्रोत्साहन" ह्या बाबत लिहिले होते. त्यावरील आपल्या प्रतिक्रियेची मी प्रतीक्षा करीत आहे. आपण इतरही कामात व्यस्त असलच हे मी जाणतो, तरी सातत्याने पाठपुरावा करणे हे माझे काम आहे, म्हणून स्मरण पत्र देत आहोत. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत राहुल देशमुख ०४:२४, २० जुलै २०११ (UTC)

गैरसमज[संपादन]

नरसीकर,

गैरसमज कसला, उलट माझी चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल अधिक धन्यवाद आणि मला कळवल्याबद्दल त्रिवार धन्यवाद. :-)

अभय नातू १६:०८, २५ जुलै २०११ (UTC)

ता.क. बाकी गटारी बद्दल वेगळा लेख होईल इतका मालमसाला आपल्या सदस्यांकडून मिळेल याची मला खात्री आहे....:-D


रिठा/रिंगणी[संपादन]

रिठा, (इंग्रजीत सोप नट) याला संस्कृतमध्ये रिष्ट, अरिष्ट किंवा अरिष्टक म्हणतात. हे नक्की. रिठ्यासाठी मला खालील नावे सापडली.

  • Sapindus laurifolius * Sapindus emarginatus * Sapindus mukorossi * Sapindus trifoliatus. रिठा म्हणजेच रिंगणी असा उल्लेख फक्त एकाच पुस्तकात मिळाला. त्यामुळे रिंगणी म्हणजेच रिठा म्हणजे अरिष्टक असा मी निष्कर्ष काढला.

रिंगणी ही एक विषशामक वनस्पती आहे असा उल्लेख एका दुसर्‍या पुस्तकात मला नुकताच आढळला.. त्यामुळे रिंगणी म्हणजे अरिष्टक(रिठा) आहे की नाही याबद्दल शंका घेण्यास जागा आहे. रिठा विषशामक नसावा. आणि शिवाय, रिंगणीसाठी Solanum mauritianum हे नाव मला माझ्याकडच्या कुठल्याच पुस्तकात मिळाले नाही. त्यामुळे असे वाटते की रिठा, रिंगणी यांच्या संस्कृत आणि बोटॅनिकल नावांचा फेरविचार व्हावा.

किंवा रिठा हे नाव सोपनट नसलेल्या दुसर्‍या एखाद्या फळाचेही असावे. संस्कृतमध्ये मला रिठ्यासाठी रीठाकरंज असा शब्द मिळाला. त्यावरून असे वाटते हा रिठा वेगळा असावा. ...J १८:०६, २५ जुलै २०११ (UTC)

संस्कृत नावे[संपादन]

>>याचे संस्कृतातील नाव फेनिल आहे.<< संस्कृत ही एका फार मोठ्या देशात वापरली जाणारी प्राचीन भाषा असल्याने वनस्पतींना त्यांच्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळ्या आयुर्वेद-ग्रंथकर्त्यांनी आणि वनस्पतिशास्त्रज्ञांनी विविध नावे दिली. त्यामुळे एका वनस्पतीला अनेक नावे आणि अनेक वनस्पतींना एकच नाव असे फारदा होते. (रिठा किंवा रीठा)रिठ्यासाठी मला रिष्ट, रिष्टि, अरिष्ट, अरिष्टक, रीज्या, पतिफेन, फेनिल, रक्तबीज, रिठा, रीठाकरंज, कृष्णवर्तुलफल, कृष्णफल ही संस्कृत नावे मिळाली आहेत. यांतली पतिफेन, फेनिल, ही नावे उघड‍उघड विशेषणे आहेत. रीठाकरंज, म्हणजे करंज झाडाच्या जातीतले रीठा नावाचे झाड. हे विशेषण नसले, तरी हे रक्तबीज, कृष्णवर्तुलफल व कृष्णफल या नावांप्रमाणेच वर्णनात्मक नाव आहे. अरिष्टचे शब्दकोशातले अर्थ आहेत - बगळा, कावळा, क्रौञ्च, रिठा, कडुनिंब, लसूण, वगैरे.

