Jump to content

सदस्य चर्चा:ज/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिद्धान्त की सिद्धांत?

[संपादन]

प्रिय J जी, मराठीत "सिद्धांत" लिहिताना "न्त" जोडाक्षरापेक्षा अनुस्वार अधिक प्रमाणात वापरला जातो. मला वाटते की हिंदी orthography नुसार मराठी spelling लिहू नये. कृपया मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त ह्या लेखाच्या शीर्षकात आणि मजकुरात केलेला बदल उलटवावा. सिद्धांत सीमा सुरेश १६:२२, १६ जानेवारी २०१५ (IST)[reply]

अच्छा, हे माहित नव्हतं. पण तरी मला असं वाटते की खरंतर अनुस्वार हा जोडाक्षरांमधल्या nasal consonant ला replacement म्हणून वापरलं जातो, आणि ह्या दृष्टीने "अंत" आणि "अन्त" नेहमीच interchangeably वापरले गेले आहेत आणि वापरले जाऊ शकतात. म्हणून "सिद्धांत" आणि "सिद्धान्त" हे पण interchangeably वापरले जाऊ शकतात. सिद्धांत सीमा सुरेश १४:४८, १७ जानेवारी २०१५ (IST)[reply]

शुद्धलेखन दुरुस्ती साहाय्य विनंती

[संपादन]

या मूळ इंग्रजी दस्तएवजाचा [येथे मराठी अनूवाद केला आहे. हा मराठी मजकूर शेजारील चित्राप्रमाणे दिसेल.

या दस्तएवजाचा केलेला अनुवाद (नवीन जनरेशनच्या दृष्टीने थोडी इंग्रजी भेसळ ठेऊन) आणि शुद्धलेखन तपासण्यात आपले साहाय्य हवे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४१, ७ मार्च २०१५ (IST)[reply]

Your account will be renamed

[संपादन]

०९:१८, १८ मार्च २०१५ (IST)

J चे ज झाल्याबद्दल अभिनंदन! :-) - अभिजीत साठे (चर्चा) १०:२९, २४ मार्च २०१५ (IST)[reply]
माझे हे नवीन नाव आता हिंदी विकिपीडियावरही चालते. तेथे खाते न उघडता.
तुमचे नवीन नाव आता कोणत्याही विकिमीडिया प्रकल्पावर ज या नावाने चालेल.
अभय नातू (चर्चा) २२:०७, २५ मार्च २०१५ (IST)[reply]

अनुवाद तपासणी आणि सुधारणात साहाय्य हवे.

[संपादन]

नमस्कार,

प्रताधिकार विषयक एका शासकीय दस्तएवजाचा साचा:Form I/अनुवाद (सारणी दृश्य) येथे मराठी अनुवाद उपलब्ध केला आहे, मराठी अनुवाद तपासण्यात आणि सुधारण्यात साहाय्य हवे आहे. मूळ इंग्रजी दस्तएवजात प्रथम दर्शनी काही त्रुटी असण्याची शक्यता वाटते, तरीही शासकिय कायदेविषयक दस्त असल्यामुळे बदलता येणार नाही पण मूळ इंग्रजी दस्तातील त्रुटी चर्चा पानावर नमुद करून ठेवल्यास तळ टिपांमध्ये नंतर जोडण्यास उपयूक्त ठरू शकेल.

अनुवाद तपासून मिळाल्या नंतर विकिसाठी अनुकूल (adapt) केलेला दस्त नमूना बनवेन आणि आपणास पुन्हा साहाय्यासाठी कळवेन धन्यवाद.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:५०, २२ एप्रिल २०१५ (IST)[reply]

Translating the interface in your language, we need your help

[संपादन]
Hello ज, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार ज/जुनी चर्चा ३,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

व्यक्ती लेखांची सुरुवात

[संपादन]

नमस्कार,

आपण अनेक व्यक्तीविषयक लेख लिहिल्याचे पाहिले. त्यातील पहिल्या वाक्याची रचना अशी असावी --

अकबर इलाहाबादी (जन्म : बारा -अलाहाबाद जिल्हा, १६ नोव्हेंबर, इ.स. १८४६; मृत्यू : अलाहाबाद, इ.स. १९२१) हे एक उर्दू कवी होते.

