मराठी व्याकरण
भाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा] |
---|
तात्विकभाषाशास्त्र |
वर्णनात्मक भाषाशास्त्र |
उपयोजित भाषाशास्त्र |
संबधित लेख |
दालन |
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्याससुकर सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
मराठी भाषा ही भारतीय आर्य भाषागटातील भाषा आहे. मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नियमांची भर पडली.
इतिहास मराठीचा
[संपादन]मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो आर्यन भाषांशी साधर्म्य दाखवते. हिंदी, गुजराती, पंजाबी या त्या भाषा आहेत. आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटासाठी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केले.
मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले असते. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग या तीन प्रकारांमध्ये असते. संख्या या एकवचनात वा अनेकवचनांत दर्शविल्या जातात, तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, साधन, स्थान आणि संबोधन यांसाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे, ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ आदि काळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी सुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी सुसंगत होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना होते.[१][२]
संस्कृतचा प्रभाव
[संपादन]मराठी भाषाशास्त्रावर संस्कृत भाषेतील तत्सम शब्दांचा प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेत तत्सम शब्दाच्या वाप्रासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम मराठी भाषेत हे शब्द वापरताना लागू होतात. संस्कृत भाषेतील समृद्ध शब्दसंपदा या शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेली अहे. आधुनिक तांत्रिक परिभाषेसाठीसुद्धा हे शब्द लागू पडतात.
मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्य इंडो-युरोपियन भाषांच्या तुलनेत मराठीमध्ये फारसी, द्राविडी, राजस्थानी आणि गुजराथी भाषांतील शब्दांचा अधिक समावेश होतो..
प्रसिद्ध मराठी व्याकरणकार
[संपादन]- मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला.
नाम
[संपादन]नाम – सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचक नाम
सामान्य नाम
[संपादन]ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम म्हणतात. उदा: मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.
सामान्य नामाचे २ प्रकार :
- पदार्थ वाचक: जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात. उदा: दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी
- समूह वाचक: ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात. उदा: मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.
विशेष नाम
[संपादन]ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात. उदा: शिवाजी, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी. विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा. सागर.
भाववाचक नाम/धर्म वाचक नाम
[संपादन]ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात. उदा: गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी. भाववाचक नामाचे तीन प्रकार आहेत.
- गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई/चातुर्य
- स्थितिदर्शक – गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य
- कृतिदर्शक – चोरी, चळवळ, क्रांती
- प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे
- य: सुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, शूर – शौर्य, नवीन – नावीन्य, चतुर – चातुर्य
- त्व: शत्रू – शत्रुत्व, मित्र – मित्रत्व, प्रौढ – प्रौढत्व, नेता – नेतृत्व
- पण / पणा: देव – देवपण, बाळ – बालपण, शहाणा – शहाणपण
- ई: श्रीमंत – श्रीमंती, गरीब – गरिबी, गोड – गोडी
- ता: नम्र – नम्रता, वीर – वीरता, बंधू – बंधुता
- की: पाटील – पाटीलकी, माल – मालकी, गाव – गावकी
- गिरी: गुलाम – गुलामगिरी, दादा – दादागिरी, फसवा – फसवेगिरी
- वा: गोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा
- आई: नवल – नवलाई, चपळ – चपळाई, चतुर – चतुराई
- वी: थोर – थोरवी
A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :
आमचा पोपट कालच गावाला गेला.
आत्ताच तो नगरहून आला.
आमची बेबी नववीत आहे.
B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :
आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.
आईचे सोळा गुरुवारचा व्रत आहे.
नाम म्हणजे- एखाद्या गोष्टीचे नाव :-
C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :
शांती माझ्या भावाची मुलगी आहे.
माधुरी सामना जिंकली.
विश्वास परीक्षेत पास झाला.
D. धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात
त्याचे वागणे चांगले नाही.
ते पाहून मला रडू आले.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
तीन लिंगे
[संपादन]- masculine– पुल्लिंग (')
- feminine– स्त्रीलिंग (')
- neuter– नपुंसकलिंग (')
वाक्यांचे प्रकार
[संपादन]मराठी व्याकरणात वाक्याच्या प्रकारांची तीन प्रकारे विभागणी करता येते –
- अर्थावरून पडणारे प्रकार वाक्याचे प्रकार
- विधानाच्या संख्येवरून पडणारे वाक्याचे प्रकार
- क्रियापदाच्या रुपावरून पडणारे वाक्याचे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार
[संपादन]वाक्य नेमके कोणता अर्थ व्यक्त करते यावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थक वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- होकारार्थी वाक्य
- नकारार्थी वाक्य
क्रियापदाच्या रुपावरून पडणारे वाक्याचे प्रकार
[संपादन]वाक्यात वापरलेले क्रियापद कसे आहे यावरून सुद्धा वाक्याचे प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहे.
- स्वार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- विध्यर्थी वाक्य
- संकेतार्थी वाक्य
विधानाच्या संख्येवरून पडणारे वाक्याचे प्रकार
[संपादन]वाक्यात असणारे विधाने किती आणि कोणत्या प्रकारचे आहे याचा विचार करून वाक्याचे खालील प्रकार सुद्धा पडतात
- केवल वाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
इंग्रजी मराठी संज्ञा
[संपादन]इंग्रजी | मराठी | |
Computer | संगणक | SangaNak |
Programming | आज्ञावली | Aadnyaavalee |
My name is ... | माझे नाव ... आहे | Maze Nao... Aahe |
What is the time? | किती वाजले? | kiti vajale |
I'm thirsty | मला तहान लागली आहे. | mala tahan lagli ahe |
Can you speak English? | तुम्हाला इंग्रजी येते का? | tumhala engraji yete ka? |
संदर्भ साहित्य
[संपादन]- सुगम मराठी व्याकरण व लेखन - मो.रा. वाळंबे
- परिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
- अत्यावश्यक व्याकरण - विजय ल. वर्धे
- मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर (यूनिक प्रकाशन)
- मराठी शब्दरत्न - गणेश कऱ्हाडकर (नितीन प्रकाशन)
- संपूर्ण मराठी व्याकरण – बालाजी जगताप
- मराठी लेखन-कोश - अरुण फडके
- पर्याय शब्दकोश - वि . शं. ठकार
- मराठी शब्दलेखनकोश - प्रा. यास्मिन शेख
हे सुद्धा पाहा
[संपादन]- शुद्धलेखनाचे नियम
- विरामचिन्हे
- क्रियापद
- अव्यय
- युनिकोड
- मराठी व्याकरण विषयक लेख
- मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची
संदर्भ
[संपादन]https://marathibhasha.maharashtra.gov.in/Site/FORM/dictionary.aspx