>>रिंगणीचे संस्कृत नाव कंटकारी आहे. फारसीत यास बार्दजान जंगली म्हणतात.<< शब्दकोशात रिंगणी=रिंगिणी=कंटकारी(काटे असलेली)=राथोह(फारसी)(?)=मुद्गपर्णी(मुगाच्या रोपासारखी पाने असलेली; रानमूग)=कैवर्तिका(नागरमोथा?) वगैरे नावे सापडली. यापैकी कंटकारी=कंटक=कंटकम्‌=कंटकार=मराठीत सावरी, रिंगणी, वेहकळी, भुईरिंगणी, लघुरिंगणी, आणि काटेरिंगणी.. पुन्हा, कंट(क)=रिंगणी, धमासा, काकडी. अशी भरपूर नावे सापडतात.

>>पांढर्‍या रिंगणीस लक्ष्मणा असे म्हणतात.<<लक्ष्मणा म्हणजे श्वेतकंटकारी हा अर्थ एका कोशात सापडला.

यावरून असे वाटते की संस्कृत आणि बोटॅनिकल नावांमधून एकेकच नाव निवडायचे असेल, तर बरीच मेहनत करावी लागेल.

चुकीच्या स्पेलिंगांबद्दल: संस्कृत आणि बोटॅनिकल नावे अपरिचित असल्याने देशी छापील पुस्तकांत र्‍हस्वदीर्घाच्या आणि स्पेलिंगच्या चुका हमखास असतात. मी शक्यतो चुका दुरुस्त करून आणि स्पेलिंगची खात्री करून नावे लिहिली आहेत. त्यामुळे माझ्या लेखनात टंकणदोष नाहीत. पण जर मला मुळातच स्पेलिंग चुकीचे मिळाले असेल आणि त्याची खात्री करून घेता आली नसेल, तर झालेले लिखाण दोषयुक्त असू शकेल....J १०:१५, २६ जुलै २०११ (UTC)

फेक्री[संपादन]

नमस्कार नार्सिकारजी,

मला असे वाटते कि जरी जवळील लोकवस्ती फेक्री असली तरी आपण त्यास दीपनगर (भुसावळ) असे म्हणावे. कारण प्रश्न गाव म्हणण्याचा नाही, खरेतर मी चंद्रपूर वरून " वीजकेंद्रे असलेली गावे" साचा द्वारे दीपनगरला आलो होतो. तेव्हा प्रश्न ह्या संचातील बदलाचा पण आहे. फेक्रीला कोणी ओळखत नाही (हि अतिशय छोटी कोळी लोकाची वस्ती आहे जे तापी नदीमध्ये मासेमारी करून उपजीविका करतात) आणि दीपनगर गाव नाही त्यामुळे दीपनगर (भुसावळ) आसे लिहावे का ? पहा आपणास जे योग्य वाटेल तसे.

वर्ग:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे ह्या वर्गा मध्येपण दीपनगर आणि भुसावळ अशा दोन नोंदी आढळतात. त्या मध्येपण शुद्धी करण झालेतर अधिक बरे होईल असे वाटते. राहुल देशमुख ०९:५५, २७ जुलै २०११ (UTC)

लग्न[संपादन]

लग्न म्हणजे पृथ्वी - त्यालाच लग्न असे म्हंटले जाते. ज्योतिषा पुरते राहू केतूही ग्रहच असतात. आधुनिक खगोलशास्त्र संकल्पनांनी याकडे पाहू नये - अपेक्षाभंग होतो. :) असो असे अजून अनेक ग्रह आहेत. जसे मांदी आणि गुलिक वगैरे. यांच्ह्या गोचरीतील भ्रमणाने अनेक फले बदलतात. निनाद १२:५५, २९ जुलै २०११ (UTC)