च्या ऐवजी

अकबर इलाहाबादी (१६ नोव्हेंबर, इ.स. १८४६,:बारा, अलाहाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत; इ.स. १९२१:अलाहाबाद) हे एक उर्दू कवी होते.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ०४:५९, ४ मे २०१५ (IST)[reply]

नावानंतर लगेचच जन्मतारीख, जन्मस्थळ, मृत्यूतारीख, मृत्युस्थळ घातल्यास या तारखा कारकीर्द वाटण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, प्रत्येक व्यक्तीच्या लेखात माहितीचौकट साचा अपेक्षित आहे. या साच्यात कारकीर्दीचा काळ वेगळ्याने उद्धृत केलेला असतोच तरी गल्लत होण्याची शक्यता नाही.
अभय नातू (चर्चा) १८:५०, ४ मे २०१५ (IST)[reply]
व्यक्ती चरीत्र लेखन विषयक आपल्या संस्कृतील संमस्या ॲकनॉलेज न करता पुन्हा एकदा संदिग्धतेचीच बाजू पुढे केली जातेय यात आश्चर्य नाही, जेंनी पण याच संस्कृतीस पुर्वी साथ दिली आहे त्यामुळे केवळ नोंद करून आम्ही तात्पुरता पास देत आहोत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१४, ४ मे २०१५ (IST)[reply]
ज, नमस्कार,
जन्मतारीख व मृत्यूची तारीख अनेकदा ddmmyy या साच्यात उपलब्ध नसते. कधीकधी दोघांपैकी एकच माहीत असते. जन्मस्थळ-मृत्यूस्थळतर क्वचितच ठाऊक असते. माहिती चौकट साचा, त्यात शुद्धलेखनाच्या आणि भाषेच्या चुका असल्याने भरावासा वाटत नाही. शिवाय या साच्यांचा नमुना विकीवर सहज सापडत नाही.
जितकी तारीख उपलब्ध असेल तितकीच घालता येते आणि चालते. हे साचा तसेच वाक्य दोन्हीला लागू होते. साचेबद्ध (uniform, methodical, structured) माहिती असल्यास ती वाचण्यास सोपी/सरळ जाते हे आपणास सांगणे नलगे. माहितीचौकट साचे हे काही काळापूर्वी तयार केले गेलेले आहेत. ते तयार करणाऱ्यांकडून चूका नक्कीच झालेल्या आहेत. साच्यात जर शुद्धलेखनाच्या आणि भाषेच्या चुका असतील तर त्या सुधारता येतात. आपण त्या दाखवून दिल्यात तर त्या सांगकाम्याकरवे सहजपणे सगळीकडे बदलता येतात.
साच्यांचे नमूने अनेक लेखांत आहेत. सगळ्यात सोपे म्हणजे साचा:माहितीचौकट व्यक्ती येथून कॉपी-पेस्ट करून हवी ती माहिती घातली की झाले. हा साचा बेसिक व्यक्ती साठीचा आहे. पंजाबराव देशमुख, बिस्मिल्ला खान, इ. लेखांत हे दिसेल.
याशिवाय साचा:माहितीचौकट अभिनेता (श्रीराम बाळकृष्ण लागू), साचा:माहितीचौकट पदाधिकारी, इ.साठीचे नमूनेही अनेक आहेत. अधिकाधिक लेखांत असावे ही आशा आहे पण त्यासाठी लेख न तयार होऊ देणे हा हट्टाग्रह आपण ठेवलेला नाही. यांपैकी माहितीचौकट पदाधिकारी हा अत्युपयोगी साचा आहे कारण यावरून इतर अनेक प्रकारच्या व्यक्तींची माहिती भरता येते.
नावानंतर जन्म आणि मृत्यू हे शब्द न लिहिण्यात कोणता परमार्थ साधतो हे समजले नाही
तसे म्हणले तर जन्म आणि मृत्यू हे शब्द लिहिण्यात कोणता स्वार्थ/परमार्थ आहे? गंमत केली...हलकेच घ्या. आपण हा संकेत (जन्म, मृत्यू हे शब्द न लिहिण्याचा) बव्हंश लेखांतून पाळलेला आहे. तो पुढे चालवावा असे वाटते. तसेच जर शब्द न लिहिता अर्थ कळत असेल तर कशाला लिहावा असाही एक विचार येतो.
अभय नातू (चर्चा) २३:१८, ४ मे २०१५ (IST)[reply]

