Jump to content

थॉमस कॅंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थॉमस कँडी या पानावरून पुनर्निर्देशित)

मेजर थॉमस कॅंडी (१३ डिसेंबर, इ.स. १८०४:इंग्लंड - २६ फेब्रुवारी, इ.स. १८७७:महाबळेश्वर, महाराष्ट्र, भारत) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्त्वाचे योगदान दिले.[]

जीवन

[संपादन]

कॅंडी व त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माग्डालेन कॉलेजमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण घेतले होते. यानंतर दोघांची नेमणूक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात क्वार्टरमास्टर म्हणून झाली. इ.स. १८२२मध्ये हे भारतात आले. येथे असताना त्यांनी अनेक पायदळ रेजिमेंटांमध्ये दुभाषाचे काम केले. १८३० च्या दशकात दोघा भावांनी कॅप्टन जेम्स मोल्सवर्थ यांच्या इंग्लिश-मराठी शब्दकोशाच्या निर्मितीत बहुमोल मदत केली. मोल्सवर्थ इंग्लंडला परतल्यावर थॉमस कॅंडी यांनी १८०४०-४७ दरम्यान हे काम नेटाने पूर्ण केले.शब्दकोशाचे काम पूर्ण झाल्यावर जॉर्ज कॅंडी इंग्लंडला परतले परंतु थॉमस महाराष्ट्रातच राहिले.

कॅंडी हे पूना संस्कृत कॉलेजचे मुख्याधिकारी होते. याशिवाय ते डेक्कन कॉलेजचे मुख्याध्यापकही होते.

२६ फेब्रुवारी, इ.स. १८७७ रोजी महाबळेश्वर येथे त्यांचे निधन झाले.

भाषाविषयक कार्य

[संपादन]

थॉमस यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माच्या शाळांसाठी मराठीतून पाठ्यपुस्तके तयार केली. याशिवाय त्यांनी अनेक त्याकाळच्या महत्त्वाच्या ग्रंथांची मराठीत भाषांतरे केली. यात इंडियन पीनल कोड आणि इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड यांचाही समावेश होता. आपल्या कामाबरोबरच त्यांनी इतर अनेक इंग्लिश-मराठी भाषांतरकारांची कामे तपासून सुधारली व त्यांना सल्लागार म्हणून मदत केली. ब्रिटिश सरकारने १८६० च्या दशकात त्यांची मुख्य सरकारी भाषांतरकार पदावर नेमणूक केली.[]

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेत विरामचिह्नांचा उपयोग होत नसे.[ दुजोरा हवा] कॅंडी यांनी मराठी भाषेत विरामचिह्ने कशी व कोठे वापरावी याविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. विरामचिन्हांची परिभाषा नावाच्या या ग्रंथाचा लिखित मराठी भाषेच्या आत्ताच्या स्वरूपावर मोठा प्रभाव आहे. कॅंडी यांच्या समग्र लिखाणाचा एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेवरच एकूण मोठा प्रभाव दिसून येतो.[] मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती यानेच सुरू केली. []

ग्रंथलेखन

[संपादन]
  • नितीज्ञानाची परिभाषा (१८४८) (अनुवादित पुस्तक)
  • द इंडियन पीनल कोड (१८६०) (अनुवादित पुस्तक)
  • न्यू पीनल कोड (अनुवादित पुस्तक)
  • नवीन लिपिधारा
  • विरामचिन्हांची परिभाषा (१८५०)
  • भाषणसांप्रदायिक वाक्ये (१८५८) []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Article on 'कॅॅंडी, मेजर टॉमस (Candy, Major Thomas)' in volume 3 of the Marathi Vishwakosh (Marathi Encyclopedia) by S.R. Deshpande, Marathi Vishwakosh Mandal, Bombay, 1976-2008.
  2. ^ Gogate, Sharad. 'George and Thomas Candy: A Biographical Sketch', Prefaced to Molesworth's Marathi-English Dictionary, Reprinted by Shubhada-Saraswat Publications, Pune, 1996.
  3. ^ a b आनंद काटीकर (२०२३). "मराठी भाषेचे प्रमाणीकरण". भाषा आणि जीवन. वर्ष ४१, अंक ०२-०३.