रॉन पॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रॉन पॉल

रॉनल्ड अर्नेस्ट पॉल (इंग्लिश: Ronald Ernest Paul) ऊर्फ रॉन पॉल (२० ऑगस्ट, इ.स. १९३५ - हयात) हे अमेरिकन राजकारणी, डॉक्टर व लेखक आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असून इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ या काळात त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. इ.स. २०१२ सालातील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करीत् आहेत. नोव्हेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे, व तळागाळातील तसेच मध्यमवर्गातील जनतेचा त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे.

पॉल यांनी इ.स. १९८८ व इ.स. २००८ सालांतल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन्ही वेळेस ते असफल ठरले.

अमेरिकेतील तळागाळातील अनेक लोकशाहीवादी चळवळींवर त्यांचा प्रभाव आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.