हलकेच आठवण

[संपादन]

त्यातील पहिल्या वाक्याची रचना अशी असावी --

अकबर इलाहाबादी (जन्म : बारा -अलाहाबाद जिल्हा, १६ नोव्हेंबर, इ.स. १८४६; मृत्यू : अलाहाबाद, इ.स. १९२१) हे एक उर्दू कवी होते.

च्या ऐवजी

अकबर इलाहाबादी (१६ नोव्हेंबर, इ.स. १८४६,:बारा, अलाहाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - इ.स. १९२१:अलाहाबाद) हे एक उर्दू कवी होते.

अभय नातू (चर्चा) ००:३४, १६ मे २०१५ (IST)[reply]

हे समजायला अवघड आहे असे वाटत नाही?
माझ्या मते नाही वाटत. उलट यात अधिक enhanced information दिली जाते.
जेव्हा माहिती बांधेसूद (structured) असते तेव्हा प्रत्येक अक्षर/शब्दास वाढीव अर्थ असतो. जसा येथे पहिल्या तारखेचा (असल्यास) अर्थ जन्म, त्यामागील स्थानाचा (असल्यास) अर्थ जन्मगाव होतो. जर यातील काही उपलब्ध नसेल तर ?? लिहिण्याचा प्रघात आपण ठेवला आहे, ज्याने ही माहिती उपलब्ध नाही, असे दोन अक्षरांत ध्वनित होते. मृत्युतारीख, स्थान मोकळे सोडलेले असल्यास व्यक्ती अद्याप हयात असल्याचे लगेचच कळते. ही माहिती वाचकाला देण्यासाठी किंवा कळण्यासाठी अधिक शब्द वापरण्याची गरज रहात नाही.
अभय नातू (चर्चा) ००:४४, १६ मे २०१५ (IST)[reply]

लेखनातील प्रताधिकार समस्या

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:


धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

ना. रा. बामणगांवकर

[संपादन]

विकिपीडियावर व्यक्ती लेखाचे पूर्ण नाव अपेक्षित आहे. त्यामुळे नारायण रामलिंग बामणगांवकर असे असायला पाहिजे.

पुष्कर पांडे (चर्चा) १०:४०, २० मे २०१५ (IST)[reply]

मी मागेही या बाबतीत अभय नातू यांच्याशी बोललो आहे. व त्यांचे मूळ उच्चाराचा लेख आणि प्रचलित उच्चार (आणि इतर उच्चार) यांकडून पुनर्निर्देशन असल्यास शोधण्यात कोणताही फरक पडत नाही हे म्हणणे मला योग्य वाटते.

पुष्कर पांडे (चर्चा) ११:०१, २० मे २०१५ (IST)[reply]

लेख हलवणे

[संपादन]

ज, लेख हलवण्यापूर्वी योग्य नाव एकदा तपासून बघावे. मेरठचे स्पेलिंग Meerut असे असले तरीही देवनागरीमध्ये मेरठ असेच लिहिले जाते. हे पहा. काल देखील तुम्ही अमेठीचे नाव अकारण अमेथी केले होते जे देखील पूर्णपणे चुकीचे आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १३:२३, २१ मे २०१५ (IST)[reply]

नामकरण संकेतांनुसार स्थानिक भाषेमध्ये नाव जसे लिहिले/उच्चारले जाते तसेच मराठी विकिपीडियावर असावे. यू.पी.ची राज्यभाषा हिंदी असल्यामुळे हिंदीमध्ये जसे नाव आहे तसेच येथे असायला हरकत नाही. - अभिजीत साठे (चर्चा) १४:४६, २१ मे २०१५ (IST)[reply]
तुमचे म्हणणे खरे असले तरी विशेषत: हिंदीमधील लेख मराठीत आणताना हिंदी शीर्षक वापरायला काय हरकत आहे? शिवाय मीरत ह्या नावाला काय आधार आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १५:१४, २१ मे २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार ज/जुनी चर्चा ३,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

एक संदर्भ

[संपादन]

ज्ञानकोशीय चिकित्सकतेसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४०, २३ जून २०१५ (IST)[reply]

संपर्क

[संपादन]

ज,

तुम्ही पुण्यात असाल तर तसेच तुम्हाल रुची असल्यास, शक्य असल्यास व वेळ असल्यास मला तुम्हाला येउन भेटण्यास आवडेल. कृपया anatu-at-yahoo.com येथे विपत्र पाठवून कळवावे.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) १७:५३, ४ जुलै २०१५ (IST)[reply]

मराठी विकिपीडियावर संपादन कसे कराल- व्हिडीओ

[संपादन]

नमस्कार, मला आनंद होतो कि आपण सुलभा कुलकर्णी या लेखाचे संपादन करून लेख सुधारण्यात मदत केली आहे. सध्या मी मराठी विकिपीडियावर कसे संपादन करायचे याचे व्हिडीओ बनवत आहे. त्यासाठी Mrwiki1234 हे खाते वापरत आहे. आणि सुलभा कुलकर्णी या लेखाचा उपयोग करत आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत काही जे बदल झाले आहेत ते मी थोड्या वेळासाठी काढत आहे. कृपया एक आठवडा या लेखावर फक्त मला संपादन कार्य करण्यास सहमती मिळावी अशी विनंती. केलेले बदल नंतर पुन्हा मी पूर्ववत करीन.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १२:५५, ११ जुलै २०१५ (IST)[reply]

धन्यवाद

[संपादन]

मराठी विकिपीडीयाला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी एक मराठी माणुस या नात्याने आपला आभारी आहे. जय महाराष्ट्र! --Human3015 (चर्चा) १२:२४, २२ जुलै २०१५ (IST)[reply]

नमस्कार ज,

राज्य मराठी विकास परिषदचे वेबसाइट आणि [जस्http://www.rasik.com/books/MarathiiBooksFromOUDL.htm उस्मानिया विद्यापीठाच्या वेबसाइटवर] जुने दुर्मीळ मराठी ग्रंथ दिसतात आपले २ प्रकारे साहाय्य (आपल्या सवडी नुसार अधून मधून) होऊ शकल्यास हवे आहे.



१) त्यातील लेखकांच्या यादीतून १९५४ पुर्वी मृत्यू झाले असल्याची माहित झालेल्या लेखकांची यादी वेगळी काढणे आणि विकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) येथे नोंदवणे.

२) अशा (१९५४ पुर्वी निर्वतलेल्या) लेखकांच्या पुस्तकांची आंतरजालावर उपलब्ध PDF जसे कि राज्य मराठी विकास परिषदचे वेबसाइट आणि उस्मानिया विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध पुस्तकांची नावे नोंदवणे.

उद्देश मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोड टंक लेखनासाठी आयात करणे.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:४६, २८ जुलै २०१५ (IST)[reply]

जुन्या चर्चेतील लिंक कळवण्याची विनंती

[संपादन]

नमस्कार,

मागे कधीतरी कुठल्याशा चर्चेत तुम्ही साधारणत: इ.स. १९००च्या आसपासच्या १ली (?) छापील पाठ्यपुस्तकाची लिंक दिली होती. ती चर्चा नेमकी कोठे आहे कळवावे.

किंवा दुवा मला नव्याने कळवावा ही विनंती.

-- संतोष दहिवळ (चर्चा) १२:५६, २९ जुलै २०१५ (IST) संतोष दहिवळ (चर्चा) १२:५६, २९ जुलै २०१५ (IST)[reply]

लिंक आणि चर्चा सापडली. लिंक तुम्हीच दिली होती. पाठ्यपुस्तक इ.स. १८७० सालचे आहे. चर्चेचा आणि पाठ्यपुस्तकाचा दुवा नंतर कळवतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:१२, २९ जुलै २०१५ (IST)[reply]
इ.स. १८७० सालचे इयत्ता १ लीचे मराठी पाठ्यपुस्तक -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:१३, १८ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

निमाडची काठी माता

[संपादन]

मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी माता/ काठी देवीचे पुजन होते आणि काही विशेष नृत्यही असते असे आंतरजालावर वाचण्यात आले पण त्या काठी देवी किंवा काठी मातेचे छायाचित्र आंतरजालावर दिसत नाही. या संबंधाने आपल्याकडे काही माहिती आणि जमल्यास छायाचित्रे आहेत का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५५, ३ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

रुद्र सूक्त, रुद्र नमक , रुद्र चमक तपासून मिळण्यासाठी विनंती

[संपादन]

नमस्कार,

अभिषेक लेखातून रुद्र विषयक दुवे देतायावेत आणि काळाच्या ओघात अनुवादीत व्हावेत म्हणून s:mr:रुद्र सूक्त, s:mr:रुद्र नमक, s:mr:रुद्र चमक हे तीन संस्कृत दस्तएवज मराठी विकिस्रोत प्रकल्पात आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ते तीनही दस्तएवजांचे पाठ पुरेसे, बरोबर अथवा/आणि प्रमाण आहेत का हे आपल्याकडून तपासून मिळावेत अशी विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२३, ६ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

Help for translate

[संपादन]

Hello and sorry for writing in English. Can you help me translate a small article (2 paragraphs) from English to your language? Xaris333 (चर्चा) ०४:५६, ९ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

Hello and thanks for your offer to help. I want you to translate the introductions paragraphs from the article en:Nea Salamis Famagusta FC and create the article in your wiki. Xaris333 (चर्चा) १९:५५, ९ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

अनंततनय

[संपादन]

ज,

आपण दोघे एकाच वेळी अनंततनय लेखात बदल करीत असताना माझे बदल तुम्ही उलटवलेले दिसले. आपले बदल टिकविण्यासाठी असे करण्यास हरकत नाही परंतु उलटवलेले बदल कृपया पुन्हा लेखात अंतर्भूत करावेत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:२६, १२ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

तज्ज्ञ की तज्ञ ?

[संपादन]

नमस्कार ,

मराठी मध्ये नेमका कोणता शब्द योग्य आहे याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे.

तज्ज्ञ की तज्ञ ?

धन्यवाद -S.pratik2005 (चर्चा) १९:०४, १३ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]


अर्थात्‌ तज्ज्ञ ! मराठीतच नव्हे तर संस्कृत आणि सर्व भारतीय भाषांमध्ये तज्ज्ञ असे लिहिणेच योग्य आहे. (हिंदीत तज्ञ लिहितात, का ते माहीत नाही. हिंदीत महत्त्व (मह्त्‍त्वव)च्या ऐवजी महत्व लिहितात, का ते माहीत नाही).

तत्‌+ज्ञ=तज्‌+ज्ञ=तज्ज्ञ. गणित+तज्ज्ञ=गणिततज्ज्ञ, परंतु अ+ज्ञ=अज्ञ, सु+ज्ञ= सुज्ञ, गणित+ज्ञ=गणितज्ञ, वगैरे.

त्याच कारणाने महत्‌+त्व=महत्‍त्व=महत्त्व, (महत्व नाही !), सत्‍त्व, सत्व नाही ! मात्र ममत्व, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व असल्या शब्दांत त्‍त्व हे अक्षर येत नाही. .... (चर्चा) २२:३७, १३ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

एच इंडेक्स विषयी

[संपादन]

स्वताचा एच इंडेक्स कसा मोजावा याऐवजी संशोधकाचा एच इंडेक्स कसा मोजावा अशी शब्दरचना योग्य राहील काय? धन्यवाद

स्नेहल शेकटकर ००:११, १६ ऑगस्ट २०१५ (IST)

अंजनी नरवणे

[संपादन]

नमस्कार ज,

आपण अंजनी नरवणे हे लेख तयार केलेला पाहिला. त्यातील मजकूर पाहून वाटले की आपला व त्यांचा घनिष्ट परिचय असावा. माझा व त्यांचाही पूर्वी परिचय होता. आपण एकमेकांस कधी भेटलो तर नाही? आपणास सवड झाल्यावर कृपया asnatu अॅट जीमेल.कॉम या पत्त्यावर संपर्क साधाल का?

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) १९:५४, २२ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

दोन व

[संपादन]

आपल्या माहितीपूर्ण व समजण्यास सोप्या उत्तराबद्दल धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) २२:०२, २४ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

Namaskar, I have created article en:Marathwada Liberation Day on English Wikipedia which was featured on main page of English Wikipedia in "did you know" section recently 2 days ago. Where I can request to translate this article on Marathi Wikipedia? Marathi Wikipedia doesn't have article on this important day, can somebody translate it in Marathi here? (I have some problem with Marathi typing). --Human3015 (चर्चा) ०३:०७, २९ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

मोल्सवर्थ/कँडी

[संपादन]

नमस्कार ज,

मोल्सवर्थ कोशाचे नाव पूर्वीच्या चर्चांमध्ये आल्यामुळे ते येथे उल्लेखले गेले.

असो. तुम्ही दिलेली माहिती नक्कीच रंजक आहे. कँडी यांच्यासाठी सुतक पाळले गेले हे वाचून आश्चर्य वाटले.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:०७, ६ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

मेजर थॉमस कँडी

[संपादन]

ज,

आपण दिलेल्या माहितीबद्दल पुनःपुन्हा धन्यवाद. त्यानंतर मी इतरत्र कँडींबद्दल शोध घेतला. त्यावरुन कळून आले की कँडी बंधूंची गणना मराठी भाषेच्या इतिहासातील थोर मंडळींमध्ये होण्यास हरकत नाही.

अशा व्यक्तीबद्दल मराठी विकिपीडियावर लेख नाही हे काही बरोबर नाही. आता ही कमतरता भरून निघाली आहे...कृपया थॉमस कँडी या लेखात भर घालावी. शक्य झाल्यास याला मुखपृष्ठ सदर करायची इच्छा आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:४४, ७ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

साहाय्य हवे

[संपादन]

कृपया विकिपीडिया:चावडी/प्रगती #७६ येथे मी एक भाषांतर केले आहे. त्यावर आपला निष्णात हात फिरवुन ते तपासावे अशी आदरपूर्वक व नम्रतापूर्वक विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा) १६:२७, १८ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

_______________ संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी २८३ पैकी केवळ तीनच सदस्यांचा सक्रिय पाठिंबा मिळाला याचा अर्थ -

१. उरलेल्यांपैकी बहुतेकांचे परवाने अद्यावत आहेत.
२. ते सदस्य आता सक्रिय नाहीत. जे सक्रिय आहेत त्यांना परवाने अद्यावत करण्यात फुकट वेळ घालवण्यापेक्षा त्यांना दुसरे काही विधायक काम करायचे आहे..
३. परवाने अद्यावत कसे करायचे हे त्यांना माहीत नाही.
४. परवानेच नसल्याने ते अद्यावत करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.
५. विकिपीडियात जे लिहायचे ते कोठून तरी उतरवून घेतलेलेच असते, नवीन ज्ञान किंवा माहिती आपल्या मनाने निर्माण करता येत नाही, यास्तव, परवाने अद्यावत करणे त्यांना पटलेले नाही.
६. विकिपीडियात लिहिल्याने कोणताही आर्थिक लाभ होत नसल्याने पूर्ण विकिपीडियाच प्रताधिकारमुक्त आहे., वगैरे. .... (चर्चा) २२:५५, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

'ज'
सहमत आहे 'रामाची सीता कोण ?' ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही (रामायण कथा प्रदिर्घतेने सांगून झालेली आहे), जसे की आपण एवढे रामाची सीता कोण ह्या बद्दल एवढे प्रश्न उपस्थीत केलेत त्यापेक्षा स्वत: चढवलेल्या चित्र:5021073866 858c411b38.jpg या संचिकेस परवाना जोडला तर अधिक उचित होणार नाही का न पेक्षा विकिसंकेतांची पुर्तता न करणारे सचित्र (रामायण) काळाच्या ओघात वगळण्या शिवाय पर्याय नाही.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:०७, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

मी यापूर्वीच लिहिले होते की ते चित्र मुळातच परवानामुक्त होते. ... (चर्चा) २३:१०, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


ज साहेब,

केवळ खालील परवाना चित्र चढवणाऱ्या सदस्याने चित्र संचिका पानावर नकल डकव करुन विकिसंकेताची पुर्ती होते. हे असे का करून हवे आहे त्या सहीत सर्व कारण मिमांसा मागच्या संदेशातून देऊन झालेली आहे साइट नोटीसवरून दिली जाते आहे, पण समजूनच घ्यावयाचे नाही म्हटल्यावर काही मार्ग शिल्लक राहतो का ? एक तर तुमची सुचना चित्र संचिका पानावर हवी येथे तेथे लिहून होत नाही, प्रत्येकाने कोणत्या पानावर लिहिले आहे ते कोठे शोधणार ? परवाना मशिन रिडेबल म्हणजे पुन्हा खालील फॉर्मॅट मध्ये हवा. केवळ तुमचे तुम्ही नकल डकव करावयाचे आहे ना. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३०, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


* हे संचिका पानावर नकल डकवायचे आहे.
== {{int:filedesc}} ==
{{Information
|Description= मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत [[साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)|Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)]] अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे. 

|Source={{own}} येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{own}} नमुद करा
|Date=तारीख टाका
|Author= कृतीच्या निर्मात्याचे नाव, स्वत:ची कृती असेल तर [[सदस्य:सदस्य नाव|सदस्य सदस्य नाव]]
|Permission= इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्यागाच्या उद्घोषणेचा OTRS(विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा.
|other_versions=
}}

+

    {{स्वतः}}{{Cc-by-sa-4.0}} 




संचिकेतले चित्र कोणत्या झाडाचे आहे, हे मला आठवत नाही. झाडाचे नाव समजल्याशिवाय छायाचित्रकाराचे नाव शोधणे शक्य नाही. मला एवढेच आठवते आहे की अनेक वर्षांपूर्वी, एका लेखकाने ’ते’ नाव आहे असे लिहून वेगळ्याच झाडाचे छायाचित्र विकिपानावर लावले होते. मी त्या झाडाचे चित्र पाहिले आणि हे ’ते’ झाड नाही हे माझ्या लक्षात आले. मी फक्त चित्र बदलून योग्य चित्र लावले. असे करणे चुकीचे असेल तर आपल्यापैकी कुणीही माझे चित्र काढून तेथे चुकीचे चित्र लावावे. .... (चर्चा) ००:१९, २० नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


ज सध्या छायाचित्र शमी या लेखात वापरात आहे. लेख इतिहासातून हवा तो शोध तुम्हाला घेता येईल पण आपल्या उपरोक्त प्रतिसादावरून छायाचित्र आपण स्वत: काढलेले नसावे. ते आपण मित्र परिवारातून विनंती करून चढवलेले असेल तर त्यांच्याकडून परवाना नकल डकवून घ्यावा. न आठवणारे आंतरजालावरून घेतले असेल तर 'स्रोत मिळत नाही तर बोळवण होऊ दे' म्हणून पाणि सोडण्या शिवाय फारसा उपाय शिल्लक असणार नाही.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१३, २० नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

शमी नावाचे दोन स्वतंत्र वृक्ष असावेत. मी दिलेले शमी वृक्षाचे चित्र अनेक पुस्तकांत आहे. भारतवर्ष नावाच्या वर्तमानपत्रात ते फक्त काही महिन्यांपूर्वी म्हणजे, १८ मार्च २०१५ रोजी छापले आहे. ते चित्र त्यांनी कोठून मिळवले ते सांगितलेले नाही. भारतीय वनस्पती नावाच्या संकेतस्थळावर ते असायलाच पाहिजे, पण सापडले नाही. त्यामुळे त्या चित्राचा छायाचित्रकार कोण आहे हे सांगणे कठीण आहे. पण जेव्हा मी जिथून कुठून ते उचलले तेथे हे चित्र वापरायची मुक्त परवानगी दिलेली होती.

जास्त वाद नको म्हणून ते चित्र मी शमी पानावरून काढून टाकत आहे..... (चर्चा) १०:५३, २० नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

हंबीरराव संपादन

[संपादन]

इतिहास हा पू राव्याने बनतो. दंत कथांनी नव्हे. म्हणून अनावश्यक ममाहीती ज्याला संदर्भ नाही याअशीं काढली आहे.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले